Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander :”प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर…”; भाजप आमदाराच्या वक्तव्यानंतर वाद चिघळळा; पुर्वेश सरनाईकांनी केली टीका

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश प्रताप सरनाईक यांनी आमदार नरेंद्र मेहता यांना उद्देशून एक पत्र लिहिले त्यात त्यांनी मेहता यांनी केलेल्या एका युट्युब चॅनलवरच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 16, 2026 | 01:15 PM
Mira Bhayander :”प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर…”; भाजप आमदाराच्या वक्तव्यानंतर वाद चिघळळा; पुर्वेश सरनाईकांनी केली टीका
Follow Us
Follow Us:
  • “प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर…”
  • भाजप आमदाराच्या वक्तव्यानंतर वाद चिघळळा
मिरा-भाईंदर / विजय काते : मिरा-भाईंदर विधानसभा क्षेत्रातील राजकारणात नव्या वादाची ठिणगी पडली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश प्रताप सरनाईक यांनी आमदार नरेंद्र मेहता यांना उद्देशून एक पत्र लिहत त्यांनी एका युट्युब चॅनल वर केलेल्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे.

या पत्रात पूर्वेश सरनाईक यांनी मेहता यांच्या “प्रताप सरनाईक मेरे ड्रायव्हर होते” या वक्तव्याचा उल्लेख करत, ते अत्यंत आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीचे असल्याचे म्हटले आहे. राजकारणात मतभेद असू शकतात, मात्र त्यामध्ये सभ्यता आणि मर्यादा पाळणे आवश्यक असल्याचा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे.

पत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे की, जनतेने दिलेल्या कौलानंतर लोकप्रतिनिधींनी विकासकामांवर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित असताना, वैयक्तिक टीका करणे योग्य नाही. तसेच चार वेळा निवडून आलेले आमदार आणि सध्याचे मंत्री असलेल्या व्यक्तीबाबत अशा प्रकारची भाषा वापरणे ही राजकीय संस्कृतीला शोभणारी नसल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे.पूर्वेश सरनाईक यांनी आपल्या पत्रातून “राजकारण हे केवळ स्टेटमेंट देण्यासाठी नसून ते संस्कारांची गोष्ट आहे” असे नमूद करत, वैचारिक मतभेद असले तरी व्यक्तीचा आदर राखण्याचे आवाहन केले आहे.या पत्रामुळे मिरा-भाईंदरमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, येत्या काळात या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Satara Zilla Parishad : सातारा जिल्हापरिषद सभेकडे सर्वांच्याच नजरा; सभा शांततेत होणार की वादळी होणार?

काय म्हणाले पुर्वैश सरनाईक ?

नरेंद्र मेहता यांना दिलेल्या निवेदनात पुर्वेश सरनाईक म्हणाले की, सर्वप्रथम, मीरा भाईंदर महानगरपालिकेतील आपल्या भव्य विजयाबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. जनतेने दिलेला हा कौल आम्ही पूर्णपणे मान्य करतो आणि त्याचा आदरही करतो. लोकशाहीत जनतेचा निर्णय अंतिम असतो हे आम्हालाही तेवढ्याच प्रामाणिकपणे पटते. मात्र, या विजयानंतर आपण आता शहराच्या विकासावर, जनतेच्या प्रश्नांवर आणि ठोस कामांवर लक्ष केंद्रित कराल, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. परंतु, दुर्दैवाने गेल्या काही दिवसांत आपल्या वक्तव्यांमध्ये केवळ प्रताप सरनाईक यांच्यावर टीका करण्याचीच घाई दिसून येत आहे. जे स्वतः चार वेळा जनतेने निवडून दिलेले आमदार आणि आज राज्याचे मंत्री आहेत.

आपले अलीकडील वक्तव्य “प्रताप सरनाईक मेरे ड्राइवर होते” हे ऐकून खरोखरच आश्चर्य वाटले नाही. कारण ते आपल्या राजकीय संस्कारांचेच प्रतिबिंब होते. मात्र, त्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वातील खालच्या पातळीचा अंदाज नक्कीच आला. मेहताजी, राजकारणात मतभेद असू शकतात, विचार वेगळे असू शकतात पण त्यात एक सभ्यता आणि मर्यादा असते. ती राखणे ही प्रत्येक जनप्रतिनिधीची जबाबदारी असते.राजकारणात मोठेपणा शब्दांनी नव्हे, तर वर्तनाने सिद्ध करावा लागतो. माझ्या आई-वडिलांनी मला एक गोष्ट शिकवली आहे.विचार जुळत नसले तरी व्यक्तीचा आदर ठेवावा आणि तेच मी आजपर्यंत पाळत आलो आहे.

खाली पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका कधीच करू नये. जरी त्यासाठी पुरावे आणि संधी दोन्ही असतील तरी.खरं सांगायचं तर, आमच्याकडेही अनेक संधी होत्या,”इनसाईड द टॉवेल” सारख्या प्रसंगांवर बोलण्याच्या पण आम्ही आणि आमचा पक्ष त्या पातळीवर कधीच गेलो नाही. कारण आमच्यासाठी राजकारण ही संस्कारांची गोष्ट आहे, केवळ स्टेटमेंट्सची नाही.आपणही हाच आदर्श ठेवावा, ही नम्र अपेक्षा.मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो की आपण मीरा भाईंदरच्या विकासासाठी काम कराल-ज्या शहरासाठी माझे वडील अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करत आले आहेत.एक मुलगा म्हणून, मी आजही आपल्या अशा वक्तव्यांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो.

खाली पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका कधीच करू नये- जरी त्यासाठी पुरावे आणि संधी दोन्ही असतील तरी. खरं सांगायचे तर, आमच्याकडेही अनेक संधी होत्या.”इनसाईड द टॉवेल” सारख्या प्रसंगांवर बोलण्याच्या.पण आम्ही आणि आमचा पक्ष त्या पातळीवर कधीच गेलो नाही कारण आमच्यासाठी राजकारण ही संस्कारांची गोष्ट आहे, केवळ स्टेटमेंट्सची नाही.आपणही हाच आदर्श ठेवावा, ही नम्र अपेक्षा. मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो की आपण मीरा भाईंदरच्या विकासासाठी काम कराल- ज्या शहरासाठी माझे वडील अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करत आले आहेत.एक मुलगा म्हणून, मी आजही आपल्या अशा वक्तव्यांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो.पण कृपया मला तीच संधी पुन्हा पुन्हा देऊ नका.कारण संयम हा आमचा स्वभाव आहे-
कमजोरी नाही.
धन्यवाद,
पुर्वेश प्रताप सरनाईक
एक संयमी पण स्वाभिमानी पुत्र अशा शब्दात पुर्वेश सरनाईक यांनी नरेंद्र मेहता यांना खडेबोल सुनावले आहेत.

कोरेगावात शंभूराज देसाईंची ‘चाल’ सुरु; महेश शिंदेंसमोर पर्याय उभा करण्याची रणनिती तापली

 

Web Title: Mira bhayander controversy erupts after bjp mla narendra mehtas statement on pratap sarnaik purvesh sarnaik criticizes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • BJP
  • Narendra Mehta
  • Pratap Saranaik

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
1

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल
2

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?
3

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?

Mira-Bhayandar News: भूमिपुत्रांच्या घरांवर कारवाईने मीरा-भाईंदरमध्ये राजकीय वातावरण तापले; सरनाईकांची प्रशासनाकडे मोठी मागणी
4

Mira-Bhayandar News: भूमिपुत्रांच्या घरांवर कारवाईने मीरा-भाईंदरमध्ये राजकीय वातावरण तापले; सरनाईकांची प्रशासनाकडे मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.