Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांवरच..,’ दिल्लीतील आंदोलनावर जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य

दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या CJP कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याऐवजी संवाद साधण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

  • By विवेक
Updated On: Jul 20, 2026 | 08:03 PM
'विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांवरच..,' दिल्लीतील आंदोलनावर जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य

'विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांवरच..,' दिल्लीतील आंदोलनावर जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य

Follow Us
Follow Us:

दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या CJP (कॉकरोच जनता पार्टी) च्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. आंदोलनकर्त्यांनी जंतर-मंतरवरून संसद भवनाच्या दिशेने मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संसद परिसरातील सुरक्षा लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखले. सुरुवातीला पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक मागे हटण्यास तयार नसल्याने त्यांनी सुरक्षा बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी लाठीचार्ज केला. आरपीएफचे जवान आणि पोलिसांनी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला.यावरून आता देशभरातून मोठ्या प्रतिक्रिया येत असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी यावरून सरकारवर निशाणा साधला आहे.

जयंत पाटील यांनी आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून सरकारवर जोरदार निशाणा साधत “विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांवरच लाठी चालवण्यासारखे आहे,” असे म्हंटले आहे.

‘विश्वगुरू झुरळांना घाबरतात’; दिल्लीतील आंदोलनावरून सुषमा अंधारेंचा मोदी सरकारवर घणाघात, ‘लोकशाही शेवटचा घटका मोजत आहे’

नेमकं काय म्हणाले जयंत पाटील ?

जयंत पाटील आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून म्हणाले, “”जंतरमंतरवर शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांवरच लाठी चालवण्यासारखे आहे. प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तर देण्याऐवजी लाठ्यांनी गप्प करण्याचा प्रयत्न होत असेल, तर ती लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे. देशाचे भविष्य घडवणाऱ्या तरुणांचा आवाज दाबून प्रश्न संपत नाहीत, उलट व्यवस्थेवरील विश्वास कमी होतो.”

जंतरमंतरवर शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांवरच लाठी चालवण्यासारखे आहे. प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तर देण्याऐवजी लाठ्यांनी गप्प करण्याचा प्रयत्न होत असेल, तर ती लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे. देशाचे भविष्य… pic.twitter.com/IEtZfCnUUf — Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 20, 2026


ते पुढे म्हणले, “संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारणाऱ्या सत्तेने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांच्या आवाजाचा आदर करा.”

‘तरुणांचा आवाज दाबून प्रश्न संपत नाहीत’

जयंत पाटील यांनी पुढे म्हटले की, देशाचे भविष्य घडवणाऱ्या तरुणांचा आवाज दाबून कोणतीही समस्या सुटत नाही. उलट अशा घटनांमुळे व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास कमी होऊ शकतो.

‘अरे मोदीजींच्या चमच्या, देश काय बापाची जाहगीर वाटली काय ?’; रोहिणी खडसेंचा अतुल भातखळकरांवर घणाघात

त्यांनी सरकारला संवादाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन करत, “संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारणाऱ्या सत्तेने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांच्या आवाजाचा आदर करा,” असेही आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

दिल्लीतील आंदोलन, त्यावरील पोलिसांची कारवाई आणि त्यानंतर उमटणाऱ्या राजकीय प्रतिक्रिया यामुळे हा मुद्दा आता राष्ट्रीय स्तरावरील चर्चेचा विषय बनला आहे.

Web Title: Jayant patil reacts to lathicharge on cjp protest delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 08:02 PM

Topics:  

  • Abhijeet Deepke
  • BJP
  • Cockroach Janata Party
  • jayant patil

संबंधित बातम्या

दिल्लीतील आंदोलनावर सरकारची पहिली मोठी प्रतिक्रिया; जे.पी. नड्डांचे आंदोलकांना आवाहन, ‘आंदोलन मागे घ्या’
1

दिल्लीतील आंदोलनावर सरकारची पहिली मोठी प्रतिक्रिया; जे.पी. नड्डांचे आंदोलकांना आवाहन, ‘आंदोलन मागे घ्या’

नवी मुंबई पालिकेची भरती परीक्षा रद्द; १९,२२० उमेदवारांना मोठा धक्का, अवघे २४ तास असताना भाजपाने आणला रद्दचा प्रस्ताव
2

नवी मुंबई पालिकेची भरती परीक्षा रद्द; १९,२२० उमेदवारांना मोठा धक्का, अवघे २४ तास असताना भाजपाने आणला रद्दचा प्रस्ताव

‘विश्वगुरू झुरळांना घाबरतात’; दिल्लीतील आंदोलनावरून सुषमा अंधारेंचा मोदी सरकारवर घणाघात, ‘लोकशाही शेवटचा घटका मोजत आहे’
3

‘विश्वगुरू झुरळांना घाबरतात’; दिल्लीतील आंदोलनावरून सुषमा अंधारेंचा मोदी सरकारवर घणाघात, ‘लोकशाही शेवटचा घटका मोजत आहे’

‘अरे मोदीजींच्या चमच्या, देश काय बापाची जाहगीर वाटली काय ?’; रोहिणी खडसेंचा अतुल भातखळकरांवर घणाघात
4

‘अरे मोदीजींच्या चमच्या, देश काय बापाची जाहगीर वाटली काय ?’; रोहिणी खडसेंचा अतुल भातखळकरांवर घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.