Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : सुनेत्रा काकीच पक्षाच्या प्रमुख राहतील! पवार कुटुंबियांच्या एकत्रित भेटीनंतर रोहित पवारांचे सूचक विधान

Rohit Pawar News : दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणावरुन देखील वाद निर्माण झाला. यावरुन अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. याबाबत रोहित पवार यांनी स्पष्ट मत मांडले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 05, 2026 | 04:06 PM
Maharashtra Politics : सुनेत्रा काकीच पक्षाच्या प्रमुख राहतील! पवार कुटुंबियांच्या एकत्रित भेटीनंतर रोहित पवारांचे सूचक विधान
Follow Us
Follow Us:
  • रोहित पवार यांचा माध्यमांशी संवाद
  • राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर रोहित पवारांची प्रतिक्रिया
  • याबाबत चर्चा झाली नसल्याचे रोहित पवारांचे मत
Rohit Pawar Live : मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाचे नेतृत्व कोण करणार? पक्षाची धुरा कोणाच्या हाती येणार तसेच अजित पवारांकडे असणारी पदे कोणाकडे जाणार असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. तसेच दोन्ही राष्ट्रवादीचे (NCP Politics) गट एकत्र येणार का यावरुन देखील राजकारण रंगले आहे. दरम्यान, पवार कुटुंबियांची एकत्र बैठक झाली. यानंतर आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांनी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवारांचे स्मारक उभारण्यासाठी भेट दिली. आमदार रोहित पवार यांनी पवार कुटुंबियांच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “घाईघाई विमानाने ते निघाले आणि ही दुर्देवी घटना घडली. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. अजित पवार ज्या विचारांना पुढे घेऊन जात होते, त्या विचारांना लोकांनी पाठिंबा द्यावा. राजकारणातील मोठे नेते अजित पवार होते. राजकीय दृष्टीकोनातून जर तुम्हाला त्यांना आदरांजली द्यायची असेल तर त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांच्या विचाराचे कार्यकर्ते जिथे जिथे उभे आहेत, तिथे लोकांनी त्यांना सहकार्य करावं,” असं आवाहन रोहित पवारांनी केले.

हे देखील वाचा : तत्परतेने टोल वसुली, सरकारचा कोडगेपणा अनाकलनीय; राज ठाकरेंनी वाहतूक कोंडीवरुन जोरदार झापलं

तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल पटेल होणार असल्याची चर्चा होती. यावरुन शपथविधीसाठी घाई करण्यात आल्याचे देखील बोलले जात होते. तसेच दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणावरुन देखील वाद निर्माण झाला. यावरुन अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. याबाबत रोहित पवार म्हणाले की, “उपमुख्यमंत्रीपद आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख पद हे सुनेत्रा पवारांकडेच राहिले पाहिजे अशी आमची इच्छा आहे. पण या दुःखाच्या काळामध्ये आम्हाला यावर थेटपणे बोलता येत नाही,” असे सूचक वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

हे देखील वाचा : आपण कशाला मध्ये पडायचं? यात शिवसेनेचा काय संबंध? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर संजय राऊतांनी काढून घेतले अंग

पुढे रोहित पवार म्हणाले की, “लोकप्रतिनिधी हे जनतेच्या आशीर्वादाने निवडून येत असतात, जर आमदारांनी अशाप्रकारची इच्छा व्यक्त केली असेल तर त्याची दखल घेतली पाहिजे. तसेच विविध सेलच्या अध्यक्षांनीही सुनेत्रा पवार यांचेच नाव पुढे केल्याचे कळते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडेच ही जबाबदारी द्यायला हवी. कुणी कितीही काही प्रयत्न केले तरी आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते, लोक आणि परिवाराचे म्हणणे कुणीही डावलू शकत नाही. सुनेत्रा काकीच त्या पक्षाच्या प्रमुख राहतील,” असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे.

विलीनीकरणाची चर्चा झाली नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलीनीकरण होणार का? याबाबत बोलत असताना रोहित पवार म्हणाले की, “ही चर्चा कुठेच नाही. अजित पवार यांच्या पक्षातील वरिष्ठ नेते त्यांच्यापरिने प्रयत्न करत आहेत की नाहीत, याबाबत आज नेमके सांगता येणार नाही. पण ९ फेब्रुवारी रोजी तेरावे झाल्यानंतर आम्ही परिवारात याबाबतची चर्चा करू. आतापर्यंतही यावर चर्चा झाली नाही,” असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे. तर दुसरीकडे त्यांच्या पक्षातील नेते अगदी शरद पवार देखील ही चर्चा झाली असल्याचे बोलत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे भविष्य काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Mla rohit pawar press conference live on ncp merger in baramati news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 04:06 PM

Topics:  

  • NCP Politics
  • rohit pawar
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
1

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

‘पुणे पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नसली तरी…’ MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर Rohit Pawar यांची भूमिका
2

‘पुणे पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नसली तरी…’ MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर Rohit Pawar यांची भूमिका

Rohit Pawar : ‘निर्णय घेता येत नसेल तर बांधावर फिरता कशाला? आता मुख्यमंत्र्यांनाच बांधावर पाठवा!’ रोहित पवारांचा सरकारला सवाल
3

Rohit Pawar : ‘निर्णय घेता येत नसेल तर बांधावर फिरता कशाला? आता मुख्यमंत्र्यांनाच बांधावर पाठवा!’ रोहित पवारांचा सरकारला सवाल

Rohit Pawar : मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता; ‘शक्तीपीठ’चा पैसा शेतकऱ्यांसाठी वळवा, रोहित पवारांची सरकारकडे मोठी मागणी
4

Rohit Pawar : मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता; ‘शक्तीपीठ’चा पैसा शेतकऱ्यांसाठी वळवा, रोहित पवारांची सरकारकडे मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.