Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: महायुतीच्या फोडाफोडीत मनसेची मुसंडी, भाजपला धक्का देत पदाधिकाऱ्यांची ‘घरवापसी’!

Maharashtra Politics: कल्याण-डोंबिवलीतील राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजपमध्ये गेलेल्या अनेक माजी मनसैनिकांनी पुन्हा मनसेत घरवापसी केली आहे. डोंबिवलीतील पलावा येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात मनसे नेते राजू पाटील यांनी भाजपवर खोट्या हिंदुत्वाच्या राजकारणाचा आरोप करत जोरदार टीका केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 07, 2026 | 11:54 AM
महायुतीच्या फोडाफोडीत मनसेची मुसंडी, भाजपला धक्का देत पदाधिकाऱ्यांची 'घरवापसी'!

महायुतीच्या फोडाफोडीत मनसेची मुसंडी, भाजपला धक्का देत पदाधिकाऱ्यांची 'घरवापसी'!

Follow Us
Follow Us:
  • कल्याण-डोंबिवलीत महायुतीच्या फोडाफोडीत मनसेची मुसंडी
  • भाजपला धक्का देत पदाधिकाऱ्यांची ‘घरवापसी’!
  • भाजप खोटं हिंदुत्व गळ्यात मारून तरुणांचा वापर करते”
  • मनसे नेते राजू पाटलांचा घणाघाती प्रहार
Maharashtra Politics: कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात सध्या पक्षांतर आणि फोडाफोडीचे राजकारण चांगलेच रंगले असून, त्याचा फायदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) उचलल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत मतभेदांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये गेलेल्या अनेक माजी मनसैनिकांनी पुन्हा मनसेत घरवापसी केली आहे.

डोंबिवलीतील पलावा येथील मनसे कार्यालयात मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील (Raju Patil) आणि शहराध्यक्ष हर्षद पाटील यांच्या उपस्थितीत मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात भाजपमधील काही कार्यकर्त्यांसह अनेक माजी मनसैनिकांनी पुन्हा मनसेचा झेंडा हाती घेतला.

राजकारण्यांच्या वाढत्या ढेऱ्या! सत्तेचा ताण, की अजून काही? खुर्ची मिळताच वाढणाऱ्या पोटामागे काय आहे रहस्य?

भाजपवर राजू पाटलांचा हल्लाबोल

पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी संवाद साधताना राजू पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “भाजप तरुणांच्या गळ्यात खोटं हिंदुत्व मारून त्यांचा केवळ राजकीय यंत्रणेसारखा वापर करत आहे,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, “मनसेला मिळणारा निधी हा कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आहे. बीफ विकणाऱ्या कंपन्यांकडून आम्हाला निधी मिळत नाही,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

मनसेच्या वैद्यकीय कक्षाचा शुभारंभ

या कार्यक्रमात मनसेच्या नव्या वैद्यकीय कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात समन्वय साधणे, नागरिकांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे आणि आरोग्यविषयक समस्यांवर मार्गदर्शन करणे हा या कक्षाचा उद्देश असल्याचे राजू पाटील यांनी सांगितले. अनेक डॉक्टर आणि परिचारिका या उपक्रमाशी जोडले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

रुक्मिणीबाई रुग्णालयातील घटनेवरही भाष्य

केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात एका लहान बाळाच्या कमरेत इंजेक्शनची सुई अडकल्याच्या घटनेचाही राजू पाटील यांनी उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, “NEET पेपर लीकसारख्या प्रकारांमुळे वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असेल. मात्र नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळालीच पाहिजे. सेवा न मिळाल्यास केवळ राजकारणीच नव्हे तर सामान्य नागरिकही प्रश्न विचारतील.” त्यामुळे आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मनसेने वैद्यकीय सेवा टीमची स्थापना केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या पक्षप्रवेश सोहळ्यास मनसे नेते राजू पाटील, डोंबिवली शहराध्यक्ष हर्षद पाटील, जिल्हाध्यक्ष राहुल कामत, मनसे पदाधिकारी योगेश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीतील या राजकीय घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Satara Politics : शपथपत्रातील माहितीवरून दोन नगरसेवक अडचणीत; अपात्रता प्रकरणाची सुनावणी 14 जुलैला

Web Title: Mns homecoming in kalyan dombivli bjp workers join raj thackeray party raju patil slams bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Politics
  • MNS
  • raju patil

संबंधित बातम्या

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम आज किंवा उद्या खात्यात जमा होणार; बाबासाहेब पाटील यांची माहिती
1

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम आज किंवा उद्या खात्यात जमा होणार; बाबासाहेब पाटील यांची माहिती

Maharashtra Breaking News Live Updates Today:  राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर साधू आणि संतांचा गोंधळ!
2

Maharashtra Breaking News Live Updates Today: राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर साधू आणि संतांचा गोंधळ!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या प्रेसमध्ये धनंजय मुंडेही बोलले; सुनील तटकरेंनी म्हटले, ‘आमदारांची लुडबूड…’
3

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या प्रेसमध्ये धनंजय मुंडेही बोलले; सुनील तटकरेंनी म्हटले, ‘आमदारांची लुडबूड…’

आमदार राजेंद्र राऊत यांचा निगडीत सत्कार सोहळा; ‘हे’ बडे नेते राहणार उपस्थित 
4

आमदार राजेंद्र राऊत यांचा निगडीत सत्कार सोहळा; ‘हे’ बडे नेते राहणार उपस्थित 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.