
MNS Raj Thackeray Padwa Melava Teaser Out shivtirtha live
मनसे अधिकृत पेजवर गुढीपाडव्याचे दोन टीझर आऊट झाले आहेत यामध्ये राज ठाकरे यांच्या धडाकेबाज आवाजामध्ये मराठी माणसांसाठी आवाहन करण्यात आले आहे. तसेच राज ठाकरेंच्या आधीच्या भाषणातील मराठी माणसांच्या हक्कासाठी उठवलेला आवाज टीझरमध्ये देखील ऐकू येत आहे. टीझरमध्ये महाराष्ट्रात जे चाललयं ते पटत नाहीये? रोजच्या घटना पाहून मनस्ताप होतोय? महाराष्ट्राची ही अवस्था बघून अस्वस्थ झाला आहात? असे सवाल विचारले आहेत. तसेच पुढे तुम्ही एकटे नाही आहात महाराष्ट्रावर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाला असचं वाटतयं चला शिवतीर्थवर भेटूया उज्वल महाराष्ट्र घडवूया, अशी साद घालण्यात आली आहे.
हे देखील वाचा : “वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर…; बारामती पोटनिवडणूकीवर रोहित पवारांची भावनिक पोस्ट
त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मी मराठी माणसावर प्रेम करतो,..महाराष्ट्रातील मराठी माणसांवर प्रेम करतो. मराठी भाषेवर प्रेम करतो आणि टोकाचं प्रेम करतो. एक गोष्ट निश्चित सांगतो की, महाराष्ट्राच्याबाबतीत, मराठी माणसांच्या बाबतीत आणि मराठी भाषेच्याबाबतीत राज ठाकरे कोणाशीही तडजोड करणार नाही, असे राज ठाकरेंचे सभेमधील वक्तव्य देखील या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे.
गुढीपाडवा मेळावा २०२६
स्थळ- शिवतीर्थ
वेळ- सायंकाळी ५ वाजता #MNSAdhikrut pic.twitter.com/dhWZNgjFCf — MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 16, 2026
मनसेचा पारंपरिक गुढीपाडवा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्कवर होणार आहे. ही सभा मराठी नववर्षाच्या निमित्ताने असणार आहे. त्यामुळे त्यात मराठी भाषा, मराठी माणसांची गळचेपी आणि सध्याचे राजकारण यावरुन राज ठाकरे स्पष्टपणे टीका करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच स्थानिक मुद्दे आणि सध्याचे राजकीय/सामाजिक वाद हे मुद्दे केंद्रस्थानी असतील.
हे देखील वाचा : दुबे काय तुमचा जावई आहे का? भीमाशंकर दर्शनावरुन रोहिणी खडसेंची सरकारला चपराक
राज ठाकरे हे शिवतीर्थावरुन आपल्या नेहमीच्या खास आक्रमक शैलीत भाषण करतील. याशिवाय दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघाता झालेला मृत्यू त्यानंतर घातपात असल्याचा संशय, इराण-इस्राइल देशात सुरू असलेले युद्ध त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेला गॅस आणि कच्चा तेलाचा तुटवडा या मुद्यांवर सरकारवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.