Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मोदी सरकारने संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आणले’; मल्लिकार्जुन खर्गेंची टीका

महागडे आणि अपुरे शिक्षण, प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना, भरती प्रक्रियेतील विलंब, कौशल्यांमधील वाढती तफावत आणि दर्जेदार नोकऱ्यांचा अभाव यामुळे संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 25, 2026 | 09:47 AM
Mallikarjun Kharge, Rahul Gandhi, Haldwani, BJP,

Mallikarjun Kharge, Rahul Gandhi, Haldwani, BJP,

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारने तरुणांसाठी शिक्षणापासून रोजगारापर्यंतचा मार्ग रोखला आहे आणि संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आणले आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी केला.

‘नीती आयोगा’च्या आकडेवारीचा संदर्भ देत खर्गे यांनी सांगितले की, १५ ते २९ वयोगटातील ८.७ कोटी तरुण ना शिक्षण घेत आहेत, ना नोकरी करत आहेत, ना कोणतेही प्रशिक्षण घेत आहेत. त्यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, यापैकी सुमारे ८८ टक्के तरुण घरगुती कामांमध्ये गुंतलेले आहेत. ‘पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हे’चा उल्लेख करत त्यांनी नमूद केले की, तरुणांमधील बेरोजगारीचा दर १५.६ टक्के आहे, तर तरुणींमधील बेरोजगारीचा दर १९.५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

BMC आयुक्त अश्विनी भिडे यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट नाकारल्याचा दावा; आयुक्तांच्या भूमिकेवर वंचित आक्रमक

पदवीधर तरुणांसाठी नोकऱ्या कुठे आहेत, असा प्रश्न खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला. त्यांनी दावा केला की, २० ते २९ वयोगटातील बेरोजगार व्यक्तींमध्ये पदवीधरांचे प्रमाण ६७ टक्के आहे, तर १५ ते २५ वयोगटातील पदवीधरांमधील बेरोजगारीचा दर जवळपास ४० टक्के आहे.

नोकऱ्यांचा अभाव; भविष्य धोक्यात

महागडे आणि अपुरे शिक्षण, प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना, भरती प्रक्रियेतील विलंब, कौशल्यांमधील वाढती तफावत आणि दर्जेदार नोकऱ्यांचा अभाव यामुळे संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आले आहे. सरकारच्या धोरणांमुळे शिक्षण महाग झाले असून, परीक्षांवरील तरुणांचा विश्वास कमी झाला आहे, असा आरोपही खर्गे यांनी केला.

नोकऱ्या देण्याच्या आश्वासनाचे काय?

दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याच्या आश्वासनाचे काय झाले, असा सवाल काँग्रेस अध्यक्षांनी उपस्थित केला. त्यांच्या मते, या आश्वासनानुसार १२ वर्षांत २४ कोटी नोकऱ्या निर्माण व्हायला हव्या होत्या.

2029 मध्ये मोदी पंतप्रधान नसतील

आगामी काळात देशात सत्ताबदल निश्चितपणे होईल आणि त्यासाठी विरोधी पक्ष किंवा काँग्रेस कारणीभूत ठरणार नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 12 वर्षांतील कारभारामुळेच हा बदल घडेल, असा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्रमाणपत्रांच्या त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करणार; मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक

Web Title: Modi government has jeopardized the future of an entire generation says mallikarjun kharge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 09:47 AM

Topics:  

  • Mallikarjun Kharge
  • Modi government
  • narendra modi
  • political news

संबंधित बातम्या

India Mobile Congress 2026: देशाच्या कानाकोपऱ्यात 5G कनेक्टिव्हिटीचा विस्तार; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य!
1

India Mobile Congress 2026: देशाच्या कानाकोपऱ्यात 5G कनेक्टिव्हिटीचा विस्तार; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य!

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
2

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

INDIA Alliance Delhi Protest:दिल्लीत हालचालींना वेग; इंडिया’चे खासदार निवडणूक आयोगाच्या दिशेने रवाना
3

INDIA Alliance Delhi Protest:दिल्लीत हालचालींना वेग; इंडिया’चे खासदार निवडणूक आयोगाच्या दिशेने रवाना

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम
4

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.