Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MP Prashant Padole Accident: प्रशांत पडोलेंच्या कारला भीषण अपघात! नागपूरजवळ नेमकं काय घडलं?

अपघातात किरकोळ दुखापत झाल्यानंतर डॉ. पडोले यांनी एका दुचाकीस्वाराची लिफ्ट घेऊन नागपूर गाठले. तेथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर ते तातडीने दिल्लीला रवाना झाले.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 30, 2026 | 02:41 PM
Prashant Padole MP Accident, Nagpur Road Safety, Bhandara Congress MP News

Prashant Padole MP Accident, Nagpur Road Safety, Bhandara Congress MP News

Follow Us
Follow Us:
  • काँग्रेस खासदार प्रशांत पडोले यांचया कारला अपघात
  • संसदेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला जाण्याची तयारी
  • अपघातानंतर नितीन गडकरी यांना टॅग करून रस्ते सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त
Prashant Padole MP Accident :  भंडारा -गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस खासदार प्रशांत पडोले यांचया कारला अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. आज ( ३० मार्च) सकाळी भंडाऱ्याहून नागपुर विमानतळाकडे जात असताना नागपूरजवळ हा अपघात झाली. प्रशांत पडोले यांच्या कारला इतकी जोरदार धडक बसली की गाडीचे मोठे नुकसान झाले. या अपघातात खासदार प्रशांत पाडोले आणि त्यांचे चालक जखमी झाले. मात्र, सुदैवाने यात कोणतेही मोठे नुकसान किंवा जीवितहानी झाली नाही. गाडीतील सर्वजण सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे, परंतु वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

संसदेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला जाण्याची तयारी

खासदार प्रशांत पडोले संसदेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी दिल्लीला जात होते. ते विमानाने दिल्लीकडे निघाले होते. भंडारा येथून नागपूर विमानतळाकडे आपल्या खाजगी गाडीने प्रवास करत होते. वाटेत एका ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली. या अपघातात पाडोले यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. असे असूनही, त्यांनी आपल्या अधिकृत कामांना प्राधान्य दिले आणि अपघातानंतर थेट नागपूर विमानतळावर गेले. तेथून ते ठरल्याप्रमाणे दिल्लीला विमानाने गेले.

Parth Pawar Raj Thackeray Meet : पार्थ पवार अन् राज ठाकरेंची भेट; तब्बल दीड तास चर्चा, कारण मात्र गुलदस्त्यात

गाडीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट

अपघातानंतर खासदार पाडोले यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घटनेची माहिती दिली. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टॅग करून रस्ते सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आणि प्रश्न उपस्थित केले. “खासदार सुरक्षित नाहीत. मग जनतेचं काय? मला आज दिल्लीला जायचं होतं. त्यासाठी सकाळी भंडारा ते नागपूर विमानतळ असा प्रवास एका खाजगी गाडीने करायचा होता. नागपूरजवळ एका ट्रकने आमच्या गाडीला जोरात धडक दिली. गाडीचं नुकसान झालं, पण मला कुठेही मार लागला नाही, मात्र गाडीचं नुकसान झालं.”

सांसद नहीं सुरक्षित.
जनता का क्या होगा?
आज दिल्ली के लिए निकलना था, सुबह भंडारा से निजी कार से नागपूर एयरपोर्ट पर जाना था.
नागपूर के करीब ट्रक वाले ने जोरदार टक्कर दी. कार क्षतिग्रस्त हुई पर मुझे कही लगा नहीं लेकिन कार का नुकसान हुआ.
मा @nitin_gadkari कार कंपनी को सख्त pic.twitter.com/BXb0YkLMDL
— Dr Prashant Padole (@_Prashantpadole) March 30, 2026

अपघातानंतर दुचाकीने प्रवास:

अपघातात किरकोळ दुखापत झाल्यानंतर डॉ. पडोले यांनी एका दुचाकीस्वाराची लिफ्ट घेऊन नागपूर गाठले. तेथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर ते तातडीने दिल्लीला रवाना झाले. याच मार्गावर त्यांच्यासोबत झालेला हा तिसरा अपघात असल्याने यामागे घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत असून सखोल चौकशीची मागणी होत आहे. वारंवार होणाऱ्या या जीवघेण्या अपघातांमुळे या प्रकरणाचे गूढ वाढले असून प्रशासनाकडून चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

NCP Banner Controversy: अजित पवारांचे फोटो बॅनर्सवरून गायब! बॅनर वॉरमुळे राष्ट्रवादीत नव्या वादाची ठिणगी

कोण आहेत डॉ. प्रशांत पडोले?

शिक्षण: युक्रेनच्या ओडेसा स्टेट युनिव्हर्सिटीतून एमडी (मेडिसिन) पदवी प्राप्त.

व्यावसायिक ओळख: कृषी आणि वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय; स्वतःचे रुग्णालय असून पत्नीसह वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत.

राजकीय कारकीर्द: भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार.

 

Web Title: Mp prashant padole meets with accident near nagpur car severely damaged by truck

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 01:48 PM

Topics:  

  • Accident News
  • bhandara news
  • Congress leader

संबंधित बातम्या

पिंपरीत भीषण अपघात! ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू; आई-वडील गंभीर जखमी
1

पिंपरीत भीषण अपघात! ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू; आई-वडील गंभीर जखमी

Accident News: कंटेनरच्या चाकात अडकली दुचाकी; ३ किमी फरफटत गेली, आईसह दोन चिमुकल्यांचा करुण अंत
2

Accident News: कंटेनरच्या चाकात अडकली दुचाकी; ३ किमी फरफटत गेली, आईसह दोन चिमुकल्यांचा करुण अंत

Accident News: रस्ता समजून पुढे गेले अन् थेट गटारीत कोसळले; ३७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
3

Accident News: रस्ता समजून पुढे गेले अन् थेट गटारीत कोसळले; ३७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Accident News: भरधाव कारला डंपरची भीषण धडक; मध्यरात्रीच्या अपघातात चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
4

Accident News: भरधाव कारला डंपरची भीषण धडक; मध्यरात्रीच्या अपघातात चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.