Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशपातळीवरील ‘इंडिया’ आघाडी विसर्जित होणार? महाराष्ट्रातील नाराजीनाट्यमुळे बसणार फटका, नेत्याचे सूचक विधान

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडीमध्ये नाराजीनाट्य सुरु असल्याचे दिसून आले आहे. अमोल कोल्हे व विजय वडेट्टीवार यांच्या टीकेला संजय राऊतांनी उत्तर दिले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 10, 2025 | 01:56 PM
INDIA Alliance : एकत्र वाटणाऱ्या इंडिया आघाडीतच फूट; 'हा' मुद्दा ठरतोय चर्चेचं कारण

INDIA Alliance : एकत्र वाटणाऱ्या इंडिया आघाडीतच फूट; 'हा' मुद्दा ठरतोय चर्चेचं कारण

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाविकास आघाडीमधील नाराजी याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहे. महाविकास आघाडीच्या कॉंग्रेस, शरद पवार व ठाकरे गटाच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी आघाडीमध्ये नाराजी असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी टीका केल्यामुळे इतर मित्रपक्षांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच देशपातळीवरील आघाडीबाबत देखील खासदार संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यामुळे आता नेत्यांनी मनातील खदखद व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. अमोल कोल्हे यांनी शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही असे वक्तव्य केले आहे. तसेच काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही, अशी टीका केली. अमोल कोल्हेंना उत्तर देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, “बचेंगे तो लडेंगे ही शिवसेवेचीच भूमिका आहे, आम्ही सोडून नाही गेलो दुसरीकडे. आम्ही लढतोय आणि लढत राहू,” असे संजय राऊत म्हणाले आहेत.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

त्याचबरोबर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार विधानसभा निवडणुकीमधील पराभवाला जागावाटपामध्ये झालेला घोळ कारणीभूत असल्याची टीका केली आहे. तसेच काही नेते मुद्दाम उशीर करत असल्याची गंभीर टीका देखील वडेट्टीवार यांनी केली आहे. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “जागावाटपाची प्रक्रिया उगाच लाबंवली, हे आमचं सर्वांचं मत आहे. ती का लाबंली हे वडेट्टीवारांना माहिती असावं. महायुतीचं जागावाटप आमच्या दोन महिने आधीच संपलं होत. वडेट्टीवारांची खंत ही संपूर्ण महाविकास आघाडीची खंत आहे. होय, चुका झाल्या पण आता त्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

त्यांना मुख्यमंत्रिपद हवं होतं

पुढे खासदार संजय राऊत म्हणाले की, “काँग्रेसला सर्वात जास्त जागा हव्या होत्या, आणि त्यांच्या सर्वात कमी आल्यात. विदर्भात वडेट्टीवारांनी काही जागा सोडल्या असत्या, ज्या ते हरलेत तर चित्र काहीसं वेगळ असतं. किशोर जोरगेवारांबाबत आमचं स्पष्ट मत होत, पण तसं झालं नाही, राष्ट्रवादीला ती जागा मिळाली नाही आणि जोरगेवर भाजपात गेले. याला सगळेच जवाबदार आहेत. कोल्हापूर उत्तर आम्ही मागत होतो, अशा अनेक जागा आहेत. पण कोणाला तरी राज्यात सर्वाधिक जागा लढनू मुख्यमंत्रीपद हवं होतं,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

त्याचबरोबर खासदार संजय राऊत यांनी इंडिया आघाडीबाबत सूचक वक्तव्य केले आहे. संजय राऊत म्हणाले की, “महाविकास आघाडीसोबत इंडिया आघाडीचीही बैठक व्हायला हवी होती, जी झाली नाही. याचा फटका सर्वांनाच बसला. इंडिया आघाडी लोकसभेसाठी तयार झाली होती, पण प्रत्येकजण आपलंच घोडं दामटवत राहिला. आघाडी टिकवण्याची जबाबदारी काँग्रेसची होती, तो सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. पण त्यांना ते जमलेलं नाही. इंडिया आघाडी विसर्जित करणं हे फार मोठं विधान होईल,” असे सूचक विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

Web Title: Mp sanjay raut clarifies his stance on the dissolved india alliance and disgruntled leaders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2025 | 01:53 PM

Topics:  

  • INDIA Alliance
  • sanjay raut
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

Eknath Shinde Press Conference: ‘कालचा दिवस देशाच्या इतिहासातील काळा दिवस’; एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका
1

Eknath Shinde Press Conference: ‘कालचा दिवस देशाच्या इतिहासातील काळा दिवस’; एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका

India Alliance : निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधींसह ‘इंडिया’च्या ११ नेत्यांची सुप्रीम कोर्टात याचिका
2

India Alliance : निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधींसह ‘इंडिया’च्या ११ नेत्यांची सुप्रीम कोर्टात याचिका

INDIA Alliance Supreme Court March: ज्ञानेश कुमारांविरोधात विरोधक आक्रमक!;  महाराष्ट्रातील १०० हून अधिक नेते दिल्लीत दाखल
3

INDIA Alliance Supreme Court March: ज्ञानेश कुमारांविरोधात विरोधक आक्रमक!; महाराष्ट्रातील १०० हून अधिक नेते दिल्लीत दाखल

Rahul Gandhi : राहुल गांधींचा मोठा निर्णय! ‘उद्या संपूर्ण भारत सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणार’
4

Rahul Gandhi : राहुल गांधींचा मोठा निर्णय! ‘उद्या संपूर्ण भारत सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.