Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुप्रिया सुळेंवरील वक्तव्यावरून काँग्रेस-शरद पवार गट आमने-सामने; वडेट्टीवारांच्या माफीनंतर वादावर पडदा?

सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात वाद निर्माण झाला. शशिकांत शिंदे यांनी वडेट्टीवारांवर जोरदार टीका केली. त्यानंतर वडेट्टीवारांनी सुप्रिया सुळेंचा उल्लेख अनावधानाने झाल्याचे सांगत खेद व्यक्त केला.

  • By विवेक
Updated On: Aug 27, 2026 | 06:28 PM
सुप्रिया सुळेंवरील वक्तव्यावरून काँग्रेस-शरद पवार गट आमने-सामने

सुप्रिया सुळेंवरील वक्तव्यावरून काँग्रेस-शरद पवार गट आमने-सामने

Follow Us
Follow Us:
  • सुप्रिया सुळेंच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या दाव्यावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये वाद
  • शशिकांत शिंदेंचा वडेट्टीवारांवर हल्लाबोल; पुराव्याची मागणी.
  • वडेट्टीवारांनी सुप्रिया सुळेंचा उल्लेख अनावधानाने झाल्याचे सांगत खेद व्यक्त
 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात नव्या वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेसचे ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा केला होता. या वक्तव्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत वडेट्टीवारांना लक्ष्य केले. मात्र, त्यानंतर वडेट्टीवारांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत सुप्रिया सुळेंचा उल्लेख अनावधानाने झाल्याचे सांगितले आहे.

‘विजय वडेट्टीवारांना पुरावे कुठून मिळाले?’

विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शशिकांत शिंदे यांनी काँग्रेसवरच सवाल उपस्थित केले. मित्रपक्षांना लक्ष्य करण्याऐवजी त्यांच्यासोबत काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

“विजय वडेट्टीवार यांना कुठून पुरावे मिळाले? ते त्यांनी सांगावं,” अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी केली. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल करण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगत ते सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

सुप्रिया सुळेंबाबतचं ‘ते’ वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी घेतलं मागे; म्हणाले, ‘अनावधानाने उल्लेख झाला…’

काँग्रेसला मित्रपक्षाची गरज नाही का, असा सवाल करत वडेट्टीवार यांनी नेमकी कोणाची ‘सुपारी’ घेतली आहे, हे स्पष्ट करावे, अशी बोचरी टीकाही शिंदे यांनी केली.

वडेट्टीवारांनी व्यक्त केला खेद

दरम्यान, वाद वाढल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले. ओबीसी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर भूमिका मांडताना सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख अनावधानाने झाल्याचे त्यांनी सांगितले. सुप्रिया सुळे यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा आपला हेतू नव्हता, असे स्पष्ट करत त्यांनी या उल्लेखाबद्दल खेद व्यक्त केला.

‘ओबीसी नेत्यांबाबतची भूमिका कायम’

मात्र, सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख मागे घेतला असला तरी ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या मराठा नेत्यांच्या मुद्द्यावर आपली भूमिका कायम असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. ओबीसी प्रमाणपत्राचा वापर करून सत्तेचा लाभ घेणे आणि त्याचवेळी ओबीसी समाजाच्या हक्कांवर आघात करणे योग्य नसल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले. आपला लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून ओबीसी समाजाच्या हक्कांचे संरक्षण आणि सामाजिक न्यायासाठी असल्याचा दावा त्यांनी केला.

Amit Thackeray : ‘अमित साटम यांना भुंकायलाच ठेवलंय, तेच काम उत्तम करत आहेत,’ अमित ठाकरे यांची जहरी टीका

दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील हा वाद महत्त्वाचा ठरला आहे. वडेट्टीवारांच्या स्पष्टीकरणानंतर या वादावर आता पडदा पडतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Supriya sule obc certificate vijay wadettiwar shashikant shinde row

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • Congress
  • NCP Sharad Pawar
  • Shashikant Shinde
  • supriya sule
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

SIR आंदोलनाचा देशभर भडका! मुंबईपासून दिल्लीपर्यंत राजकीय घमासान, आता काँग्रेसने आखली देशव्यापी रणनीती
1

SIR आंदोलनाचा देशभर भडका! मुंबईपासून दिल्लीपर्यंत राजकीय घमासान, आता काँग्रेसने आखली देशव्यापी रणनीती

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल
2

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल

Congress Job Fair: ३० हून अधिक कंपन्या, ८४६ मुलाखती, ४८६ जॉब ऑफर्स; काँग्रेसच्या रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
3

Congress Job Fair: ३० हून अधिक कंपन्या, ८४६ मुलाखती, ४८६ जॉब ऑफर्स; काँग्रेसच्या रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Delhi Protest : ‘घाबरलेला माणूस आज नाहीतर उद्या मरेल’, खर्गेंचा केंद्रावर निशाणा, दिल्ली मेट्रो-रेल्वे निर्बंधांवरून राजकारण तापलं
4

Delhi Protest : ‘घाबरलेला माणूस आज नाहीतर उद्या मरेल’, खर्गेंचा केंद्रावर निशाणा, दिल्ली मेट्रो-रेल्वे निर्बंधांवरून राजकारण तापलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.