Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut Criticizes Bandu Jadhav: जे ठाकरेंचे झाले नाहीत, ते जरांगेंचे कसे होणार? संजय राऊतांचा खासदार जाधवांवर घणाघात

Sanjay Raut News: मराठा समाजाच्या मागील मुंबईतील आंदोलनावेळी त्यांची फसवणूक झाली. सरकारने चर्चेची तयारी ठेवली पाहिजे. पण जरांगे पाटील यांना कसे गुंडाळता येईल, यासाठी बैठका सुरू झाल्या आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 31, 2026 | 01:05 PM
Sanjay Raut Press Conference On Nitesh Rane :

Sanjay Raut Press Conference On Nitesh Rane :

Follow Us
Follow Us:
  • खासदार संजय राऊतांची शिंदे गटाचे परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधवांवर कडक टीका.
  • मनोज जरांगे पाटलांचा विरोध असतानाही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला शेतकरी मेळावा.
  • जाधवांना निवडून आणण्यात जरांगे पाटलांची मोठी मदत होती – संजय राऊतांचा दावा.
Sanjay Raut Criticizes Bandu Jadhav: मनोज जरांगे पाटील प्राण पणाला लावून आंदोलन करत आहेत, समाजाचे नेतृत्त्व करत आहेत. उपोषण करून त्यांची प्रकृती खूप खालावली आहे. मी हे स्वत: पाहिले आहे. संजय जाधव यांना निवडून आणण्यासाठी जरांगे पाटील यांची मदत झाली होती. पण जे कुणी बंडू-झंडू जाधव आहेत, जे ठाकरेंचे झाले नाहीत, ते जरांगेंचे कसे होणार? ते नेहमी नवीन आई-बाप शोधत असतात. अशा खोचक शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यावर टिका केली आहे.

खासदार संजय (बंडू) जाधव यांनी आयोजित केलेला शेतकरी मेळावा रद्द करण्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला होता. पण त्यानंतरही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) उपस्थितीत हा मेळावा घेण्यात आला. या प्रकारानंतर खासदार संजय राऊत यांनी संजय जाधव यांच्यावर हल्लाबोल केला.

‘मी मेलो तरी माझं मढं मुंबईला घेऊन जा’, ‘१२ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा…’ मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम

संजय राऊत म्हणाले की, ठाकरेंशी गद्दारी केली, हीच त्यांची मोठी चूक आहे. त्यांच्याकडून जरांगे पाटील यांनी काय अपेक्षा करावी? जरांगे त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. ते पुन्हा संसदेत जाणार नाहीत, याची काळजी शिवसैनिक घेतील. मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीमध्ये उपोषण करत असतानाच संजय जाधव यांनी उपमुख्यमंत्र्यांना बोलावून मेळावा घेतला. हा मेळावा रद्द करावा अशी जरांगे पाटील यांची भूमिका होती. पण त्यानंतरही जाधव यांनी तोमेळावा घेतला. समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात जरांगे पाटील यांची भूमिका होती. त्यांची तळमळ, तडफड मी पाहिली. कारण संजय (बंडू) जाधव यांना निवडून आणण्यााठी जरांगे पोटील यांनी खूप मोठी मदत केली. त्यामुळे जरांगे पाटील यांनी जाधव यांच्याकडे मेळावा रद्द करण्याची भूमिका घेतली असावी. तो मेळावा जाधव यांनी रद्द करायला हवा होता, अशी टिकाही जरांगे पाटील यांनी केली.

संजय राऊत म्हणाले की, ‘मुख्यमंत्री आरक्षणाच्या विषयावर कुंपणावर बसून आहेत. त्यांनी कधीही या प्रश्नावर मार्ग काढलेला नाही. ज्युनियर मंत्री आणि मुंबईतील आमदारांना चर्चेसाठी पाठवले जाते; मात्र प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. मुख्यमंत्र्यांना वेळ काढावाच लागेल. एकाही समाजाला न्याय देण्यात ते यशस्वी झालेले नाहीत. फक्त समाजात वाद निर्माण करण्याचे काम सुरू आहे.”

Rahul Gandhi FIR Haldwani: राहुल गांधींविरोधात हल्द्वानीत पोलिसांत FIR दाखल; धार्मिक भावना दुखावल्या

“भाजपने जातीय राजकारण करणे बंद केले पाहिजे. आगी लावण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. यांना फक्त श्रेय घ्यायचे आहे. विविध पक्षांतील प्रमुख पाच जाणत्या नेत्यांशी ते चर्चा करत नाहीत. जोपर्यंत त्यांना ही सुबुद्धी येत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांना नेता मानायला तयार नाही. अशी टिकाही संजय राऊत यांनी यावेळी केली.

मराठा समाजाच्या मागील मुंबईतील आंदोलनावेळी त्यांची फसवणूक झाली. सरकारने चर्चेची तयारी ठेवली पाहिजे. पण जरांगे पाटील यांना कसे गुंडाळता येईल, यासाठी बैठका सुरू झाल्या आहेत. कालची चीड ही फसवणुकीतून निर्माण झाली आहे.” असंही संजय राऊत यांनी यावेळी नमुद केलं.

मुंबई बँक निवडणुकीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांच्या राजकारणात फोडाफोडीशिवाय दुसरे काही स्थान नाही. त्यांच्या डोक्याचा साचा शोधायचा आहे. फोडा, झोडा आणि विकत घ्या, याशिवाय त्यांना काही सुचत नाही. शेणातील किड्यांना भाजपने मोठे केले आहे, तर ते किडे भाजपलाच चावणार. मुंबई बँकेच्या निवडणुकीत आमचेही पॅनेल असेल.” असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

 

Web Title: Sanjay raut criticizes parbhani mp sanjay jadhav over manoj jarange patil issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • Manoj Jarange Patil
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar Case : राजेंद्र शिंदेंची 9 तास चौकशी, पाच आरोपींना ओळखत असल्याचं सांगितलं; संजय राऊतांचा मोठा इशारा
1

Pradeep Purnekar Case : राजेंद्र शिंदेंची 9 तास चौकशी, पाच आरोपींना ओळखत असल्याचं सांगितलं; संजय राऊतांचा मोठा इशारा

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका
2

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका

तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात, सुटकेसाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत जोरदार आंदोलन
3

तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात, सुटकेसाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत जोरदार आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.