Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये,’ विजय वडेट्टीवारांचा मनोज जरांगेंना इशारा, ओबीसी आरक्षणावरून आक्रमक भूमिका

मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी जरांगेंवर टीका करत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 28, 2026 | 10:07 PM
‘मंत्र्यांनी जरांगेंचे पाय चेपून द्यावेत’; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

‘मंत्र्यांनी जरांगेंचे पाय चेपून द्यावेत’; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

Follow Us
Follow Us:
  • मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करणार.
  • विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, अशी भूमिका मांडली.
  • गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी अंतरवाली सराटीत जरांगेंची भेट घेतली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. आरक्षण, कुणबी प्रमाणपत्र आणि जात पडताळणीशी संबंधित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

राज्य सरकारच्या वतीने काही दिवसांपूर्वी तीन मंत्र्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन उपोषण न करण्याची विनंती केली होती. मात्र, आपल्या मागण्यांवर ठाम राहत जरांगे यांनी आंदोलनाचा निर्णय कायम ठेवला. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

विजय वडेट्टीवारांचा जरांगेंवर निशाणा

जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसींच्या वाट्याचे आरक्षण इतरांना देऊ नये, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. वडेट्टीवार म्हणाले की, आरक्षण द्यायचे असेल तर सरकारने त्यासाठी वेगळा मार्ग काढावा. ओबीसी समाजाच्या वाट्याला धक्का न लावता आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे. ‘जरांगेंच्या नादाला लागायचं ते ज्याचं त्याचं; मात्र ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये,’ असा इशाराही त्यांनी दिला.

‘जरांगे पाटलांचं आंदोलन फक्त स्वार्थासाठी, स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी..,’ मनोज जरांगे पाटलांवर भाजप आमदाराचा घणाघात

‘अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र’

यावेळी वडेट्टीवार यांनी आणखी एक दावा केला. अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, सध्या वातावरण संवेदनशील असल्याने संबंधितांची नावे जाहीर करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परिस्थिती शांत झाल्यानंतर नावे सांगू, असेही ते म्हणाले.

भाजप आमदाराचीही जरांगेंवर टीका

दरम्यान, भाजपचे तिरोडा-गोरेगावचे आमदार विजय रहांगडाले यांनीही मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर टीका केली आहे. जरांगे यांचे आंदोलन स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आणि स्वतःचे नाव मोठे करण्यासाठी असल्याचा आरोप त्यांनी केला.

त्यांच्या आंदोलनाचा उद्देश भाजप नेत्यांना लक्ष्य करणे आणि त्यांच्यावर टीका करणे एवढाच राहिला असल्याचे रहांगडाले यांनी म्हटले.

मराठा आरक्षणावर जरांगे पुन्हा आक्रमक; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत येणार? प्रसाद लाड यांनी दिली मोठी माहिती

विजयसिंह पंडित अंतरवाली सराटीत

दरम्यान, गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. जरांगे यांच्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीकडे राजकीयदृष्ट्याही महत्त्वाने पाहिले जात आहे.

जरांगे यांच्या उपोषणाला सुरुवात झाल्यानंतर सरकारची भूमिका काय राहते आणि मराठा तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पुढील घडामोडी कशा घडतात, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Vijay wadettiwar criticizes manoj jarange maratha reservation obc quota

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 10:07 PM

Topics:  

  • Manoj Jarange
  • Marath reservation
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

INDIA Alliance Supreme Court March: ज्ञानेश कुमारांविरोधात विरोधक आक्रमक!;  महाराष्ट्रातील १०० हून अधिक नेते दिल्लीत दाखल
1

INDIA Alliance Supreme Court March: ज्ञानेश कुमारांविरोधात विरोधक आक्रमक!; महाराष्ट्रातील १०० हून अधिक नेते दिल्लीत दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.