कॉंग्रेस अध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांची टीपू सुलतानसोबत तुलना केल्याने नितेश राणे आक्रमक झाले (फोटो - सोशल मीडिया)
छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी त्याच समकक्ष काम केलं आहे. त्यामुळे टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेलं पाहिजे, असे वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. यामुळे नवा वाद उफाळून आला आहे. यावरुन भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरुन भाजप मंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
हे देखील वाचा : टिपू सुलतान हा पाकिस्तानचा नायक तर क्रिकेटचा सामना कशाला? खासदार संजय राऊतांची मॅचवरुन राजकीय टीका
नितेश राणे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन काँग्रेस पक्षाला इशारा दिला आहे. ते म्हणाले की, टिप्या ची बरोबरी शिवरायांशी करणे यालाच जिहादी मानसिकता बोलतात..ज्या टिप्याने लाखो हिंदूचे धर्मांतर केले.. मंदिर तोडली.. फक्त इस्लाम वाढवण्यात लक्ष दिले..तो आमच्या शिवरायांच्या जवळ पास पण येऊ शकत नाही ! कांग्रेस प्रदेश अध्यक्षांनी आपल्या कार्यालयात शिवरायांचे फोटो काडून टिप्या चे लाऊन दाखवावे मग बघु शिवरायांचे मावळे त्यांना महाराष्ट्र कसे फिरू देतात ! असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.
हे देखील वाचा : पुण्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने; दगडफेकीत महिला पोलिस जखमी
हा वाद निर्माण झाल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देत संविधानाचा दाखला दिला आहे. सपकाळ यांनी लिहिले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे शिवराय आमचा स्वाभिमान आहे आणि टिपू सुलतान पराक्रमी आणि स्वराज्यप्रेमी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच ते इंग्रजाविरोधात लढत होते. ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे परकीयांशी लढत होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस ज्या संघ भाजपाच्या विचारातून येतात त्या विचारांचे लोक इंग्रजाची गुलामी आणि हेरगिरी करत होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला इतिहास शिकविण्याच्या भानगडीत पडू नये. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजप आणि आरएसएसच्या भगतसिंह कोश्यारी सह कुणी-कुणी काय-काय मुक्ताफळे उधळली आणि अवमान केलाय हे महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही. संविधानाच्या मूळ प्रतिवर शिवाजी महाराज व टिपू सुलतान दोघांचेही चित्र आहे, असे मत हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे शिवराय आमचा स्वाभिमान आहे आणि टिपू सुलतान पराक्रमी आणि स्वराज्यप्रेमी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच ते इंग्रजाविरोधात लढत होते. ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे परकीयांशी लढत होते त्यावेळी देवेंद्र… pic.twitter.com/xb4MnsBGHe — Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) February 14, 2026






