
MP Sanjay Raut press confernce target mahayuti and bjp over money in local body elections 2025
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत देखील अपडेट दिली आहे. खासदार राऊत म्हणाले की, “तब्येत सुधारतेय माझी पुर्ण सुधारायला वेळ लागतो. उद्धव ठाकरे यांचं माझ्यावर बारीक लक्ष आहे आता ही त्यांची परवानगी नाही, तरीही तुम्ही सर्व आलात थोडं तब्येतीत सुधारणा होतेय अजूनही होईल. आजारापेक्षा उपचार कठोर असतात. मला खात्री आहे डिसेंबरनंतर मी पूर्ण बरं होईल. रॅडिशनचा भाग संपलाय. रिकव्हरी सुरु आहे. माझ्यासारख्या माणूस स्वस्त बसू शकत नाही, असे खासदार राऊत म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : माणुसकी हारली! समोर सुरक्षा रक्षक कोसळला तरी जे पी नड्डा देत राहिले भाषण, व्हिडिओ आला समोर
पुढे संजय राऊत म्हणाले की, “नगरपालिका उद्या आहेत आणि शिंदे गँगनी सांगितलंय लक्ष्मी दर्शन होणार. याची दखल निवडणुक आयोगाने घेतली पाहिजे. काही ठिकाणी मतामागे दहा हजार, पंधरा हजार लक्ष्मी दर्शन सुरु आहे. नगरपालिका नगरपंचायत ज्या प्रकारे सुरु आहे महाष्ट्रात असा कधी पैसाचा पाऊस झाला नव्हता, असा देखील टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. महायुतीकडून अनेकदा प्रचारसभांमध्ये मते दिल्यानंतर निधी दिला जाईल,” असा दावा केला जात आहे. यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे.
सत्तेतील तीन पक्षांमध्ये स्पर्धा
माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाजपवर नाराजी व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला होता. शहाजीबापू पाटील यांनी भाजपने पैसे वाटप केल्याचा देखील आरोप केला होता. ते म्हणाले की, “नगर पालिका नगर पंचायत निवडणुकीत पैशाचा इतका खेळ झाला नव्हता. सरकार लढवत नव्हते स्थानिक पातळीवर लढत होते आता 5 -6 हेलिकॉप्टर, खाजगी विमान वापरत आहेत. नगरपालिकेसाठी सत्तेतल्या 3 पक्षातील स्पर्धा आहे. इतके कोट्यावढी रुपये खर्च करून कोणासाठी लढताय. आपापसात मारामाऱ्या सोडा. 3 पक्षातील स्पर्धा आहे,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
शिंदेंचे 35 आमदार फुटणार
पुढे ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांची शिवसेना बोलायला आम्ही तयार नाही त्यांचा कोथला अमित शहा काढणार लिहून घ्या त्यांनी आमचा काढायचा प्रयत्न केला होता.शिंदेंचे 35 आमदार फुटणार. रवींद्र चव्हाण यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून यासाठी नेमणूक त्यासाठीच केलीये. त्यांना वाटतं दिल्लीचे 2 नेते आमच्या पाठीशी पण ते कोणाचेच नाहीत. शिंदे यांचा पक्ष फुटलेला आहे अमित शहाने निर्माण केलेला गट आहे. यांनी कधी शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्यात? पैशाच्या ताकदीवर निवडणुका लढणे म्हणजेच लोकशाही नाही,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी महायुतीला लगावला आहे.
कशाप्रकारे पैशाचं वाटप होतंय हे दाखवण्याच प्रयत्न
खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या नेतृत्वावर आणि नेत्यांवर टीकास्त्र डागले. ते म्हणाले की, “यशवंतराव चव्हाण पासून या राज्याचे नेतृत्व पाहिलेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा होती. देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण शिंदे यांना कळतं नसेल तर त्यांनी करू नये. फक्त पैशावर राजकारण चालत नाही. पैशावर लोक विकत घेता येतात. 10 आणि 15 हजार जनतेची किंमत आहे का? आमची जनता खुश आहे. Bjp चे नारायण राणे खासदार आणि आमदार निलेश राणे यांचं अभिनंदन त्यांनी कशाप्रकारे पैशाचं वाटप होतंय हे दाखवण्याच प्रयत्न केलाय. याचा अर्थ शिवसेना पैसे वाटत नाही का जास्त करतात,” असे देखील खासदार राऊत म्हणाले आहेत.