Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Gas Shortage :”नाल्यातून गॅस निर्मिती अन् पुन्हा एकदा बैलगाड्यांचे युग…! गॅस तुटवड्यावरुन खासदार संजय राऊतांचे टीकास्त्र

खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत गॅस तुटवड्यावरुन मोदी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच आता पुन्हा एकदा बैलगाडी युग सुरु होईल अशी उपरोधिक टीका केली.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 11, 2026 | 11:25 AM
MP sanjay Raut target modi government over LPG Gas shortage Iran-Israel War

MP sanjay Raut target modi government over LPG Gas shortage Iran-Israel War

Follow Us
Close
Follow Us:
  • खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद
  • गॅस आणि तेल तुटवड्यावरुन मोदी सरकारवर टीका
  • मोदी भक्त इंधन टंचाईवर एक शब्दही बोलत नाही – राऊत
Sanjay Raut PC : मुंबई : आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या परिस्थितीमुळे देशामध्ये तेल आणि गॅसची कमतरता भासू लागली आहे. व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून घरगुती गॅसवर (LPG Gas) देखील नियम लावण्यात आले आहे. इराण आणि इस्रायल अमेरिकेमध्ये सुरु झालेल्या युद्धाची झळ भारतीय सामान्य नागरिकांपर्यंत पोहचली आहे. यामुळे विरोधकांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. याच मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी युद्धाचे पडसाद भारतामध्ये पडू लागल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ही मोदी सरकारची चूक असल्याची टीका देखील खासदार राऊत यांनी केली आहे. संजय राऊत म्हणाले की, “केंद्र सरकारचे भारताला शंभर वर्षे मागे नेण्याचे स्वप्न आता पूर्ण होताना दिसत आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे गाड्या रस्त्यावर धावण्याऐवजी पुन्हा एकदा बैलगाड्यांचे युग येईल की काय, अशी भीती संजय राऊतांनी व्यक्त केली. यावेळी त्यांना महाराष्ट्रात परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, पण मोदी आणि त्यांचे भक्त या इंधन टंचाईवर एक शब्दही बोलायला तयार नाहीत,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

हे देखील वाचा : उद्या राजकारणात भूकंप येणार? संसदेत Om Birla यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; BJP चा प्लॅन काय?

पुढे संजय राऊत यांनी मोदी सरकारवर उपरोधक टीका केली. ते म्हणाले की, “पंतप्रधान मोदी हे एक मोठे संशोधक आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी नाल्यातून गॅस निर्मिती करण्याचा शोध लावला होता. नाल्यात पाईप टाकून त्यातून निघणाऱ्या गॅसवर घरातील चुली पेटवता येतात, असे त्यांनी सांगितले होते. आता देशावर इंधनाचे संकट असताना मोदींच्या या संशोधनाचा फायदा देशाला व्हायला हवा. मोदींच्या या संकल्पनेतून मुंबईतील मिठी नदीच्या किनाऱ्यावर गॅस निर्मितीचा पहिला पथदर्शी प्रकल्प सुरू करावा. या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींना आवर्जून बोलवावे. या कामासाठी लागणारे पाईप्स किंवा इतर आवश्यक साहित्याची व्यवस्था शिवसेना म्हणून आम्ही करायला तयार आहोत. मिठी नदी यशस्वी झाली की यमुना नदीवरही असाच प्रयोग करता येईल,” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केली आहे.

हे देखील वाचा : “हे परराष्ट्र धोरणाचे अपयश..! गॅस तुटवड्यावरुन विरोधकांचा मोदी सरकारवर निशाणा

“सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथील इंजिनिअरिंग प्लांट्सना गॅसची मोठी गरज असते. मात्र, पुरवठा थांबल्याने हे उद्योग आता पूर्णपणे संकटात आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि चाकण येथे असणाऱ्या ऑटोमोबाईल हबला मोठ्या प्रमाणात इंधन लागते मात्र इंधन टंचाईचा मोठा फटका बसला आहे. या संकटामुळे केवळ उद्योगच नाही, तर शेतकरी, कष्टकरी वर्ग, हॉटेल व्यावसायिक आणि टाईल्स उत्पादकही भरडले जात आहेत. हॉटेल्स व्यवसाय बंद आहेत,” अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला.

Web Title: Mp sanjay raut target modi government over lpg gas shortage iran israel war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • Iran-Israel War
  • LPG Gas
  • Modi government
  • MP Sanjay Raut

संबंधित बातम्या

गॅस महाग आणि बुकिंगला 25 दिवस! बजेटमध्ये मिळणारी ही किचन उपकरणे करतील मोठी बचत, आत्ताच करा खरेदी
1

गॅस महाग आणि बुकिंगला 25 दिवस! बजेटमध्ये मिळणारी ही किचन उपकरणे करतील मोठी बचत, आत्ताच करा खरेदी

US Warns Russia : पश्चिम आशियातील युद्धादरम्यान अमेरिकेने आता रशियालाच दिला थेट इशारा; ‘युद्धापासून दूर राहा…’
2

US Warns Russia : पश्चिम आशियातील युद्धादरम्यान अमेरिकेने आता रशियालाच दिला थेट इशारा; ‘युद्धापासून दूर राहा…’

Kolhapur Gas Shortage :  सिलेंडर खरेदीसाठी नागरिकांची गॅस एजन्सी समोर गर्दी
3

Kolhapur Gas Shortage : सिलेंडर खरेदीसाठी नागरिकांची गॅस एजन्सी समोर गर्दी

Political News : “हे परराष्ट्र धोरणाचे अपयश..! गॅस तुटवड्यावरुन विरोधकांचा मोदी सरकारवर निशाणा
4

Political News : “हे परराष्ट्र धोरणाचे अपयश..! गॅस तुटवड्यावरुन विरोधकांचा मोदी सरकारवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.