Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati by election : “दादा खरंच गेलाय का…? तो शेवटचा फोन अन् भेट; MP सुप्रिया सुळेंनी मांडल्या भावना

Supriya Sule Pune Visit : खासदार सुप्रिया सुळे या पुणे दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी त्यांनी बारामती पोटनिवडणूक आणि महिला आरक्षण विधेयक यावर भाष्य केले.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 21, 2026 | 12:29 PM
MP Supriya sule pune press conference on baramati by election and women reservation political news

MP Supriya sule pune press conference on baramati by election and women reservation political news

Follow Us
Follow Us:
  • बारामती पोटनिवडणुकीसाठी प्रचाराची सांगता सभा
  • खासदार सुप्रिया सुळेंचा पुणे दौरा
  • खासदार सुळेंनी साधला माध्यमांशी संवाद
Supriya Sule Live : पुणे : बारामतीमध्ये दिवंगत नेते अजित पवारांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीला दुःखाची किनार आहे. घरातील व्यक्तीचे निधन झाल्यामुळे शरद पवार गटाने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सुनेत्रा पवारांसाठी शरद पवार गट प्रचार देखील करत आहे. आमदार रोहित पवार हे स्वतः गाठीभेटी घेत असून हा प्रचार महायुतीसाठी नाही तर सुनेत्रा काकींसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Baramati by election)याचबरोबर यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बारामती पोटनिवडणूक आणि अजित पवारांबाबत आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की, “दादांची एनर्जी तुम्ही पाहिलेली आहे. आजही अंगावर काटा येते. सकाळी 8.30 वाजता विमान पडल्याचा तो फोन आलेला. तो दिवस आणि आजचा दिवस असं वाटतं, दादा खरच गेलाय का? कधी कधी असं वाटतं की दादा खरच गेलाय का, अशी भावना मनात येते. शेवटची ती भेट, एक फोन या गोष्टी मनात राहिल्या. विमान पडलं कसं? एका सेकंदात सगळं संपलं” अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी कडू आठवण सांगितली.

हे देखील वाचा : RSS मोहन भागवत यांच्या Z+ सुरक्षेचा खर्च कोण उचलणार? मुंबई हायकोर्टाचे सरसंघचालकांच्या सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण विधान

पुढे त्या म्हणाल्या की, “बारामतीत बाबा सगळं इलेक्शन संपवून यायचे. प्रचाराची शेवटची सभा घ्यायचे. दादाने तीच परंपरा कायम ठेवली. दादा आणि साहेब फॉर्म भरणार आणि शेवटच्या सभेला येणार. बारामती लोकसभा मतदारसंघात आम्ही कुटुंब म्हणून काम करतो. कौटुंबिक विश्वासाची नाती आहेत. काही कमी-जास्त झालं असेल, म्हणून आमच्या मनात, नात्यात कधी अंतर आलेलं नाही. इथून पुढे कधी येऊ देणारही नाही. दादा गेल्यानंतरची सभा आहे. मला अंतकरणातून खूप दु:ख आहे. जड अंतकरणाने मी बारामतीला जात आहे. माझा भाऊ गेल्यानंतरची ही परिस्थिती आहे. दु:ख आहे,” अशा शब्दांत खासदार सुळे यांनी भावना व्यक्त केल्या.

हे देखील वाचा : वित्तीय समिती बंद करणार नाही; पुणे महापालिका आयुक्तांनी थेट नगरसेवकांनाच ठणकावले

याचबरोबर संसदेच्या नारी शक्ती वंदन विधेयकावर देखील खासदार सुळेंनी मत व्यक्त केले. त्यांनी यावर मुक्त चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले आव्हान दिले. त्या म्हणाल्या की, “मुख्यमंत्री म्हणतायेत की, महिलांना 33 टक्के आरक्षण देऊ शकतो. पण पक्षात देऊ शकत नाही. माझं म्हणणं असं आहे की, भाजपला जर मनापासून महिलांना 33 टक्के आरक्षण द्यायचं असेल, तर त्यांना कोणी थांबवलेलं नाही. आम्ही रात्रभर बसायला तयार होतो, भाजप का करत नाहीय?हे बिल 2023 रोजी पास झालं. अडीचवर्ष बिल पडून होतं. अंमलबजावणी का झाली नाही? ममता बॅनर्जी यांच्या पक्षात 40 ते 50 टक्के महिला खासदार आहेत“मुख्यमंत्र्यांनी चर्चेला बोलावलं तर अतिशय विनम्रपणे आमची बाजू मांडायला जाऊ. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सोयीने वेळ द्यावा,” असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

Web Title: Mp supriya sule pune press conference on baramati by election and women reservation political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • Baramati by-election
  • pune news
  • supriya sule

संबंधित बातम्या

Pune Police Transfer: पुणे पोलिसांची जम्बो बदली यादी जाहीर: कोथरूड, फरासखानासह महत्त्वाच्या ठाण्यांचे अधिकारी बदलले
1

Pune Police Transfer: पुणे पोलिसांची जम्बो बदली यादी जाहीर: कोथरूड, फरासखानासह महत्त्वाच्या ठाण्यांचे अधिकारी बदलले

Pune illegal abortion racket: गर्भलिंग निदान; केडगाव परिसरात बेकायदा रॅकेटचा पर्दाफाश; दोन वर्षात ५००हून अधिक प्रकारांची नोंद
2

Pune illegal abortion racket: गर्भलिंग निदान; केडगाव परिसरात बेकायदा रॅकेटचा पर्दाफाश; दोन वर्षात ५००हून अधिक प्रकारांची नोंद

Gram Panchayat Gairan Lands: पुणे जिल्ह्यातील २ हजार हेक्टरहून अधिक गायरान जमिनींचा प्रश्न ऐरणीवर
3

Gram Panchayat Gairan Lands: पुणे जिल्ह्यातील २ हजार हेक्टरहून अधिक गायरान जमिनींचा प्रश्न ऐरणीवर

Post Office Savings Scheme : ज्येष्ठ नागरिकांसाठी सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेतून दरमहा मिळवा २० हजारांहून अधिक कमाई
4

Post Office Savings Scheme : ज्येष्ठ नागरिकांसाठी सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेतून दरमहा मिळवा २० हजारांहून अधिक कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.