Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मराठी अस्मितेची तिरडी उचलून काय मिळवलंत?” उद्धव ठाकरेंच्या नेत्याने एकनाथ शिंदेंना विचारले ‘हे’ 7 धडकी भरवणारे प्रश्न

मुंबई महानगरपालिकेत महायुतीचा महापौर बसणार हे जवळजवळ ठरलं आहे. मात्र, या सर्वात उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काही प्रश्न विचारले आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 17, 2026 | 05:45 PM
उद्धव ठाकरेंच्या नेत्याने एकनाथ शिंदेंना विचारले 'हे' 7 धडकी भरवणारे प्रश्न

उद्धव ठाकरेंच्या नेत्याने एकनाथ शिंदेंना विचारले 'हे' 7 धडकी भरवणारे प्रश्न

Follow Us
Follow Us:
  • पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेत भाजपाचा महापौर बसणार
  • महायुतीला मुंबईत मोठे यश
  • अखिल चित्रे यांनी एकनाथ शिंदेंना विचारले घणाघाती प्रश्न
यंदाची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक विशेष महत्वाची होती. याचे कारण म्हणजे 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र येऊन ही महापालिकेची निवडणूक लढत होते. मात्र, अपेक्षेप्रमाणे त्यांना विजय मिळवता आला नाही. तर दुसरीकडे, मुंबईत सर्वाधिक जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यात भाजपाला साथ मिळाली ती शिंदेंच्या शिवसेनेची.

Solapur Municipal Election Result 2026: सोलापुरात फडणवीसांची यशस्वी रणनीती; काँग्रेसची वाताहत; शिंदे गट आणि पवार गटाचा अपेक्षाभंग

मुंबईत ठाकरेंची कडवी झुंज

तब्बल १९ वर्षांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी आपले बालेकिल्ले टिकवून ठेवत भाजप–शिवसेना महायुतीला चांगलीच टक्कर दिली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेने ७१ जागांवर यश मिळवले. मात्र भाजप–शिवसेना महायुतीने एकूण ११८ जागा जिंकत स्पष्ट बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. यात सर्वाधिक ८९ जागा भाजपने जिंकल्या असून, मुंबईला भाजपचा पहिला मराठी महापौर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपची निर्णायक बाजी आणि त्यांना मिळालेली शिवसेनेची साथ यामुळे गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेवर असलेली ठाकरे यांची सत्ता संपुष्टात आली आहे. परिणामी, ठाकरे गटाला आता विरोधी बाकांवर बसावे लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका करत त्यांना काही प्रश्न विचारले आहे. ट्विटरवर त्यांनी एकनाथ शिंदेंना टॅग करत ७ घणाघाती प्रश्न विचारले आहे.

“ना विचार, ना भूमिका; फक्त….”, महापालिका निकालांवरून ‘सामना’तून प्रहार; एकनाथ शिंदेंवर ‘शहा सेना’ म्हणून टीका

हे ७ प्रश्न एकनाथ शिंदेंना विचार करायला भाग पाडतील!

अखिल चित्रे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एकनाथ शिंदेंना ७ प्रश्न विचारले आहे. हे प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत.

      • स्वतःला शिवसेना आणि स्व. बाळासाहेबांचे पाईक म्हणवणाऱ्यांनो काय मिळवलंत ?
      • ज्या मुंबईत स्व. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापिली तिथून शिवसेना हद्दपार करण्याच्या कटाचे भागीदार होऊन काय मिळवलंत ?
      • “मुंबईत शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे!” ह्या स्व. बाळासाहेबांच्या निर्धाराला मूठमाती देऊन काय मिळवलंत ?
      • सत्तेच्या लाचारीत मश्गूल होऊन, शिवसेना फोडून, भाजपाला पाठिंबा देऊन मुंबई कमळीच्या दावणीला बांधून काय मिळवलंत ?
      • चिन्ह, पक्ष, नेते आणि नंतर शिवसेनेचे ५६ नगरसेवक फोडून निवडून आणलीत फक्त २८ माणसं, मग शिवसैनिकाला दुबळं करुन काय मिळवलंत ?
      • शिवसेनेचं प्रभुत्व नाकारून आता भाजपाचा महापौर होईल, राजधानीतून मराठी अस्मितेची तिरडी उचलून काय मिळवलंत ?
      • थैलीशहांना आपली मुंबई स्वार्थासाठी विकून काय मिळवलंत ?
    काय मिळवलंत ? @mieknathshinde
    ♦️ स्वतःला शिवसेना आणि स्व. बाळासाहेबांचे पाईक म्हणवणाऱ्यांनो काय मिळवलंत ?
    ♦️ ज्या मुंबईत स्व. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापिली तिथून शिवसेना हद्दपार करण्याच्या कटाचे भागीदार होऊन काय मिळवलंत ?
    ♦️ “मुंबईत शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे!” ह्या स्व.… pic.twitter.com/GCPSazV3oK
    — Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) January 16, 2026

तुमच्याकडे एकंच उत्तर असेल कि, ‘आलिशान आयुष्य मिळवलं’ पण उद्या जेव्हा मराठी माणसाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा मिंद्यांनो तुम्ही मुंबईतून शिवसेना संपवायच्या कटात सामील होतात ह्याची इतिहास नोंद घेईलच… आणि हा ठपका घेऊनच तुमचे वारसदार जगतील हे लक्षात ठेवा !

 

Web Title: Mumbai bmc election results 2026 uddhav thackeray group leader akhil chitre asked question to eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Eknath Shinde
  • Mumbai Municipal Corporation

संबंधित बातम्या

Shrikant Shinde : मतदार यादी पुनरिक्षण आणि निवडणूक तयारीसाठी श्रीकांत शिंदे खान्देशात; ‘शिवसंवाद दौऱ्याचा’ चौथा टप्पा
1

Shrikant Shinde : मतदार यादी पुनरिक्षण आणि निवडणूक तयारीसाठी श्रीकांत शिंदे खान्देशात; ‘शिवसंवाद दौऱ्याचा’ चौथा टप्पा

डोंबिवलीच्या राजकारणात खळबळ! शिंदेसेनेची मोठी इनकमिंग; भाजपच्या चार माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
2

डोंबिवलीच्या राजकारणात खळबळ! शिंदेसेनेची मोठी इनकमिंग; भाजपच्या चार माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

‘ममता बॅनर्जींचे सरकारच गेले नाही, तर आता…’, ममता बॅनर्जींच्या पक्षातील फुटीवर शिंदे गटाचे नेत्याचे मोठे वक्तव्य
3

‘ममता बॅनर्जींचे सरकारच गेले नाही, तर आता…’, ममता बॅनर्जींच्या पक्षातील फुटीवर शिंदे गटाचे नेत्याचे मोठे वक्तव्य

Vidhan Parishad Election 2026: शिंदे गटाचे  गोपीकिशन व विप्लव बाजोरियांवर गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?
4

Vidhan Parishad Election 2026: शिंदे गटाचे गोपीकिशन व विप्लव बाजोरियांवर गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.