Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची जोरदार तयारी; रविंद्र चव्हाणांचा विदर्भ दौरा, संघटनात्मक बैठकींना वेग

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने संघटनात्मक तयारीला वेग दिला आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी विदर्भातील विविध जिल्ह्यांचा दौरा करत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

  • By विवेक
Updated On: Aug 14, 2026 | 02:17 PM
Ravindra Chavan

Ravindra Chavan

Follow Us
Follow Us:
  • रविंद्र चव्हाण यांच्या दोन दिवसीय दौऱ्यात विदर्भातील विविध संघटनात्मक जिल्ह्यांच्या बैठका.
  • निवडणूक नियोजन आणि संघटनात्मक बांधणीवर पदाधिकारी-कार्यकर्त्यांना मार्गदर्शन.
  • ‘नागपूर पदवीधर मतदारसंघात आमचाच विजय होईल’, असा रविंद्र चव्हाणांचा विश्वास.
 

नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक तयारीला वेग दिला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी विदर्भाचा दोन दिवसीय दौरा करत विविध संघटनात्मक जिल्ह्यांमध्ये बैठकांचा धडाका लावला. या दौऱ्यानंतर पक्षाची यंत्रणा निवडणुकीसाठी अधिक सक्रिय झाल्याचे चित्र आहे.

रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर ग्रामीण (रामटेक), चंद्रपूर महानगर व ग्रामीण, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर महानगर, काटोल आणि वर्धा या संघटनात्मक जिल्ह्यांच्या बैठका पार पडल्या. या बैठकींमध्ये संघटनात्मक बांधणी, निवडणूक नियोजन आणि कार्यपद्धतीचा आढावा घेण्यात आला. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले.

ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार; स्थानिक नेत्यांशी संवाद

चंद्रपूरमधील बैठकीदरम्यान ब्रह्मपुरी येथील १९८० पासून पक्षकार्यात सक्रिय असलेल्या प्रा. शेख सर यांचा रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निष्ठावंत आणि ज्येष्ठ कार्यकर्ते हे पक्षाचे आधारस्तंभ असल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

Rahul Gandhi: ‘…RSS ला पाठिंबा देईन, मी त्यांचे रक्षण करेन’, राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण

दौऱ्यादरम्यान रामटेकचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया, माजी आमदार अतुल देशकर, ज्येष्ठ नेते किसन नागदेवे, माजी आमदार कृष्णा गजभिये आणि आमदार विनोद अग्रवाल यांच्या निवासस्थानी तसेच कार्यालयात चव्हाण यांनी सदिच्छा भेटी दिल्या. यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी त्यांनी थेट संवाद साधला.

या बैठकांना मंत्री डॉ. अशोक उईके, राज्यमंत्री तथा पालकमंत्री पंकज भोयर, प्रदेश सरचिटणीस संजय कुटे यांच्यासह अनेक आमदार, माजी खासदार, माजी आमदार आणि पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

‘नागपूर पदवीधर मतदारसंघात आमचाच विजय होईल’

दोन दिवसांच्या दौऱ्यात झालेल्या सलग बैठका आणि कार्यकर्त्यांशी संवादामुळे भाजपच्या निवडणूक तयारीला नवी ऊर्जा मिळाल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले, ““ आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात विदर्भात विकासाची गंगा प्रवाहित झाली आहे. नागपूर ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पुण्यभूमी असून विदर्भ हा भाजपचा भक्कम बालेकिल्ला आहे. या दौऱ्यात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि विजयाचा आत्मविश्वास दिसला. नागपूर पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी आम्ही सर्व ताकदीनिशी सज्ज आहोत. आमचाच विजय होईल, याचा पूर्ण विश्वास आहे.”

NCP Mumbai President: पार्थ पवारांच्या ‘एंट्री’नंतर राष्ट्रवादीत नवी समीकरणे; झिशान सिद्दीकींवर मुंबईची जबाबदारी?

चव्हाण यांच्या दौऱ्यामुळे विदर्भातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी स्पष्ट दिशा मिळाल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Web Title: Nagpur graduate constituency bjp ravindra chavan vidarbha tour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • BJP
  • Nagpur
  • Ravindra Chavan

संबंधित बातम्या

Nagpur Accident : वाढदिवसाच्या पार्टीला जात होते, वाटेतच मृत्यूने दिली भेट, अपघाताचा थरारक Video Viral
1

Nagpur Accident : वाढदिवसाच्या पार्टीला जात होते, वाटेतच मृत्यूने दिली भेट, अपघाताचा थरारक Video Viral

Rahul Gandhi: ‘…RSS ला पाठिंबा देईन, मी त्यांचे रक्षण करेन’, राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण
2

Rahul Gandhi: ‘…RSS ला पाठिंबा देईन, मी त्यांचे रक्षण करेन’, राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण

Poll Tracker Mood Of India Survey: आज लोकसभा निवडणूक झाल्यास एनडीएला धक्का?  ‘मूड ऑफ इंडिया’ सर्व्हेचा खळबळजनक अंदाज
3

Poll Tracker Mood Of India Survey: आज लोकसभा निवडणूक झाल्यास एनडीएला धक्का? ‘मूड ऑफ इंडिया’ सर्व्हेचा खळबळजनक अंदाज

BJP Congress Poster War: शाहांवरून संसदेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये राडा; विद्यार्थी आंदोलनाचा संसदेत भडका
4

BJP Congress Poster War: शाहांवरून संसदेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये राडा; विद्यार्थी आंदोलनाचा संसदेत भडका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.