Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivendraraje Bhosale News: कामाच्या दर्जात तडजोड नको! मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे नागपुरात सक्त आदेश

Shivendraraje Bhosale News: छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) मुला-मुलींच्या वसतिगृह, विभागीय कार्यालय आणि ग्रंथालय इमारतीच्या बांधकामाची त्यांनी पाहणी केली.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 27, 2026 | 05:19 PM
Nagpur Sports Hub And PWD Projects

Nagpur Sports Hub And PWD Projects

Follow Us
Follow Us:
  • सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून नागपूर जिल्ह्यातील विकासकामांची पाहणी.
  • कामाच्या दर्जात कसलीही तडजोड न करता सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे सक्त निर्देश.
  • विदर्भातील पहिली G+16 मजली ‘सारथी’ संस्था इमारत; ५०८ विद्यार्थ्यांची राहणार सोय.
Shivendraraje Bhosale Nagpur Visit: नागपूर जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध विकासकामे सुरु आहेत. प्रत्येक काम जनहिताचे आहे, याचे भान ठेवून विभागाने कामाच्या दर्जाबाबत कसलीही तडजोड करू नये तसेच काम वेळेतच पूर्ण झाले पाहिजे याचे बंधन पाळावे, अशा सक्त सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्या.

शिवेंद्रसिंहराजे यांनी नागपूर जिल्हा दौऱ्यावेळी विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) मुलांचे व मुलींचे वसतिगृह, विभागीय कार्यालय आणि ग्रंथालय इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. विदर्भातील शासकीय संस्थेसाठी प्रथमच G+16 उंच इमारतीच्या माध्यमातून आधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. विद्यार्थ्यांसाठी सुमारे ५०८ विद्यार्थ्यांची निवासक्षमता, आधुनिक ग्रंथालय, ई-लायब्ररी, प्रशिक्षण केंद्र आणि प्रशासकीय सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. या कामाची पाहणी करून त्यांनी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

Abhijeet Dipke on Saurav Das: ‘सौरव, आता तुझी वेळ येणार!’; अभिजीत दीपकेंचा सहकाऱ्याला गमतीशीर इशारा

शिवेंद्रसिंहराजे यांनी नागपूर स्पोर्ट्स हब प्रकल्पाची पाहणी करून कामाची प्रगती, प्रस्तावित क्रीडा सुविधा आणि प्रकल्पाच्या पुढील नियोजनाचा आढावा घेतला. तसेच सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नागपूर अंतर्गत विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी मुख्य अभियंता संभाजी माने आणि सार्वजनिक बांधकाम मंडळ, नागपूरच्या अधीक्षक अभियंता श्रीमती निता ठाकरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

विभागातील रिक्त पदांची सद्यःस्थिती, जिल्हानिहाय पूल व रस्त्यांची माहिती, वृक्षलागवड टप्पा-२, इमारतींचे परिरक्षण व दुरुस्ती, जनसुविधा केंद्रांसाठी प्रस्तावित जागा, नाबार्ड-३१ अंतर्गत कामांची प्रगती, हायब्रिड अॅन्युइटी योजनेंतर्गत सुरू असलेली कामे, खड्डे भरण्याची सद्यःस्थिती तसेच ‘अमृतकाल रस्ते विकास योजना’ आराखड्याचा आढावा घेऊन विकासकामे वेळेत, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण व्हावीत, तसेच कामांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये, अशा स्पष्ट सूचना शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. नागपूर विभागातील पायाभूत सुविधांची कामे अधिक गतिमान आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनावरून सासवडमध्ये कौटुंबिक वाद विकोपाला

 

Web Title: Nagpur newspwd minister shivendraraje bhosale reviews development projects in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • Satara

संबंधित बातम्या

Satara Ghevda Farmers News: दिल्लीत मान पण पीक विम्यात नापास! कोरेगावचा प्रसिद्ध घेवडा संकटात; शेतकरी आक्रमक
1

Satara Ghevda Farmers News: दिल्लीत मान पण पीक विम्यात नापास! कोरेगावचा प्रसिद्ध घेवडा संकटात; शेतकरी आक्रमक

Satara News : सातारा-जावलीच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या महत्त्वपूर्ण सूचना
2

Satara News : सातारा-जावलीच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या महत्त्वपूर्ण सूचना

Advocates Protection Act: वकिलांवर हल्ले सुरूच; संरक्षण कायदा कधी? निकम बंधूंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
3

Advocates Protection Act: वकिलांवर हल्ले सुरूच; संरक्षण कायदा कधी? निकम बंधूंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी! कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलाधिकारीपदी नियुक्ती
4

सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी! कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलाधिकारीपदी नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.