Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : नितीन गडकरी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी! नागपूर पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

Political News : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 24, 2026 | 01:31 PM
Nitin Gadkari

Nitin Gadkari

Follow Us
Follow Us:

Nitin Gadkari receives death threat : नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषेत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. नागपूर पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

अखिल भारतीय हिंदू महासभेच्या अध्यक्षांची तक्रार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील नांगलोई येथील रहिवासी आणि अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुमित कुमार चौहान हे २२ एप्रिल रोजी वैयक्तिक कामासाठी नागपूरला आले होते. शहरातील यशवंत स्टेडियम परिसरात असताना, त्यांना ‘सनातनी शेर’ नावाच्या अकाऊंटवरून फेसबुकवर अपलोड केलेला एक व्हिडिओ आढळला. व्हिडिओचे गांभीर्य लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

हे देखील वाचा : पश्चिम बंगालमध्ये प्रचंड बहुमत..! अमित शाहांनी पहिल्या टप्प्यानंतरच सांगितला मॅझिकल आकडा

काय होते व्हिडिओमध्ये?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, आरोपीने नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध अत्यंत अपमानास्पद आणि आक्षेपार्ह भाषा वापरली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही; त्याने गडकरी कुटुंबाला जीवे मारण्याची थेट धमकी दिली आणि इतर अनेक व्हिडिओंद्वारे धार्मिक भावना भडकवण्याचाही प्रयत्न केला. सदर व्हिडिओमध्ये केलेले आरोप हे विविध समुदायांमध्ये तणाव निर्माण करण्याच्या आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या उद्देशाने केले गेले होते.

आरोपीचे बनावट अकाऊंट 

तक्रार मिळाल्यानंतर, धंतोली पोलिसांनी तांत्रिक पथकाच्या मदतीने तपास सुरू केला. सायबर सेलच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचे ठिकाण शोधून काढले, जे नागपूर असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीची ओळख आयुष रमेश चंद्र अग्रवाल (रहिवासी: महालक्ष्मी नगर, मानेवाडा चौक, नागपूर) अशी पटली आहे. तपासात असे उघड झाले की, आयुषने आपली ओळख लपवण्यासाठी एक बनावट फेसबुक प्रोफाइल तयार केले होते, ज्याद्वारे तो अशा प्रकारची प्रक्षोभक सामग्री पोस्ट करत होता.

हे देखील वाचा : मराठी शाळा बंद पाडण्याचा शासनाचा डाव; नेमकं काय आहे प्रकरण?

नागपूर पोलिसांनी आरोपी आयुष अग्रवाल याला अटक केली असून, त्याच्यावर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या धमकीमागे कोणती दुसरी संघटना आहे का, किंवा आरोपीने वैयक्तिक द्वेषामुळे किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे का, याचा तपास पोलीस आता करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या प्रक्षोभक किंवा धमकीवजा पोस्ट शेअर करू नयेत.

Web Title: Nagpur police arrest accused who issued death threats to nitin gadkari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • Nagpur Crime
  • Nitin Gadkari
  • political news

संबंधित बातम्या

Nitin Gadkari: ‘मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला मी येणार नाही, मला लाज वाटते…’,नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
1

Nitin Gadkari: ‘मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला मी येणार नाही, मला लाज वाटते…’,नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य

Nagpur Crime : आईच निघाली कैदाशीण, नागपुरात न्यूड फोटो काढण्यासाठी १८ वर्षांच्या मुलीवर दबाव; FIR दाखल
2

Nagpur Crime : आईच निघाली कैदाशीण, नागपुरात न्यूड फोटो काढण्यासाठी १८ वर्षांच्या मुलीवर दबाव; FIR दाखल

पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांमधील मतभेद होणार दूर? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ करणार मध्यस्थी
3

पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांमधील मतभेद होणार दूर? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ करणार मध्यस्थी

‘वाघाला डिवचू नका, वाघ जागा झाला तर भारी पडेल’; शिवेंद्रराजेंच्या डरकाळीने जावळीतील राजकारण तापले
4

‘वाघाला डिवचू नका, वाघ जागा झाला तर भारी पडेल’; शिवेंद्रराजेंच्या डरकाळीने जावळीतील राजकारण तापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.