परभणीमध्ये जिल्हा परिषदेचा निकाल जाहीर झाला असून एका पक्षाला बहुमत मिळाले नाही (फोटो - सोशल मीडिया)
यावेळी निकाल लागल्यानंतर कुण्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि उबाठा हे पक्ष या निवडणुकीत स्वतंत्र लढले. बहुतांश मतदारसंघात दुरंगी तर कुठे तिरंगी लढती झाल्या. तर काही ठिकाणी शिवसेना क भाजप पक्ष समोरासमोर होते. पक्षीया बलाबलानुसार भाजप पहिल्या स्थानावर राहिली तरीही स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही. ५४ गटांपैकी भाजपने ४९, राष्ट्रवादी काँग्रेसने ४२, शिवसेनेने २५, ठाकरे सेनेने २३. काँग्रेसने २१ जागा लढवल्या होत्या. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत एकत्रित शिवसेनेचे १२ जिंकल्या होत्या. यावेळेस शिवसेना दोन पक्षात विभागल्या तरीही दोन्ही मिळून ११ जागा कायम राहिल्या असून एका जागेचा फटका बसल्याचे दिसत आहे.
हे देखील वाचा : “सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा हिंदू,” नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले…
राष्ट्रवादी (अजित पवार गट) ची झाली घसरण
मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे २४ सदस्य निवडून आले होते. यावेळेस राष्ट्रवादीला अजित पवार गटाला १५ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
कंग्रेस पक्षाच्या जागा मात्र ६ वरून ३ वर घटल्या आहेत. मागील वेळची अपक्षांची संख्या देखील १ वर आली आहे. आता तब्बल नऊ वर्षानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत उलटफेर पाहायला मिळत आहे. शिवसेना दोन गटात विभागल्यावा परिणाम या निवडणुकीत दिसुन आला. यंदा बहुरंगी लढत पाहायला मिळाल्या, चार ही गटात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे रा.काँ. ने वर्चस्व राखले.
हे देखील वाचा : म्हाळुंगे-नाणेकरवाडी गटात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला; पै. गणेश बोत्रे व आश्वनि तरस यांचा दणदणीत विजय
भाजपने गंगाखेड, पालम, सेलू, जिंतूर तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने पाथरी, मानवत, सेलू पंचायत समित्यांवर वर्चस्व राखले आहे.
गटाने तुल्यबळ उमेदवार उभे केले होते. त्यांच्या मागे पक्षाने पूर्ण ताकद उभी केल्याचे चित्र दिसून आले, तर शिवसेना उबाता गटाला केवळ दोन गटातच उमेदवार उभे करता आले. काँग्रेसला फार वाईट दिवस आले असून केवळ एका गटातच उमेदवार उभा करता आला. वंचित बहुजन आधाडी ने तीन गटात उमेदवार उभे केले होते. निकाल जाहीर झाल्यानंतर खरी लढत राज्याच्या महायुतीत घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, आणि शिवसेना शिंदे गटातच झाल्याचे चित्र दिसून आले.






