राहुल गांधींविरोधात हल्द्वानीत पोलिसांत FIR दाखल; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
मिळालेल्या वृत्तानुसार, अनुसूचित जातीतील तरुण अमित कुमार यांनी राहुल गांधींविरोधात हल्द्वानी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधित तरुणाच्या तक्रारीवरुन राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या (BNSS) कलम १९६ आणि २९९ तसेच अनुसूचित जाती/जमाती कायदा, १९८९ च्या कलम ३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराचा आरोप आहे की, राहुल गांधींच्या वक्तव्यांमुळे अनुसूचित जातीच्या लोकांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या आहेत आणि समाजात तणाव निर्माण झाला आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या 8 ऑगस्टच्या जाहीर सभेनंतर काही कथित हिंदुत्त्वावादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून रामलीला मैदानात शुद्धीकरण विधी करण्यात आला. या शुद्धीकरण विधी केलेल्यांवर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जवाहर नगर येथील रहिवासी अमित कुमार यांच्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित कुमार हे ‘श्री राम सेना चॅरिटेबल सर्व्हिस ट्रस्ट’शी संबंधित असून ते स्वतःला अनुसूचित जाती समाजाचे सदस्य मानतात.
अमित कुमार यांच्या तक्रारीनुसार , २९ ऑगस्ट रोजी एका पत्रकार परिषदेदरम्यान राहुल गांधींनी हल्द्वानीच्या रामलीला मैदानावर झालेल्या एका विधीतील सहभागींबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर रामलीला मैदानावर धार्मिक विधी आणि स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. राहुल गांधी यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांचे वर्णन अस्पृश्यतावादी मानसिकता असलेले आणि दलितविरोधी असे केले.
Mumbai News: मुंबईकरांच्या कटिंगला साखरेचा कडू घोट; तलफ कशी भागणार? वाढत्या महागाई खिशावर भार
रामलीला मैदानातील घाण आणि मुस्लिम जातीयवादी घोषणांच्या निषेधार्थ हा शुद्धीकरण विधी करण्यात आला होता. काँग्रेस पक्षाने खर्गे यांना दलित असल्याचे जोडून या शुद्धीकरण विधीचे राजकारण करण्यास सुरुवात केली. हल्द्वानीमध्ये राहुल गांधींविरुद्ध दाखल झालेल्या अहवालावर काँग्रेस पक्षाने भाष्य केले आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सूर्यकांत धस्माना म्हणाले की, भाजप राहुल गांधींना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. पण काँग्रेस त्यांना घाबरणार नाही. शुद्धीकरण विधी पार पाडण्याच्या कृतीबद्दल देशातील अनुसूचित जाती समुदाय भाजपला माफ करणार नाही.
जेव्हा हे प्रकरण उघडकीस आले, तेव्हा संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू होते. या मुद्द्यावरून मोठा गदारोळ झाला. राज्यसभेच्या अध्यक्षांनीही या घटनेचा निषेध केला आणि कारवाईचे आदेश दिले. भाजप नेते जेपी नड्डा यांनी स्वतः चौकशीची मागणी केली आहे.






