Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Congress Internal Conflict:राहुल गांधींच्या मेहनतीवर ‘घरभेद्यां’चा सुरुंग! अंतर्गत गटबाजीने काँग्रेस संकटात

Congress Politics: उत्तर प्रदेश, बिहार आणि हरियाणासारख्या अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची बूथ-स्तरीय संघटना अस्तित्वातच नाही. ब्लॉक स्तरावर अध्यक्ष असले तरी, कार्यकर्ते अज्ञात आहेत आणि जिल्हा संघटना गटबाजीमध्ये विभागलेली आहे. यामुळेच सभांमधील गर्दी ईव्हीएमपर्यंत पोहोचू शकत नाही.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 28, 2026 | 10:10 AM
Rahul Gandhi, Congress Politics,

Rahul Gandhi, Congress Politics,

Follow Us
Follow Us:
  • राहुल गांधींच्या सभांमधील गर्दीचे मतांत रूपांतर करण्यात काँग्रेसची बूथ यंत्रणा ठरतेय अपयशी
  • पक्षातीलच काही उच्चपदस्थ ‘घरभेद्यां’मुळे राहुल गांधींच्या प्रयत्नांना बसतोय मोठा फटका
  • उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणात काँग्रेसची बूथ आणि ब्लॉक पातळीवरील संघटना अत्यंत कमकुवत
Congress Politics: राहुल गांधी यांनी रस्त्यावरची लढाई सुरू करून सत्ताधाऱ्यांना घाम फोडला असताना पक्षांतर्गत घरभेद्यांमुळे राहुल गांधींच्या प्रयत्नांना सुरुंग लागला आहे. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, राहुल गांधींच्या भोवती असे अर्धा डझन नेते आहेत, त्यांच्या कॉल डिटेल्सची तपासणी केली, तर त्यांची काळी सत्ये उघड होतील.

गेल्या दोन वर्षांपासून राहुल गांधी प्रवास, जाहीर सभा आणि संवादाच्या माध्यमातून जनतेच्या सतत संपर्कात आहेत. भारत जोडो यात्रेपासून ते मतदार हक्क यात्रेपर्यंत, त्यांच्या सभांना मोठी गर्दी जमली आहे. अलीकडील ‘छात्र की गुंज’ कार्यक्रमातही तरुणांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला आहे. परंतु या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर करणारी यंत्रणा म्हणजेच बूथ, ब्लॉक आणि जिल्हा संघटना, हाच सर्वात कमकुवत दुवा ठरत आहे.

देशातील अनेक ठिकाणी पुन्हा मुसळधार पाऊस होणार; आसाम, मेघालयसह ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा

उत्तर प्रदेश, बिहार आणि हरियाणासारख्या अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची बूथ-स्तरीय संघटना अस्तित्वातच नाही. ब्लॉक स्तरावर अध्यक्ष असले तरी, कार्यकर्ते अज्ञात आहेत आणि जिल्हा संघटना गटबाजीमध्ये विभागलेली आहे. यामुळेच सभांमधील गर्दी ईव्हीएमपर्यंत पोहोचू शकत नाही. ही कमतरता ओळखून, राहुल गांधींनी संघटना निर्मिती अभियानांतगत जिल्हाध्यक्षांच्या नवीन नियुक्तीला सुरुवात केली आहे. तळागाळातील आणि लढाऊ नेत्यांना संधी देणे हा याचा उद्देश आहे. पण इथेही तीच जुनी समस्या समोर येत आहे.

जिल्हाध्यक्षांची निवड करण्यासाठी पाठवले जाणारे बहुतेक निरीक्षक स्वतः लढवलेल्या निवडणुकांमध्ये आपली अनामत रक्कमही वाचवू शकलेले नाहीत. त्यांच्यावर गटबाजीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आधीच झाला आहे. अनेक निरीक्षक गुणवत्तेवर अवलंबून राहण्याऐवजी, काही उच्चपदस्थ नेत्यांची खुशामत आणि ‘प्रतिष्ठा राजकारणा’च्या माध्यमातून पदे मिळवतात. ते ‘तुमचा माणूस, माझा माणूस’ या धोरणाने पछाडलेले अहवाल सादर करतात, ज्यामुळे खरे कार्यकर्ते मागे पडतात आणि या नियुक्त्या दीर्घकाळात संघटनेसाठी समस्या बनतात.

Flood in Nepal : नेपाळमध्ये पुराचा कहर; शेकडो जणांचा मृत्यू, पुराच्या पाण्यासोबतच येत आहेत मृतदेह

कार्यकर्त्यांना वेठबिगारासारखे वागवितात पदाधिकारी

वस्तुस्थिती अशी आहे की, आजही राहुल गांधींची धोरणे आणि काँग्रेसची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवण्याऐवजी, बहुतेक नेते दिल्ली आणि राज्यातील काही मोजक्या वरिष्ठ नेत्यांनाच तोंड दाखवण्यापुरते मर्यादित राहतात. वातानुकूलित खोल्यांमधून राजकारण करणारे हे नेते, मतदान केंद्रांवर जाऊन प्रयत्न करण्यास किंवा कार्यकत्यांना भेटण्यास तयार नसतात. आजही काँग्रेस पक्षात असे अनेक नेते आहेत, जे कार्यकर्त्यांना देवाप्रमाणे वागवण्याऐवजी त्यांना वेठबिगारांसारखी वागणूक देतात. राहुल गांधींचा संघर्ष आणि संघटनेची ताकद यांमधील हीच सर्वात मोठी दरी बनली आहे.

 

Web Title: National newsrahul gandhi congress internal politics booth level weakness and sabotage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 10:07 AM

Topics:  

  • Bharat Jodo Yatra
  • Congress Politics
  • National Politics
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Amit Shah on Congress : राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, अमित शाहांचा हल्लाबोल
1

Amit Shah on Congress : राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, अमित शाहांचा हल्लाबोल

Eknath Shinde Press Conference: ‘कालचा दिवस देशाच्या इतिहासातील काळा दिवस’; एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका
2

Eknath Shinde Press Conference: ‘कालचा दिवस देशाच्या इतिहासातील काळा दिवस’; एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका

India Alliance : निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधींसह ‘इंडिया’च्या ११ नेत्यांची सुप्रीम कोर्टात याचिका
3

India Alliance : निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधींसह ‘इंडिया’च्या ११ नेत्यांची सुप्रीम कोर्टात याचिका

Form 6 Controversy : बदललेल्या फॉर्म-6ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही; न्यायालयाचा स्पष्ट खुलासा
4

Form 6 Controversy : बदललेल्या फॉर्म-6ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही; न्यायालयाचा स्पष्ट खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.