Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar on Nagpur Event:’ भाजपकडून राहुल गांधींच्या कार्यक्रमाची कॉपी!; रोहित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका

Rohit Pawar: कुपोषणापासून सर्पदंशापर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे गेल्या पाच वर्षांत ४४ बालकांचा मृत्यू झाला आहे. एखाद्या वेळी ऑडिट केल्याचे दाखवले जाते, एखाद्या अधिकाऱ्याला निलंबित केले जाते; मात्र कंत्राटदारावर कधीच कारवाई केली जात नाही.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 24, 2026 | 12:43 PM
Rohit Pawar Press Conference, Devendra Fadnavis

Rohit Pawar Press Conference, Devendra Fadnavis

Follow Us
Follow Us:

पुण्यातील राहुल गांधींचा कार्यक्रम उत्स्फूर्त, तर नागपुरातील मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम ‘आणलेल्या गर्दीचा’
राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ ला मिळालेला प्रतिसाद पाहून भाजपने नागपुरात घाईघाईत कार्यक्रम घेतला
नागपुरातील ‘जेन-झी’ संवादात केवळ ठरवलेले प्रश्न विचारले गेल्याचा आरोप

Rohit Pawar Press Conference: “पुण्यात लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रम पार पडला. तर दुसरीकडे नागपुरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील झेन-झी सोबत संवाद साधला. स्वतःहून आलेले लोक आणि आणलेले लोक हे जर तुम्हाला पाहायचे असतील, तर राहुल गांधी यांचा कार्यक्रम हा स्वतःहून आलेल्या लोकांचा कार्यक्रम होता.नागपुरातील कार्यक्रम हा आणलेल्या लोकांचा कार्यक्रम होता.” अशा खोचक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांना सामान्य लोकांनी प्रश्न विचारले असते तर काय झाले असते? गेल्या तीन महिन्यांत नागपूर शहरात ३२ खून झाले आहेत. तुम्ही गृहमंत्री आहात, काय करत आहात?’असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला. ठरवून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली गेली. क्रिकेटपटू तिलक वर्मादेखील तिथे आला होता. गर्दी आणण्यासाठी सेलिब्रिटीला आणले होते की नाही, हे त्यांनाच माहीत. अशा प्रकारे संवाद होत नाही. संवाद लोकांमध्ये जाऊन होतो. आम्हाला तुमच्या मन की बात नको, आम्हाला जन की, म्हणजेच लोकांची गोष्ट ऐकायची आहे.” असा टोलाही रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना यावेळी लगावला.

ISRO Rocket Production: इस्रो आता रॉकेट बनवणार नाही!; खाजगी क्षेत्रासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचे दरवाजे खुले

“जी लहान मुले होती, त्यांना संधी द्यायला पाहिजे होती. ४ हजार ढोलवादक तिथे आले होते, त्यावर आमचा आक्षेप नाही. मात्र वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन मुलांना बोलावण्यात आले. ही मुले बक्षिसे घेण्यासाठी किंवा तिलक वर्माला पाहण्यासाठी आली असतील. त्यात तुम्ही जेन-झी संवाद ठेवला. मग कार्यक्रमात कार्यक्रम कशासाठी घेतला? राहुल गांधींचा कार्यक्रम पाहून भाजपदेखील काँग्रेसची कॉपी करत आहे,” असंही त्यांनी यावेळी नमुद केलं.

अमरावतीतील रुग्णालयात झालेल्या व्हेंटिलेटर स्फोटाची घटना अतिशय दु:खद आहे. आगीत तीन लहान बालकांचा मृत्यू झाला आहे. या हॉस्पिटलचे फायर ऑडिट होणे महत्त्वाचे आहे; मात्र केवळ ऑडिट केल्याचे दाखवले जाते, पुढे त्यावर काहीही कारवाई होत नाही. यात श्रीमंतांची मुले मृत्युमुखी पडत नाहीत, तर गरिबांची मुले मृत्युमुखी पडतात. गेल्या वर्षभरात पाच वर्षांखालील ४४ मुले मृत्युमुखी पडली आहेत. अशी प्रतिक्रीया रोहित पवार यांनी दिली.

Amravati Hospital Fire: अंगावर काटा! व्हेंटिलेटरचा स्फोट, ३ नवजात बाळांचा मृत्यू; बाळांच्या कक्षात आग

रोहित पवार यांनी यावेळी बोलताना अनेक घटनांवर भाष्य करत सरकारवर टिकेची झोड उठवली. “अंगणवाड्यांची परिस्थिती एवढी वाईट का आहे? आदिवासी बालकांना जे दूध दिले जायचे, त्याचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या गप्पा कमी करून या बालकांच्या मृत्यूकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. कुपोषणापासून सर्पदंशापर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे गेल्या पाच वर्षांत ४४ बालकांचा मृत्यू झाला आहे. एखाद्या वेळी ऑडिट केल्याचे दाखवले जाते, एखाद्या अधिकाऱ्याला निलंबित केले जाते; मात्र कंत्राटदारावर कधीच कारवाई केली जात नाही. एखादी व्यक्ती जबाबदार असेल तर तिला निलंबित कशाला करता? तिला थेट घरी पाठवले पाहिजे.”

दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, शरद पवार यांनी, ‘आम्ही एकत्र जाणार नाही.’ हे आधीच स्पष्ट केलं आहे. शरद पवार यांच्याबद्दल काँग्रेसमधून कोणीही बोललेले नाही. विषय एवढाच आहे की, जेव्हा महाराष्ट्रात – मुख्यमंत्र्यांच्या विभागात आमचे काम असते, तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मी सर्वाधिक बोलतो. मात्र, त्यांच्याकडे पद आहे, सत्ता आहे. सामान्य लोकांसाठी आम्हीही मुख्यमंत्र्यांकडे जातो. त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे पंतप्रधानांना भेटल्या. म्हणून आम्ही एनडीएसोबत चाललो आहोत, असे होत नाही.

 

 

Web Title: Rohit pawar slams devendra fadnavis rahul gandhi pune event

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 12:36 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Gen Z
  • Nagpur Politics
  • Rahul Gandhi
  • rohit pawar

संबंधित बातम्या

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
1

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा
2

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…
3

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
4

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.