
Supreme Court, Jantar Mantar, CJP Protest, Legal News,
या पॅनेलला प्रकरणाचे तथ्य गोळा करण्याचे काम सोपवले जाईल आणि समिती वेळोवेळी आपला अहवाल सादर करेल, ज्याच्या आधारे न्यायालय आवश्यक निर्देश जारी करेल. सुप्रीम कोर्टाने म्हटले की, आम्ही समितीला सर्व आवश्यक पायाभूत सुविधा पुरवू. समितीकडे येणाऱ्या कोणत्याही पीडिताला त्वरित सुनावणीची संधी मिळेल, असा विश्वास न्यायालयाने व्यक्त केला.
सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या आदेशानुसार, ही समिती महिला आंदोलकांसोबत झालेला लैंगिक छळ, ऑनलाइन छळ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संवेदनशील घटकांना लक्ष्य करण्याच्या आरोपांचीही चौकशी करेल.
जंतर-मंतरवरील घटनेसाठी जबाबदार असेल, त्यासाठी कोणतेही सबब किंवा समर्थन असू शकत नाही. या प्रकरणाला गाभीर्याने घेतले पाहिजे आणि त्याच्या अंतिम निष्कर्षांपर्यंत पोहोचवले पाहिजे. म्हणूनच आम्ही या उच्चस्तरीय समितीची स्थापना करत आहोत, जी या प्रकरणांच्या प्रत्येक पैलूची चौकशी करेल.
२० जुलै रोजी विद्यार्थ्यांच्या संसद चलो’ मार्चदरम्यान पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचाजांचे आरोप दिल्ली पोलिसांनी सुप्रीम कोर्टात फेटाळले आहेत. दिल्ली पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले की, आंदोलकांनी बॅरिकेड्सच्या अनेक रांगा तोडल्या आणि संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केला.
आंदोलनात ३० हजारापेक्षा जास्त लोक उपस्थित होते आणि त्यांना नियंत्रित करण्यासाठी सुमारे ५ हजार पोलिस तैनात होते. परिस्थिती बिघडल्यानंतर टप्याटप्याने थोड्या बळाचा वापर करण्यात आला.
संसदेकडे मार्च करण्याची परवानगी नसल्यामुळे जमावाने बेकायदेशीर रूप धारण केले होते. अशा मोठ्या जमावाला रोखण्यासाठी केलेला बळाचा वापर हा परिस्थितीनुसार आवश्यकच होता.
सुनावणीदरम्यान खंडपीठाने स्पष्ट केले की, फेशिअल रिकग्निशन टेक्नॉलॉजी, पाळत – ठेवणे, प्रायव्हसी आणि कलम २१ शी संबंधित घटनात्मक प्रश्नांवर निर्णय समिती नाही, तर सुप्रीम कोर्ट स्वतः घेईल, समिती केवळ तथ्यात्मक प्रश्नांची चौकशी करू शकते. समितीच्या अहवालानंतर फेशिअल रिकग्निशन तंत्रज्ञानाशी संबंधित व्यापक कायदेशीर व घटनात्मक प्रश्नांवर न्यायालय विचार करेल.
-सुनावणीदरम्यान न्यायालयाने असेही संकेत दिले की, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल झालेले एफआयआर रद्द करण्यासाठी न्यायालय घटनेच्या कलम १४२ (पूर्ण न्याय देण्याची सुप्रीम कोर्टाची असाधारण शक्ती) चा वापर करण्यावर विचार करू शकते. मात्र, गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या प्रकरणांवर वेगळा विचार केला जाईल.