महंत रामगिरी महाराजांची औरंगजेब कबरीच्या वादावर प्रतिक्रिया (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामधील राजकीय वर्तुळामध्ये अनेक वादग्रस्त विधाने समोर येत आहे. राजकारण्यानंतर आता महंत देखील अशा प्रकारची विधाने करताना दिसून येत आहे. महंत रामगिरी महाराज यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये वादग्रस्त विधान केले. रामगिरी महाराज हे अयोध्या या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी गेले होते. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना थेट राष्ट्रगीतावर आक्षेप घेतला. यानंतर आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती.
महंत रामगिरी महाराज यांनी जन-गण-मन नाही तर वंदे मातरम हे देशाचे राष्ट्रगीत हवे होते या आशयाचे वक्तव्य केले. यावरुन शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे. माध्यमांशी संवाद साधून जितेंद्र आव्हाड यांनी महंत रामगिरी महाराज यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. तसेच रामगिरी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
जन-गण-मन हे राष्ट्रगीत नको म्हणत असलेल्या रामगिरी महाराजांवर जितेंद्र आव्हाड यांनी कडक शब्दांत समाचार घेतला. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आता त्या रामगिरीला जोड्याने मारण्याची वेळ आली आहे. आता जन गण मन यावर देखील त्याचा आक्षेप आहे. त्याला म्हणाव तू बॅनची मागणी करा बाबा..आता अति व्हायला लागलं आहे रामगिरीचं. देशाने आता इतिहास हा रामगिरीकडूनच शिकायचा आहे, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार गटाच्या आमदारांना ऑफर देण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सुनील तटकरे यांनी फोन नाही केले. ते संसदेमध्ये भेटले. यावेळी त्यांनी खासदारांना सांगितलं की, बापाला आणि मुलीला बाजूला ठेवा. आणि या आमच्याकडे. एकीकडे आमचं दैवत आहे म्हणायचं. पक्ष आणि निशाणी घेतली हे ठीक आहे. आता खासदार पण पळवा. आणि वर एकत्र येतात म्हणून बोंबाबोंब करत आहे. बापाला आणि पोरीला सोडा असं सांगतात. यावरुन संस्कार आणि काय तुमची संस्कृती हे दिसून येत, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे. तसेच ऑफर देण्याऱ्यांवर अजित पवार गटाच्या नेत्यांवर रोष व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
काय म्हणाले रामगिरी महाराज?
रामगिरी महाराज हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. यापूर्वीही त्यांच्या विधानांवरून वाद निर्माण झाले आहेत. महाराष्ट्र आपण राष्ट्रगीत ऐकतो, आपल्या राष्ट्रगीताचा इतिहास किती लोकांना माहित आहे हे मला माहीत नाही, पण आज मी सत्य सांगणार आहे. कदाचित तुम्हा लोकांना याची माहिती नसेल. रवींद्रनाथ टागोरांनी हे गाणे 1911 मध्ये कलकत्ता येथे गायले होते, जेव्हा भारत स्वतंत्र देश नव्हता. रवींद्रनाथ टागोरांनी पंचम जॉर्ज यांच्या समर्थनार्थ हे गाणे गायले होते. जॉर्ज पंचम कोण होता? तो ब्रिटिश राजा होता आणि तो भारतीयांवर अत्याचार करत होता. राष्ट्रगीत हे भारतातील लोकांसाठी नाही. त्यामुळे भविष्यात यासाठीही संघर्ष करावा लागणार आहे. ते पुढे म्हणाले की, वंदे मातरम हे आपले राष्ट्रगीत असले पाहिजेरवींद्रनाथ टागोर यांनी हे गाणे ब्रिटिश राजे जॉर्ज पंचम यांच्या समर्थनार्थ गायले होते. हे राष्ट्राला उद्देशून कधीच नव्हते, असे वक्तव्य रामगिरी महाराजांनी केले आहे.