eknath khadse is in which party bjp or ncp
मुक्ताईनगर : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणूकीच्या प्रचारापासून राज्याच्या राजकारणामध्ये एक नेता नेहमी चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेला आहे. ते म्हणजे महाराष्ट्राचे माजी महासुल मंत्री एकनाथ खडसे. एकनाथ खडसे हे नक्की कोणत्या पक्षामध्ये आहेत, असा सवाल सर्वांना पडला होता.
एकनाथ खडसे यांनी काही वर्षापूर्वी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. बंडाचे राजकारण झाल्यानंतर एकनाथ खडसे हे शरद पवार गटासोबत राहिले. मात्र त्यानंतर त्यांच्या भाजप पक्षामध्ये घरवापसी होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. एकनाथ खडसे यांनी स्वतः या चर्चा खऱ्या असल्याचे म्हणत शिक्कामोर्तब केले होते. मात्र त्यानंतर लोकसभा निवडणूका झाल्यानंतर देखील एकनाथ खडसे यांचा भाजप पक्षप्रवेश झाला नाही. दिल्लीवारी करुन आणि भाजप पक्षश्रेष्ठी अनेकदा महाराष्ट्रामध्ये येऊन देखील एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश रखडला गेला. महाराष्ट्र भाजपमधील काही नेते हे नाराज असल्यामुळे हा पक्षप्रवेश झाला नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्याबाबत इकडे आड अन् तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
हे देखील वाचा : मराठमोळा भाजप नेता होणार राष्ट्रपती? नितीन गडकरींकडे भाजप नेत्यांची जोरदार मागणी
एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळल्यानंतर एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा होईल अशी चर्चा सुरु होती. मात्र अजूनही पक्षप्रवेशाचे घोंगडे भिजत आहे. आता राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे हे नक्की राष्ट्रवादी शरद पवार गटात की भाजपामध्ये आहेत असा प्रश्न सर्वांना पडलाल आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजपविरोधी वक्तव्य करत निवडणूकीमध्ये महाविकास आघाडी विजयी होईल, असे विधान केले होते. त्यामुळे आता एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा यु टर्न घेतला असल्याच्या चर्चा आहेत. यावर आता शरद पवार गटाचे नेते डॉ. सतीश पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यानंतर डॉ. सतीश पाटील यांनी प्रतिक्रिया देत नाराजी उघड केली आहे. सतीश पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाने एकनाथ खडसे यांना स्वीकारले असले तरी, आपण त्यांना स्वीकारले नाही. खडसे हे सोयीचे आणि आपल्या कुटुंबाच्या हिताचे राजकारण करत आहेत, अशी गंभीर टीका सतीश पाटील यांनी केली आहे. एकनाथ खडसे यांना पक्षामध्ये परत घेण्यावरुन शरद पवार गटामध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठी शरद पवार व एकनाथ खडसे यांची चिंता वाढली आहे.