Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘घंट्याचा निष्ठावान! ज्या काँग्रेसने याच्या कुटुंबाला सगळं दिलं त्याच काँग्रेसला सोडून..,’ निलेश राणेंची वैभव नाईकांवर सडकून टिका

वैभव नाईकांनी शिंदे गटात प्रवेश नाकारल्याच्या वक्तव्यावर निलेश राणेंनी सोशल मीडियावरून जोरदार टीका केली. काँग्रेस, निष्ठा आणि राजकीय भूमिकेवरून दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.

  • By विवेक
Updated On: Aug 21, 2026 | 03:43 PM
निलेश राणेंची वैभव नाईकांवर सडकून टिका

निलेश राणेंची वैभव नाईकांवर सडकून टिका

Follow Us
Follow Us:
  • वैभव नाईकांच्या वक्तव्याला निलेश राणेंचा जोरदार पलटवार.
  • काँग्रेस आणि निष्ठेच्या मुद्द्यावरून राणेंनी नाईकांवर निशाणा साधला.
  • नाईकांनीही राणेंच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते.
 

शिवसेनेतील फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात निष्ठा, पक्षांतर आणि गद्दारीच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. आता आमदार वैभव नाईक आणि शिवसेना नेते निलेश राणे यांच्यातील शाब्दिक संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. शिंदे गटात प्रवेश नाकारताना ‘गद्दारीचा कलंक लावून आमदारकी नको’ अशी भूमिका घेतल्याचा दावा वैभव नाईक यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर निलेश राणे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे जोरदार टीका केली.

वैभव नाईक यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात सहभागी होण्यासाठी त्यांना अनेकदा संपर्क करण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीनंतरही भरत गोगवले यांनी आपल्याला फोन केल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, पक्ष बदलून मिळणारी आमदारकी नको असल्याने आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिलो, असा दावा नाईक यांनी केला.

‘2029 मध्ये मोदी पंतप्रधान नसतील; सत्ताबदल त्यांच्या कारभारामुळेच..,’ पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

काय म्हणाले निलेश राणे ?

यावर प्रतिक्रिया देताना निलेश राणे यांनी नाईकांच्या दाव्याची खिल्ली उडवली. आपल्या अधिकृत ‘X’ पोस्टवरून ते म्हणाले, “माझ्यावर गद्दारीचा कलंक नको होता म्हणून मी उबाठा सोडली नाही” हा २०२६ चा सर्वात मोठा विनोद आहे. वैभव नाईक हरणारच होता म्हणून शेवटच्या क्षणाला इलेक्शन फॉर्म दिला नाही आणि त्यावर हा नीच आहे हे सगळ्यांना माहीत आहे. ज्या काँग्रेसने याच्या कुटुंबाला सगळं दिलं त्याच काँग्रेसला सोडून हा दुसऱ्या पक्षात गेला, हा घंट्याचा निष्ठावान.”

“माझ्यावर गद्दारीचा कलंक नको होता म्हणून मी उबाठा सोडली नाही” हा २०२६ चा सर्वात मोठा विनोद आहे. वैभव नाईक हरणारच होता म्हणून शेवटच्या क्षणाला इलेक्शन फॉर्म दिला नाही आणि त्यावर हा नीच आहे हे सगळ्यांना माहीत आहे.
ज्या काँग्रेसने याच्या कुटुंबाला सगळं दिलं त्याच काँग्रेसला सोडून हा…
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 20, 2026

ते पुढे म्हणाले, “याला आता जिल्ह्यात कुत्र उभ करत नाही, हा ग्रामपंचायतीला पडेल याची अशी परिस्थिती झाली आहे, याचे दोन भाऊ माझ्यामुळे नगरसेवक झाले ते पण हा नमकहराम विसरला पण असो मी लहान लोकांच्या तोंडी लागत नाही, इथून पुढे काही बोलला तर माझे पदाधिकारी उत्तर देतील,” असे ते म्हणाले.

काय म्हणाले होते वैभव नाईक ?

वैभव नाईक यांनीही निलेश राणेंवर यापूर्वी टीका केली होती. राणे आणि त्यांच्या वडिलांना शिवसेनेतून काढण्यात आल्याचा संदर्भ देत नाईक यांनी त्यांच्या राजकीय भूमिकेवर सवाल उपस्थित केले होते. आमदारकी मिळवण्यासाठीच राणेंनी भाजप सोडून शिंदे सेनेकडून निवडणूक लढवली, असा आरोपही त्यांनी केला.

Shiv Sena Protest: ‘मर्सिडीज द्या, टेंडर घ्या!’ म्हणत शिवसेनेचे आंदोलन; नेत्यांच्या वाहनावरून महापालिकेत गदारोळ

ते म्हणाले, “निलेश राणेंनी आमदारकी मिळवण्यासाठीच भाजपला सोडचिट्ठी देऊन शिंदे सेनेतून निवडणूक लढवली. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहे आणि यापुढेही राहील. निलेश राणे यांनी भाजपसोबत न जाता शिंदेसेनेसोबतच राहावे,” असा सल्लाही त्यांनी दिला.

दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, आगामी काळात या आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार येण्याची शक्यता आहे.

Web Title: Nilesh rane criticizes vaibhav naik congress shivsena political controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • nilesh rane
  • shivsena
  • Shivsena UBT
  • vaibhav naik

संबंधित बातम्या

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी
1

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
2

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

Ulhasnagar News : शिवसेना भाजपातील संघर्ष विकोपाला, पप्पू कलानी गँगस्टर तर रवींद्र चव्हाण मंचेकर गँगचे ऑपरेटर, शिवसेनेचा आरोप
3

Ulhasnagar News : शिवसेना भाजपातील संघर्ष विकोपाला, पप्पू कलानी गँगस्टर तर रवींद्र चव्हाण मंचेकर गँगचे ऑपरेटर, शिवसेनेचा आरोप

MLC Election 2026 : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक भाजपकडे, अमरावती शिवसेनेकडे, तर राष्ट्रवादीला संभाजीनगर!
4

MLC Election 2026 : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक भाजपकडे, अमरावती शिवसेनेकडे, तर राष्ट्रवादीला संभाजीनगर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.