‘टेंडर द्या, मर्सिडीज घ्या!’ म्हणत शिवसेनेचे आंदोलन; कंत्राटदाराच्या वाहनावरून महापालिकेत गदारोळ
, कंत्राटदाराच्या ऐवजी ते टाकावे.
यावेळी विरोधी पक्ष नेते विजय चौगुले म्हणाले की, सत्ताधाऱ्यांची मनमानी आम्ही चालू देणार नाही. कचऱ्याचे कंत्राट सरळ सरळ देऊन गाड्या घेतल्या जात आहेत. स्पष्ट भ्रष्टाचाराचे उदाहरण दिसून येत आहे. सभागृहात आम्ही स्वच्छ कारभार करतो असे सांगायचे आणि दुसरीकडे गाड्या घ्यायच्या. भ्रष्टाचार मुक्त नवी मुंबईचा नारा द्यायचा आणि दुसरीकडे कचऱ्यातून भ्रष्टाचार करायचा. असा कारभार सध्या दिसून येत आहे.आमचे सुरेश कुलकर्णी या जागेला विरोध करत आहेत.
तेथील नागरिकांना या प्रकल्पामुळे त्रास होणार आहे. मात्र तरीही रेटून तिथेच हा प्रकल्प नेण्याचा अट्टहास केला जात अशी टीका चौगुले यांनी केली. तर शिवसेनेचे नगरसेवक किशोर पाटकर यांनी देखील भाजपाच्या कारभारावर आगपाखड केली. ते म्हणाले की, नवी मुंबईतील झोडपट्टीवासीयांबाबत आत्मियता उरलेली नाही.
भ्रष्टाचार करू मात्र प्रकल्प तिथेच राबवू अशी पद्धत सत्ताधाऱ्यांची दिसून येते. आम्ही हे मर्सिडीज प्रकरण, लाचलुचपत खात्याकडे नेणार आहोत. न्यायालयात देखील दाद मागणार आहोत. ही मर्सिडीज त्यांनी कशी घेतली, गाडी आल्या आल्या त्या कंत्राटदाराला वर्क ऑर्डर कशी मिळाली याची चौकशीची मागणी आम्ही करणार आहोत अशी टीका पाटकर यांनी केली. सागर नाईक यांच्यामुळे भाजपाचे नाव खराब होत आहे. त्यांचा मनमानी कारभार सभागृहामध्ये दिसून येतो अशी टीका पाटकर यांनी केली.
बनावट स्टे ऑर्डरमध्ये देखील सागर नाईक आहेत. त्यांची कागदपत्रे पोलिस आम्हाला देत नाहीयेत. संविधानिक पदावरील व्यक्ती असे वाहन वापरू शकत नाही सात वर्षांचा गुन्हा आहे असेही पाटकर म्हणाले. सभागृहात आमची काय त्यांच्या नगरसेवकांची देखील कामे होत नाहीत. त्यांचे नगरसेवक देखील शंकर असल्याचा खुलासा पाटकर यांनी केला. यावेळी तुर्भे येथील प्रकल्पाला विरोध करणारे स्थानिक नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी देखील भाजपच्या टीका केली. आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही, प्रकल्पाची जागा बदलावी असे कुलकर्णी म्हणाले. सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार यातून दिसून येत असल्याची टीका कुलकर्णी यांनी केली.
विरोधकांचा आक्षेप कशावर आहे हे मला कळलेले नाही. त्याच दिवशी रजिस्ट्रेशन झाले असल्यास त्यात काही तथ्य नाही. मी ही वाहन कधीकधी वापरतो. त्या कंपनीला ठेका मिळाला आहे. त्यांच्यासोबत मी आहे असे नाही. हे सर्व निवडणुकीच्या आधी झाल्या आहेत. माझ्या व्हिडिओद्वारे संभ्रम निर्माण केला जात आहे. माझे नाव घेतल्यास मी मानहानीचा दावा ठोकणार, अशी प्रतिक्रिया नवी मुंबई पालिका सभागृह नेते सागर नाईक यांनी दिली.
Navi Mumbai News : डिजिटल जन्मदाखल्यांना दिरंगाई; विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा खोळंबा






