Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Tiger : फक्त एकनाथ शिंदेच नाहीतर ‘या’ बड्या नेत्यांनीही दिला शिवसेनेला धक्का; सेनेच्या इतिहासातील सहावी मोठी फूट

उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सोडून हे सर्व खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, ही शिवसेनेच्या इतिहासातील सहावी मोठी फूट असणार आहे. यापूर्वी 1991 मध्ये छगन भुजबळ यांनी पक्ष सोडला होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 19, 2026 | 08:52 AM
Operation Tiger : फक्त एकनाथ शिंदेच नाहीतर 'या' बड्या नेत्यांनीही दिला शिवसेनेला धक्का; सेनेच्या इतिहासातील सहावी मोठी फूट

Operation Tiger : फक्त एकनाथ शिंदेच नाहीतर 'या' बड्या नेत्यांनीही दिला शिवसेनेला धक्का; सेनेच्या इतिहासातील सहावी मोठी फूट

Follow Us
Follow Us:

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत लवकरच प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ‘ऑपरेशन टायगर’ या नावाने सुरू असलेल्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटातील सहा ते सात खासदार फुटणार असल्याची माहिती आहे.

उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सोडून हे सर्व खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, ही शिवसेनेच्या इतिहासातील सहावी मोठी फूट असणार आहे. यापूर्वी 1991 मध्ये छगन भुजबळ यांनी पक्ष सोडला होता. ओबीसींना आरक्षण देण्याच्या शिफारशी करणाऱ्या मंडल आयोगाला बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या विरोधामुळे छगन भुजबळ यांनी शिवसेनेतील नेतृत्वशैलीवर नाराजी व्यक्त करत १९९१ मध्ये पक्ष सोडला. त्यांनी अनेक आमदारांसह पक्षातून बाहेर पडून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. शिवसेनेतील ही पहिली मोठी राजकीय फूट होती.

नारायण राणेही पडले होते बाहेर

उद्धव ठाकरे यांचा पक्षातील वाढता हस्तक्षेप आणि मिळत असलेली दुय्यम वागणूक यामुळे नाराज होत नारायण राणे यांनी २००५ मध्ये शिवसेना सोडली. त्यांच्यासोबत काही आमदार आणि कार्यकर्तेही बाहेर पडले. त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी विलासराव देशमुख सरकारमध्ये त्यांना महसूलमंत्री पदावरच समाधान मानावे लागले होते.

राज ठाकरे यांनीही सोडली शिवसेना

राणे सारख्या दिग्गज नेत्याने पक्ष सोडल्यानंतर अवघ्या एक वर्षातच पक्षातील मोठे नेते आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) ची स्थापना केली. अनेक युवा कार्यकर्ते व पदाधिकारी त्यांच्यासोबत त्यांनी वेगळ्या राजकीय पक्षाची स्थापना केली. ही शिवसेनेतील सर्वाधिक चर्चेतील फुटींमध्ये गणली जाते.

2022 मध्ये एकनाथ शिंदेंचं बंड

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० हून अधिक आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केले. हे प्रकरण निवडणूक आयोग आणि न्यायालयात पोहचले. निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले, तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव मिळाले.

‘गद्दारांना Y+ सुरक्षा, शेतकऱ्यांना अटी,’ खासदार फुटीवरून मविआ आक्रमक; रोहित पवार, वर्षा गायकवाडांचा हल्लाबोल

Web Title: Not only eknath shinde six senior leaders had left the shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 08:52 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

देशातील आणखी एका मोठ्या पक्षाचे निवडणूक चिन्ह जाणार? सध्या ना कोणता आमदार, ना खासदार
1

देशातील आणखी एका मोठ्या पक्षाचे निवडणूक चिन्ह जाणार? सध्या ना कोणता आमदार, ना खासदार

Maratha Reservation : ‘मोर्चात गोळ्या घालण्याचा डाव,’ मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा, फडणवीस – शिंदे यांच्यावर निशाणा
2

Maratha Reservation : ‘मोर्चात गोळ्या घालण्याचा डाव,’ मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा, फडणवीस – शिंदे यांच्यावर निशाणा

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका
3

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका

Maharashtra Breaking News Today 2026: वर्षभराच्या लढाईनंतर माधुरी हत्तीण कोल्हापुरात दाखल
4

Maharashtra Breaking News Today 2026: वर्षभराच्या लढाईनंतर माधुरी हत्तीण कोल्हापुरात दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.