Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शिंदे गटात जाण्याबाबत निर्णय..,’ कोर्टाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर घेणार मोठा निर्णय

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात प्रवेशाबाबत मोठे वक्तव्य केले. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • By विवेक
Updated On: Jun 20, 2026 | 03:18 PM
'शिंदे गटात जाण्याबाबत निर्णय..,' कोर्टाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर घेणार मोठा निर्णय

'शिंदे गटात जाण्याबाबत निर्णय..,' कोर्टाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर घेणार मोठा निर्णय

Follow Us
Follow Us:
  • पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल, सर्व 8 आरोपींची निर्दोष मुक्तता 
  • ठाकरे गटाचे बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांचा या निकालानंतर शिंदे गटात प्रवेशाबाबत मोठा निर्णय
  • या खटल्याचा निकाल आणि माझा राजकीय निर्णय याचा संबंध नाही –  ओमराजे निंबाळकर 
 

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल आज (शनिवार, 20 जून ) पार पडला. 20 वर्षांनंतर आलेल्या या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी या प्रकरणातील माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 8 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या निर्णयामुळे निंबाळकर कुटुंबाला मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. अश्यातच नुकतेच शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या निकालानंतर शिवसेना शिंदे गटात प्रवेशाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

ठाकरे गटातून फुटल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरण खटल्याच्या निकालानंतर एक महत्वाचे वक्तव्य केले होते. या खटल्याच्या निकालानंतर शिंदे गटात जाण्याबाबत राजकीय निर्णय घेऊ असे ते म्हंटले होते. आज हा निकाल विरोधात गेल्यानंतर प्रसारमाध्यमंही बोलताना शिंदे गटात जाण्याबाबत अजून निर्णय न घेतल्याचं सांगितलं आहे.

नेमकं काय म्हणाले ओमराजे निंबाळकर?

या निकालानंतर माध्यमांशी संवाद साधताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, “शिंदे गटात जाण्याबाबत अद्याप मी निर्णय घेतलेला नाही. मी माझ्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करेल आणि हा निर्णय घेईल. या खटल्याचा निकाल आणि माझा राजकीय निर्णय याचा संबंध नाही. सध्या कलियुग आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

Pawanraje Nimbalkar Case Verdict: पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा 20 वर्षांनी निकाल; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

“पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागणार”

या प्रकरणात पुढील कायदेशीर लढाईबाबत बोलताना निंबाळकर म्हणाले की, न्याय मिळावा यासाठी आम्ही पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. न्यायालयात असलेले पुरावे योग्य वेळी समोर येतील आणि सत्य बाहेर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“कलियुगात वाईटाला जास्त बळ असते”

यावेळी भावनिक प्रतिक्रिया देताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, “हे कलियुग आहे. वाईटाला जास्त बळ असते, तर चांगल्याला उशिरा बळ मिळते. मात्र शेवटी सत्याचा विजय होतो, अशी आमची श्रद्धा आहे.” राजकीय आणि कायदेशीर घडामोडींमुळे चर्चेत असलेल्या ओमराजे निंबाळकरांच्या या वक्तव्याने संबंधित प्रकरणाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

निकाल लागताच ओमराजे निंबाळकर यांचं मोठं वक्तव्य, ‘पोलीस, सीआयडीवर प्रचंड दबाव..,’

Web Title: Omraje nimbalkar on shinde group decision after pawanraje murder case verdict

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Mp Omraje Nimbalkar
  • shivsena
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
1

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत
2

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
3

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले
4

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.