Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ऑपरेशन टायगर फत्ते; चौकार नाही, थेट षटकार, २०२९ साली सहाच्या सहा खासदार पुन्हा निवडून येणार,’ एकनाथ शिंदेंची ग्वाही

उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांनी 'ऑपरेशन टायगर फत्ते' झाल्याचा दावा केला. २०२९ मध्ये हे सर्व खासदार धनुष्यबाण चिन्हावर पुन्हा निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

  • By विवेक
Updated On: Jun 22, 2026 | 08:01 PM
'ऑपरेशन टायगर फत्ते; चौकार नाही, थेट षटकार, २०२९ साली सहाच्या सहा खासदार पुन्हा निवडून येणार,' एकनाथ शिंदेंची ग्वाही

'ऑपरेशन टायगर फत्ते; चौकार नाही, थेट षटकार, २०२९ साली सहाच्या सहा खासदार पुन्हा निवडून येणार,' एकनाथ शिंदेंची ग्वाही

Follow Us
Follow Us:

४० आमदारांपासून सुरू झालेल्या २०२२ च्या राजकीय उठावानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला मिळणारा पाठिंबा सातत्याने वाढत असल्याचे चित्र सोमवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा विद्यमान खासदारांनी शिवसेनेत प्रवेश करत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. “आता एक नाही तर सहा टायगर आमच्यासोबत आहेत. चौकार नाही, षटकार मारला आहे,” असे सांगत शिंदे यांनी हा प्रवेश बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विजयाचा आणि शिवसेनेच्या वाढत्या ताकदीचा पुरावा असल्याचा दावा केला.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात परभणीचे तीन वेळा निवडून आलेले खासदार संजय (बंडू) जाधव, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील, यवतमाळ-वाशीमचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, गजानन कीर्तिकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री भरत गोगावले, तसेच पक्षाचे अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

सहा खासदारांचे स्वागत करताना शिंदे म्हणाले की, २२ जून २०२२ रोजी शिवसेना, धनुष्यबाण आणि बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा वाचवण्यासाठी सुरू झालेल्या लढ्याचा हा दुसरा टप्पा आहे. सुरुवातीला ४० आमदार सोबत होते, तर आज सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश करून त्या लढ्याला नवे बळ दिले आहे. “आता एक नाही तर सहा टायगर आपल्या सोबत आहेत,” असे ते म्हणाले.

‘मुलाला सांभाळा, नातवाला सांभाळा… हे काय पाळणाघर आहे का?’ बाळासाहेब ठाकरेंची किरण पावसकरांकडून जाहीर मंचावर खिल्ली !

बाळासाहेबांच्या विचारांवर श्रद्धा असलेले शिवसैनिक अखेर शिवसेनेतच एकवटतात, असे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, “जिथे शिवसेनेचे विचार, तिथे शिवसैनिक. त्यामुळेच हे सहा खासदार आज बाळासाहेबांच्या शिवसेनेत आले आहेत.”

या सर्व खासदारांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, विकास, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि जनतेची कामे हा त्यांचा प्रमुख विचार होता. काहींनी टीका केली, आरोप केले, परंतु त्यांनी जनतेच्या हिताला प्राधान्य दिले.

प्रत्येक खासदाराच्या कार्यशैलीचे कौतुक

प्रवेश केलेल्या प्रत्येक खासदाराच्या कार्यशैलीचे कौतुक करताना शिंदे यांनी संजय बंडू जाधव यांना जमिनीशी नाळ जोडून काम करणारे कार्यकर्ते, संजय दिना पाटील यांना बेधडक आणि सामान्य माणसांचा कैवारी, तर ओमराजे निंबाळकर यांना “रिअल स्टार” असे संबोधले. संजय देशमुख यांच्या कामाचे कौतुक करत त्यांनी त्यांना आणखी मोठ्या प्रमाणावर काम करण्यासाठी शिवसेना व्यासपीठ उपलब्ध करून देईल, असे सांगितले. नागेश पाटील आष्टीकर यांच्या बिंदास स्वभावाचा उल्लेख करताना, त्यांच्या वाटेला जाणाऱ्यांना त्यांची ताकद समजेल, असे ते म्हणाले. भाऊसाहेब वाकचौरे यांना “गावातही वाघ आणि राजकारणातही वाघ” असे संबोधत त्यांनी त्यांचे विशेष स्वागत केले.

‘ट्रिपल संजय आमच्याकडे आहेत, चौथा संजय…,’ 6 खासदारांच्या प्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांचा संजय राऊतांना टोला

“हे खासदार कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी आलेले नाहीत. ते मतदारसंघाच्या विकासासाठी, कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शिवसेनेत आले आहेत,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

संपूर्ण प्रक्रिया कायदा, संविधान आणि संसदीय परंपरांच्या चौकटीत पार पडल्याचे स्पष्ट करत त्यांनी विश्वास व्यक्त केला की, आज शिवसेनेत आलेले हे सर्व खासदार भविष्यात धनुष्यबाण चिन्हावरच निवडून येतील. दरम्यान, कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचाही विशेष गौरव करण्यात आला.

Web Title: Operation tiger success eknath shinde on six mps joining shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 08:01 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Operation Tiger

संबंधित बातम्या

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
1

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
2

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन
3

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता
4

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.