Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा; शरद पवार गटाच्या खासदाराची फडणवीसांसोबत भेट; रोहित पवारांचा मोठा दावा

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज्यात ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा सुरू झाली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा एकही खासदार फुटणार नसल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 27, 2026 | 05:07 PM
Sharad pawar

Sharad pawar

Follow Us
Follow Us:
  • बजरंग सोनवणे यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटीनंतर ‘ऑपरेशन तुतारी’च्या चर्चांना उधाण
  • रोहित पवारांचा दावा – राष्ट्रवादी (शरद पवार) आणि समाजवादी पक्षाचा एकही खासदार फुटणार नाही
  • सोनवणे यांची भेट ही मुलावरच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर असल्याचा रोहित पवारांचा दावा
 

राज्यात शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांच्या फुटीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच आता ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पक्षातील खासदार फुटणार नसल्याचा ठाम दावा केला आहे.

‘आमचा एकही खासदार फुटणार नाही’ – रोहित पवारांचा विश्वास

शेतकरी कर्जमाफीच्या जनजागृती दौऱ्यावर बीडमध्ये माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले की, भाजपकडून विरोधी पक्षांतील खासदारांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष आणि समाजवादी पक्षाचा एकही खासदार पक्ष सोडणार नाही, असा त्यांना पूर्ण विश्वास आहे.

ते म्हणाले की, लोकसभा मतदारसंघांच्या संभाव्य पुनर्रचनेसाठी (डिलिमिटेशन) भाजपला आणखी ४१ खासदारांची गरज असल्याची चर्चा आहे. मात्र त्यासाठी विरोधी पक्षांतील खासदारांना फोडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही.

‘गद्दार खासदार जिथे सापडतील तिथेच..’; उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना थेट आदेश, भाजपवरही घणाघात

बजरंग सोनवणे यांच्या भेटीमागे वेगळे कारण?

रोहित पवार यांनी बजरंग सोनवणे यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीबाबतही स्पष्टीकरण दिले. त्यांच्या मुलावर होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री, तसेच राज्याचे गृहमंत्री म्हणून फडणवीस यांची भेट घेतली असावी, असे रोहित पवार म्हणाले.

त्यांनी स्पष्ट केले की, या भेटीचा पक्षांतराशी संबंध जोडणे योग्य ठरणार नाही आणि राज्यात ‘ऑपरेशन तुतारी’सारखे कोणतेही राजकीय अभियान यशस्वी होणार नाही.

शरद पवार गटाकडे किती खासदार?

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडे एकूण ९ खासदार आहेत. त्यापैकी ८ लोकसभा आणि १ राज्यसभा खासदार आहेत. लोकसभेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते-पाटील, अमर काळे, बजरंग सोनवणे, निलेश लंके, भास्कर भगरे आणि सुरेश म्हात्रे हे पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहेत. तर शरद पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत.

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? ‘ऑपरेशन टायगर 2.0’मुळे ठाकरे गटाला धक्का; आणखी 14 आमदार शिंदे गटात जाण्याची चर्चा

Web Title: Operation tutari discussion bajrang sonawane meets devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 05:07 PM

Topics:  

  • NCP Sharad Pawar
  • rohit pawar
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
1

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Sharad Pawar : ‘आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या’; शरद पवारांचा NDA चर्चेला पूर्णविराम
2

Sharad Pawar : ‘आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या’; शरद पवारांचा NDA चर्चेला पूर्णविराम

Supriya Sule : ‘मंत्र्यांच्या गाड्या अडवा, जेलमध्ये जायची माझी तयारी’ पंढरपुरात दुष्काळाच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे आक्रमक
3

Supriya Sule : ‘मंत्र्यांच्या गाड्या अडवा, जेलमध्ये जायची माझी तयारी’ पंढरपुरात दुष्काळाच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे आक्रमक

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
4

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.