Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut on Election Commission: आता आरपारची लढाई! निवडणूक आयोगाविरोधात विरोधी पक्षांचा विराट मोर्चा

निवडणूक आयोगाच्या या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराविरोधात येत्या एक नोव्हेंबला मुंबईत राज्यातील सर्व विरोधा पक्षांच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 19, 2025 | 05:06 PM
Sanjay Raut on Election Commission: आता आरपारची लढाई! निवडणूक आयोगाविरोधात विरोधी पक्षांचा विराट मोर्चा
Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणूक आयोगाविरोधात विराट मोर्चा काढला जाणार
  • संजय राऊतांनी सांगितली मोर्चाची तारीख
  • महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये आजही 96 लाख बोगस मतदार
Sanjay Raut on Election Commission: येत्या १ नोव्हेंबरला राज्यातील सर्व विरोधी पक्षांच्या वतीने निवडणूक आयोगाविरोधात विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराविरोधात हा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मुंबई विरोधी महाविकास आघाडीने आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी या मोर्चाची घोषणा केली आहे.

IND vs AUS 1st ODI: दिवाळीचा आनंद फिका! भारताने पहिला वनडे सामना गमावला, मिचेल मार्शच्या खेळीने ऑस्ट्रेलिया विजयी

निवडणूक आयोगाच्या या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराविरोधात येत्या एक नोव्हेंबला मुंबईत राज्यातील सर्व विरोधा पक्षांच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील गाव-खेड्यातून, जिल्ह्या-जिल्ह्यातून लाखो लोक या मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्च्याच्या माध्यमातून मतदारांची ताकद निवडणूक आयोग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना दाखवली जाणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ या मोर्च्याचे नेतृत्व करणार आहेत. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाविरोधात विरोधी पक्षांची जोरदार लढाई सुरु आहे. शिवसेना (ठाकरे गट)चे नेते संजय राऊत यांनी याबाबत सांगितले की, ही लढाई आम्ही राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये लढत आहोत, तर आता ती महाराष्ट्रातही सुरु झाली आहे. मात्र, त्यातून काय साध्य होईल याबाबत काही शंका आहेत. आज गोरेगावमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोठा मेळावा पार पडला. या वेळी पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी दोन मुद्दे मांडले. त्यांनी सांगितले की, “मतदान करा किंवा करू नका, पण निवडणुकीचं मॅच फिक्सिंग झालं आहे. आणि या मॅच फिक्सिंगविरोधातच आपली लढाई आहे.”

मुंबई पोर्ट प्राधिकरण भरती 2025 : फ्रेशर्ससाठी मोठी संधी! १२ महिन्यांसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून करता येईल काम

संजय राऊत यांनी यावेळी आणखी म्हटले की, “महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये आजही 96 लाख बोगस मतदार आहेत, म्हणजे जवळपास एक कोटी. हे एक कोटी मतदार आमच्या दृष्टीने घुसखोर आहेत. या घुसखोरांना मतदार यादीतून बाहेर काढणं ही लोकशाहीची गरज आहे.”

दोन- तीन दिवसांपूर्वीच राज्यातील विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर येत्या १ नोव्हेंबरला मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात विराट मोर्चा काढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणूका आणि महापालिका निवडणुकांच्या तोंडावरच हा मोर्चा काढला जाणार असल्याने या मोर्चाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

 

Web Title: Opposition parties to hold massive march in mumbai on november 1 against election commission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 05:06 PM

Topics:  

  • election commission of india
  • Mahavikas Aghadi
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Sanjay Raut News: ‘शरद पवारांचा पक्ष गौतम अदानींच्या भावाने फोडला…’; संजय राऊतांचा  गौप्यस्फोट
1

Sanjay Raut News: ‘शरद पवारांचा पक्ष गौतम अदानींच्या भावाने फोडला…’; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

‘एकनाथ शिंदेंच्या पराभवासाठी भाजपची फिल्डिंग’; ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचं मोठं विधान
2

‘एकनाथ शिंदेंच्या पराभवासाठी भाजपची फिल्डिंग’; ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचं मोठं विधान

Sanjay Raut PC: भाजपला ठाण्यात एकनाथ शिंदेंचा पराभव करायचाय, त्यादृष्टीने…. ; संजय राऊतांचा गौप्यस्फोट
3

Sanjay Raut PC: भाजपला ठाण्यात एकनाथ शिंदेंचा पराभव करायचाय, त्यादृष्टीने…. ; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Sanjay Raut Live :पोलिस यंत्रणा आहे की खाकी वर्दीतली भाजपची टोळी; असं का म्हणाले संजय राऊत?
4

Sanjay Raut Live :पोलिस यंत्रणा आहे की खाकी वर्दीतली भाजपची टोळी; असं का म्हणाले संजय राऊत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.