Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahayuti candidate : ‘या’ मतदारसंघात राजकीय रंगत; महायुती-महाविकास आघाडीचे उमेदवार मैदानात, 9 उमेदवारांचे 14 अर्ज दाखल

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. सोमवारी एकूण 9 उमेदवारांनी 14 उमेदवारी अर्ज दाखल केले. महायुतीकडून भाजपचे उमेदवार बसवराज माधवराव पाटील यांनी अर्ज दाखल केला, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे महेश माणिकराव देशमुख मैदानात उतरले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 01, 2026 | 06:35 PM
'या' मतदारसंघात राजकीय रंगत; महायुती-महाविकास आघाडीचे उमेदवार मैदानात, 9 उमेदवारांचे 14 अर्ज दाखल

'या' मतदारसंघात राजकीय रंगत; महायुती-महाविकास आघाडीचे उमेदवार मैदानात, 9 उमेदवारांचे 14 अर्ज दाखल

Follow Us
Follow Us:
  • उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघात उमेदवारी अर्ज प्रक्रियेला वेग
  • 9 उमेदवारांचे 14 अर्ज दाखल
  • स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत हालचाली वाढल्या
  • महायुती-महाविकास आघाडीचे उमेदवार मैदानात
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून सोमवारी एकूण ९ उमेदवारांनी १४ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महायुतीकडून भाजपचे उमेदवार बसवराज माधवराव पाटील (औसा) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार महेश माणिकराव देशमुख (पेठसांगवी, ता. उमरगा) यांनी अर्ज सादर केला.

याशिवाय अपक्ष उमेदवार म्हणून अहमदखान सय्यद नूर राज सय्यद (माजलगाव), अर्चना विनोद गंगणे (तुळजापूर), सहालबिन आमेर चाऊस (माजलगाव), सचिन भारतराव पवार (धाराशिव), संजय पांडुरंगजी मुंदडा (कळंब), मिलिंद गणपती महालिंगे (चाकूर) आणि शरद रामभाऊ यादव (माजलगाव) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

भाजपाकडून राजेंद्र राऊतांनी दाखल केला अर्ज, जोरदार शक्तीप्रदर्शन, दिग्गजांची उपस्थिती

एकूण ९ उमेदवारांनी १४ अर्ज दाखल केले असून त्यामध्ये बसवराज पाटील यांनी ४ अर्ज, महेश देशमुख यांनी २ अर्ज आणि अर्चना विनोद गंगणे यांनी २ अर्ज दाखल केले आहेत. उर्वरित सर्व उमेदवारांनी प्रत्येकी एक अर्ज सादर केला आहे. महायुतीचे बसवराज पाटील आणि महाविकास आघाडीचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत होण्याची चिन्हे दिसत असली, तरी अपक्ष उमेदवारांच्या उपस्थितीमुळे निवडणुकीत उत्सुकता वाढली आहे. उमेदवारी अर्ज छाननी व माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार महेश माणिकराव देशमुख (पेठसांगवी, ता. उमरगा) यांनीही अर्ज सादर करत निवडणुकीच्या मैदानात दमदार एंट्री केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी दोन्ही बाजूंनी रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे.

या मतदारसंघात उस्मानाबाद (धाराशिव), लातूर आणि बीड जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडून आलेले सदस्य मतदार म्हणून मतदान करणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील राजकीय समीकरणे निर्णायक ठरणार आहेत. एकाच उमेदवाराने एकापेक्षा अधिक अर्ज दाखल करण्याच्या पद्धतीमुळे अर्जांची संख्या अधिक दिसत असली तरी प्रत्यक्ष लढतीचे चित्र अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेनंतर स्पष्ट होणार आहे. अपक्ष उमेदवार, स्थानिक गटबाजी आणि क्रॉस व्होटिंग यांचाही निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आता उमेदवारी अर्ज छाननी आणि माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार असून, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत रंगण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवारांची यादी जाहीर, काँग्रेसच्या दिग्गजांसह तरुण उमेदवारही मैदानात

Web Title: Osmanabad latur beed local authority election 14 nomination forms filed basavaraj patil mahesh deshmukh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 06:35 PM

Topics:  

  • Beed
  • Election
  • Latur

संबंधित बातम्या

UK Politics :लेबर पार्टीचे नेते अँडी बर्नहम बनले यूकेचे नवे पंतप्रधान, सोमवारी होणार अधिकृत घोषणा
1

UK Politics :लेबर पार्टीचे नेते अँडी बर्नहम बनले यूकेचे नवे पंतप्रधान, सोमवारी होणार अधिकृत घोषणा

Latur NEET Success : पेपरफुटीनंतर लातूरची दमदार एन्ट्री; NEETमध्ये ‘शाहू’चे 450, जिल्ह्यातील 1200 हून अधिक विद्यार्थ्यांना
2

Latur NEET Success : पेपरफुटीनंतर लातूरची दमदार एन्ट्री; NEETमध्ये ‘शाहू’चे 450, जिल्ह्यातील 1200 हून अधिक विद्यार्थ्यांना

Latur Crime: लातूर हादरलं! प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञांचा संशयास्पद आढळला मृतदेह; पोलिस म्हणाले ‘घातपात नाही’
3

Latur Crime: लातूर हादरलं! प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञांचा संशयास्पद आढळला मृतदेह; पोलिस म्हणाले ‘घातपात नाही’

Supreme Court : तिसरे अपत्य झाल्यास निवडणूक लढवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
4

Supreme Court : तिसरे अपत्य झाल्यास निवडणूक लढवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.