Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Tiger: ‘सर्वच आमदार-खासदार संपर्कात’; बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ, ठाकरे गटात पुन्हा मोठी फूट?

उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत, कोणाशी बोलत नाहीत किंवा कोणाच्या अडचणी समजून घेत नाहीत; याच कारणामुळे आम्ही उठाव केला होता," असे सांगत संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 10, 2026 | 04:25 PM
Operation Tiger Maharashtra, Sanjay Shirsat, Eknath Shinde,

Operation Tiger Maharashtra, Sanjay Shirsat, Eknath Shinde,

Follow Us
Follow Us:
  • ठाकरे गटाचे खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी गुप्त बैठक
  • येत्या एका महिन्यात ऑपरेशन टायगरचा प्रत्यय तुम्हाला दिसेल- संजय शिरसाट
  • उद्धव ठाकरे यांचे सर्व खासदार काय सर्व आमदारही पहिल्यापासून आमच्या संपर्कात- संजय शिरसाट
Operation Tiger Maharashtra political crisis: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी गुप्त बैठक झाली. ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याची बातमीने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वत: फेटाळून लावले आहेत. पण दुसरीकडे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मात्र ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार एका महिन्यात फुटणार असल्याचा दावा केला आहे.

संजय शिरसाट यांनी वर्धा येथे बोलताना राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर राबवले जाणार असल्याचे भाष्य केलं. आहे. ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. येत्या एका महिन्यात ऑपरेशन टायगरचा प्रत्यय तुम्हाला दिसेल, अस शिरसाट यांनी म्हटलं आहे. ठाण्यात एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक झाल्याची बातमी समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यातच आता शिरसट यांच्या वक्तव्याने आणखी बळ मिळाल्याचे दिसत आहे.

Maharashtra Politics: महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार, ८ खासदारांची ठाण्यात गुप्त बैठक? शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ सक्रिय

 

येत्या महिन्यातच तुम्हाला ऑपरेशन टायगरचा प्रत्यय येईल. उद्धव ठाकरे यांचे सर्व खासदार काय सर्व आमदारही पहिल्यापासून आमच्या संपर्कात आहेत. निवडणूक झाली तेव्हापासून सर्वजण संपर्कात आहेत. पण ऑपरेशन टायगर केव्हा आणि कसं करायचं, याचा निर्णय हे एकनाथ शिंदेसाहेब योग्य वेळेला घेतील, असे शिरसाट म्हणाले.

“उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत, कोणाशी बोलत नाहीत किंवा कोणाच्या अडचणी समजून घेत नाहीत; याच कारणामुळे आम्ही उठाव केला होता,” असे सांगत संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते पुढे म्हणाले की, “सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे जे काही आमदार-खासदार उरले आहेत, त्यांच्यातही तिथे राहण्याची मानसिकता उरलेली नाही. त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आपले आणि जवळचे वाटतात. येत्या एका महिन्यात तुम्हाला ‘ऑपरेशन टायगर’चा प्रत्यय येईल,” असा सूचक इशाराही शिरसाट यांनी यावेळी दिला.

Nashik Conversion Racket: नाशिक महिला पोलिसांचे ‘अंडरकव्हर’ ऑपरेशन; ‘ते’ आठ दिवस अन् धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश

मरेपर्यंत ठाकरेंसोबतच राहणार: अरविंद सावंत

दुसरीकडे संजय शिरसाट यांच्या दाव्याचा समाचार घेताना खासदार अरविंद सावंत यांनी आक्रमक भूमिका घेतली. “मी मरेपर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच राहणार. मला उभा चिरला तरी माझी निष्ठा बदलणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला विश्वास व्यक्त केला. शिरसाट यांनी बैठकीचे जे दावे केले आहेत, त्याबाबत “जर बैठक झाली असेल तर त्याचे फोटो प्रसारित करावेत,” असे थेट आव्हानही सावंतांनी दिले.

“शिवसेनेशी प्रतारणा करणे म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करण्यासारखे आहे. उद्धव ठाकरेंच्या एका फोनवर मी केंद्रीय मंत्रीपदही सोडले होते,” याची आठवण करून देत, चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्यांवर मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशाराही अरविंद सावंत यांनी यावेळी दिला.

Web Title: Political tremors in maharashtra shirsat backs reports of secret meeting between cm shinde and oppn mps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Sanjay Shirsat
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

‘ज्यांच्या पोटात दुखत असेल असेल त्यांच्यासाठी ठाण्यात..,’ शरद पवार यांच्या भेटीवरून एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांवर पलटवार
1

‘ज्यांच्या पोटात दुखत असेल असेल त्यांच्यासाठी ठाण्यात..,’ शरद पवार यांच्या भेटीवरून एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांवर पलटवार

‘संजय राऊत हे तर शरद पवारांचेच शिष्य’, एकनाथ शिंदेच्या भेटीनंतर गृहराज्यमंत्र्यांचा घणाघात; ‘पवार NDA मध्ये आले तर…
2

‘संजय राऊत हे तर शरद पवारांचेच शिष्य’, एकनाथ शिंदेच्या भेटीनंतर गृहराज्यमंत्र्यांचा घणाघात; ‘पवार NDA मध्ये आले तर…

Maharashtra Politics: शरद पवारांच्या पॉवर गेममुळे महाविकास आघाडीत खळबळ;  विधीमंडळात सर्वात मोठा राजकीय सस्पेन्स
3

Maharashtra Politics: शरद पवारांच्या पॉवर गेममुळे महाविकास आघाडीत खळबळ; विधीमंडळात सर्वात मोठा राजकीय सस्पेन्स

Nagpur Airport: नागपूर विमानतळाचा कायापालट! देशातील सर्वात मोठे लॉजिस्टिक हब उभारणार; ‘जीएमआर’ची ₹३२०० कोटींची योजना
4

Nagpur Airport: नागपूर विमानतळाचा कायापालट! देशातील सर्वात मोठे लॉजिस्टिक हब उभारणार; ‘जीएमआर’ची ₹३२०० कोटींची योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.