Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : बहुमत असूनही प्रशासकीय हस्तक्षेपाने सत्ता हिसकावली; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा भाजपवर थेट आरोप

कोयना दौलत डोंगरी महोत्सवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देसाई यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. ही केवळ राजकीय लढत नसून ‘दडपशाही’ आणि ‘प्रशासकीय हस्तक्षेप’ यांचा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 11, 2026 | 08:23 AM
Maharashtra Politics : '...तर आम्हाला आमच्या पर्यायांचा विचार करावा लागेल'; शंभूराज देसाईंचं मोठं विधान

Maharashtra Politics : '...तर आम्हाला आमच्या पर्यायांचा विचार करावा लागेल'; शंभूराज देसाईंचं मोठं विधान

Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर निर्माण झालेला सत्तासंघर्ष आणखी तीव्र झाला असून, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपवर थेट निशाणा साधला आहे. बहुमत आमच्याकडे असतानाही प्रशासनाचा वापर करून सत्ता हस्तगत करण्यात आली, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

कोयना दौलत डोंगरी महोत्सवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देसाई यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. ही केवळ राजकीय लढत नसून ‘दडपशाही’ आणि ‘प्रशासकीय हस्तक्षेप’ यांचा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत आपल्याकडे स्पष्ट बहुमत होते, हे सर्वांना ठाऊक असूनही वेगळी समीकरणे निर्माण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय स्वेच्छेने घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्व घडामोडींची माहिती देण्यात आली होती आणि सदस्यांच्या भूमिकेनुसारच निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. व्हीप मोडणाऱ्या सदस्यांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू असून संबंधित याचिका जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, दोन सदस्यांना पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप करत देसाई यांनी भाजपवर टीका केली. “सत्ता मिळवली नाही, तर आमच्याकडून हिसकावली,” असा आरोप त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

आमदार महेश शिंदे यांच्या वक्तव्यालाही देसाई यांनी उत्तर दिले. एकनाथ शिंदे यांना चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोप फेटाळून लावत त्यांनी सांगितले की, महायुतीतील सर्व हालचालींची माहिती आपण नियमितपणे देत होतो. चुकीचे ब्रीफिंग केल्याचा आरोप करणाऱ्यांनी ठोस पुरावे सादर करावेत, असेही त्यांनी आव्हान दिले.

याच वेळी कोयना दौलत डोंगरी महोत्सवाच्या यशाचाही त्यांनी आढावा घेतला. सुमारे १२ हजार पर्यटकांनी बोटिंगचा आनंद घेतल्याने सव्वा कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याचा दावा त्यांनी केला. भविष्यात राज्यभर अशा महोत्सवांचे आयोजन करण्यासाठी पर्यटन विभागाकडून अडीचशे कोटी रुपयांची मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Shambhuraj Desai : सीसीटीव्हीचा डाटा रिकव्हर करा ! पालकमंत्री शंभूराज देसाईंचे चौकशीचे आदेश

Web Title: Power snatched away through administrative interference despite holding a majority satara guardian minister shambhuraj desai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 08:23 AM

Topics:  

  • political news
  • Satara Zilla Parishad
  • Shambhuraj Desai

संबंधित बातम्या

Amravati Division : शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी 20 नामांकन अर्ज दाखल; पोहरे, शिंदेंचे शक्तिप्रदर्शन
1

Amravati Division : शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी 20 नामांकन अर्ज दाखल; पोहरे, शिंदेंचे शक्तिप्रदर्शन

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
2

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

‘राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार’; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा निर्णय
3

‘राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार’; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा निर्णय

काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा समोर; थेट माजी मुख्यमंत्र्यांना पक्षाकडून आला ‘तो’ आदेश
4

काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा समोर; थेट माजी मुख्यमंत्र्यांना पक्षाकडून आला ‘तो’ आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.