Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार? राज्यसभा निवडणुकीनंतर महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणासाठी शरद पवार गटाकडून दबाव वाढला होता. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील भाजप नेतृत्व चिंतेत होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 20, 2026 | 08:24 AM
प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार? राज्यसभा निवडणुकीनंतर महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता

प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार? राज्यसभा निवडणुकीनंतर महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच 10 राज्यांतील ३७ जागांसाठी राज्यसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा रंगू लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील दोन नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार गटातील वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील खासदार श्रीकांत शिंदे किंवा श्रीरंग बारणे यापैकी एका नावावर विचार सुरू असल्याची माहिती आहे.

अलीकडेच एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. शिंदे गट आपले राजकीय वर्चस्व वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे गटातील खासदारांमध्येही फूट पाडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा असून ‘ऑपरेशन टायगर’वर काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. अधिकाधिक खासदारांना सोबत घेऊन केंद्रात आपली ताकद वाढवण्याचा शिंदे यांचा प्रयत्न आहे. सध्या शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पदोन्नती देऊन कॅबिनेट मंत्री करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काहींचा पत्ता कटणार?

मंत्रिमंडळ फेरबदलात काही विद्यमान मंत्र्यांना वगळले जाऊ शकते, तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरण रोखण्यात भूमिका

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणासाठी शरद पवार गटाकडून दबाव वाढला होता. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील भाजप नेतृत्व चिंतेत होते. मात्र, प्रफुल्ल पटेल यांनी विलीनीकरण रोखण्यात तसेच सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदासाठी तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मानले जाते. त्यामुळे या राजकीय संकटाचे व्यवस्थापन केल्याबद्दल प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद देऊन सन्मानित केले जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

हेदेखील वाचा : Satara Politics : सातारा जिल्हा परिषदेत सत्तेची ‘गुढी’ उभारणार कोण? अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग

बारामती पोटनिवडणुकीवरून राजकारण सुरु

बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे आता या जागेवर पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न असतानाच ओबीसी समाजाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी मात्र ही पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: Praful patel likely to get an opportunity in the union cabinet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 08:24 AM

Topics:  

  • BMC Election
  • Maharashtra Politics
  • political news
  • Rajya Sabha Elections 2026

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
2

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
3

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
4

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.