Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“ब्रिटिश राजवटीप्रमाणे विरोधी आवाज दडपण्याचा प्रयत्न,” प्रकाश आंबेडकरांचा घणाघात, CJP आंदोलनावरून झाले आक्रमक

दिल्लीतील जंतर-मंतर येथे CJP आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर कठोर टीका केली. शांततापूर्ण आंदोलन दडपणे हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचा आरोप त्यांनी केला.

  • By विवेक
Updated On: Jul 20, 2026 | 08:47 PM
"ब्रिटिश राजवटीप्रमाणे विरोधी आवाज दडपण्याचा प्रयत्न," प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

"ब्रिटिश राजवटीप्रमाणे विरोधी आवाज दडपण्याचा प्रयत्न," प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

Follow Us
Follow Us:
  • प्रकाश आंबेडकरांचा आरोप, विरोधी आवाज दडपण्याची प्रवृत्ती लोकशाहीसाठी घातक असल्याचे मत
  • ब्रिटिश राजवटीशी तुलना करत सत्ताधाऱ्यांनी असहमती दडपण्याची पद्धत अवलंबल्याचा आरोप
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनासभेतील भाषणाचा संदर्भ देत लोकशाही मूल्यांवर भर
 

दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या CJP (कॉकरोच जनता पार्टी) च्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. आंदोलनकर्त्यांनी जंतर-मंतरवरून संसद भवनाच्या दिशेने मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संसद परिसरातील सुरक्षा लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखले. आरपीएफचे जवान आणि पोलिसांनी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला.यावरून आता देशभरातून मोठ्या प्रतिक्रिया येत असून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी यावरून सरकारवर निशाणा साधला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारला धारेवर धरत आपल्या ‘x’ अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जबाबत मोठे भाष्य करत भाजप सरकारची तुलना ब्रिटिश राजवटीसोबत केली आहे.

‘विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांवरच..,’ दिल्लीतील आंदोलनावर जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?

प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटले की, जबाबदारीची मागणी करणे, संवाद साधण्याची अपेक्षा व्यक्त करणे आणि शांततापूर्ण आंदोलन करणे ही सुदृढ लोकशाहीची ओळख आहे. मात्र, अशा आंदोलनांना बळाचा वापर करून दडपले जात असेल आणि असहमतीचा आवाज दाबला जात असेल, तर ते हुकूमशाहीच्या प्रवृत्तीचे लक्षण असल्याचा आरोप त्यांनी केला.

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरील कारवाई, मध्य प्रदेशातील केन-बेतवा नदी प्रकल्पग्रस्त आदिवासींचे आंदोलन आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा उल्लेख करत त्यांनी या घटनांमधून विरोधी आवाज दाबण्याची प्रवृत्ती दिसून येत असल्याचे म्हटले.

Seeking accountability, encouraging dialogue, and peaceful protests are hallmarks of a healthy democracy. But when peaceful protesters, seeking accountability are met with force and dissent is suppressed, it signals authoritarianism. Whether it is the forcible removal of Sonam… pic.twitter.com/olrNpYDWZG — Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 20, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा संदर्भ

प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये २५ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनासभेत केलेल्या भाषणाचा उल्लेख केला. लोकशाहीत सामाजिक आणि राजकीय बदलांसाठी घटनात्मक मार्गांचा अवलंब करण्यावर बाबासाहेबांनी भर दिला होता, असे त्यांनी नमूद केले.

तसेच, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांशिवाय लोकशाही टिकू शकत नाही. सत्तेला प्रश्न विचारणे, जबाबदारीची मागणी करणे आणि शांततापूर्ण मार्गाने असहमती व्यक्त करणे हे लोकशाहीच्या संरक्षणासाठी आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

‘विश्वगुरू झुरळांना घाबरतात’; दिल्लीतील आंदोलनावरून सुषमा अंधारेंचा मोदी सरकारवर घणाघात, ‘लोकशाही शेवटचा घटका मोजत आहे’

“ब्रिटिश राजवटीप्रमाणे विरोधी आवाज दडपण्याचा प्रयत्न”

प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांवर टीका केली. “ब्रिटिश राजवटीप्रमाणे विरोधी आवाज आणि असहमती दडपण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला आहे,” असा आरोप त्यांनी केला.

त्यांच्या मते, इतिहासाने अनेकदा दाखवून दिले आहे की प्रश्न दडपून टाकल्याने सत्ता अधिक मजबूत होत नाही. उलट लोकांचा असंतोष वाढतो आणि लोकशाहीत हुकूमशाही पद्धती रुजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाच त्याची राजकीय किंमत मोजावी लागते.

प्रकाश आंबेडकरांच्या या विधानामुळे दिल्लीतील आंदोलन आणि त्यावरील पोलिस कारवाईचा मुद्दा आता आणखी राजकीय चर्चेचा विषय बनण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

Web Title: Prakash ambedkar slams centre over cjp protest lathicharge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 08:47 PM

Topics:  

  • Abhijeet Deepke
  • BJP Government
  • CJP Protest
  • Prakash Ambedkar

संबंधित बातम्या

Rahul Gandhi on Central Goverment: ‘विद्यार्थी रस्त्यावर, पेपर लीकचे गुन्हेगार मोकाट’; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर घणाघात
1

Rahul Gandhi on Central Goverment: ‘विद्यार्थी रस्त्यावर, पेपर लीकचे गुन्हेगार मोकाट’; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर घणाघात

‘विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांवरच..,’ दिल्लीतील आंदोलनावर जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य
2

‘विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांवरच..,’ दिल्लीतील आंदोलनावर जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य

JP Nadda On CJP Protest: कॉकरोच जनता पार्टी’चे आंदोलन मागे घेतले जाणार? जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याने वाढल्या राजकीय चर्चा
3

JP Nadda On CJP Protest: कॉकरोच जनता पार्टी’चे आंदोलन मागे घेतले जाणार? जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याने वाढल्या राजकीय चर्चा

CJP Protest: काहीतरी मोठं घडणार! अमित शाह ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये; उच्चस्तरीय बैठकीत काय निर्णय होणार?
4

CJP Protest: काहीतरी मोठं घडणार! अमित शाह ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये; उच्चस्तरीय बैठकीत काय निर्णय होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.