'विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांवरच..,' दिल्लीतील आंदोलनावर जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या CJP (कॉकरोच जनता पार्टी) च्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. आंदोलनकर्त्यांनी जंतर-मंतरवरून संसद भवनाच्या दिशेने मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संसद परिसरातील सुरक्षा लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखले. सुरुवातीला पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक मागे हटण्यास तयार नसल्याने त्यांनी सुरक्षा बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी लाठीचार्ज केला. आरपीएफचे जवान आणि पोलिसांनी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला.यावरून आता देशभरातून मोठ्या प्रतिक्रिया येत असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी यावरून सरकारवर निशाणा साधला आहे.
जयंत पाटील यांनी आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून सरकारवर जोरदार निशाणा साधत “विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांवरच लाठी चालवण्यासारखे आहे,” असे म्हंटले आहे.
जयंत पाटील आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून म्हणाले, “”जंतरमंतरवर शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांवरच लाठी चालवण्यासारखे आहे. प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तर देण्याऐवजी लाठ्यांनी गप्प करण्याचा प्रयत्न होत असेल, तर ती लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे. देशाचे भविष्य घडवणाऱ्या तरुणांचा आवाज दाबून प्रश्न संपत नाहीत, उलट व्यवस्थेवरील विश्वास कमी होतो.”
जंतरमंतरवर शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांवरच लाठी चालवण्यासारखे आहे. प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तर देण्याऐवजी लाठ्यांनी गप्प करण्याचा प्रयत्न होत असेल, तर ती लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे. देशाचे भविष्य… pic.twitter.com/IEtZfCnUUf — Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 20, 2026
ते पुढे म्हणले, “संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारणाऱ्या सत्तेने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांच्या आवाजाचा आदर करा.”
जयंत पाटील यांनी पुढे म्हटले की, देशाचे भविष्य घडवणाऱ्या तरुणांचा आवाज दाबून कोणतीही समस्या सुटत नाही. उलट अशा घटनांमुळे व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास कमी होऊ शकतो.
‘अरे मोदीजींच्या चमच्या, देश काय बापाची जाहगीर वाटली काय ?’; रोहिणी खडसेंचा अतुल भातखळकरांवर घणाघात
त्यांनी सरकारला संवादाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन करत, “संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारणाऱ्या सत्तेने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांच्या आवाजाचा आदर करा,” असेही आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
दिल्लीतील आंदोलन, त्यावरील पोलिसांची कारवाई आणि त्यानंतर उमटणाऱ्या राजकीय प्रतिक्रिया यामुळे हा मुद्दा आता राष्ट्रीय स्तरावरील चर्चेचा विषय बनला आहे.






