Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींची छी-थू होतेय’; प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात, स्मार्ट मीटरवरही सरकारला सवाल

अकोल्यात पत्रकार परिषद घेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि विरोधी पक्षांवर सडकून टीका केली. स्मार्ट मीटर योजनेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारकडून खुलासा करण्याची मागणी केली.

  • By विवेक
Updated On: Jun 26, 2026 | 05:50 PM
'आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींची छी-थू होतेय'; प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात,

'आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींची छी-थू होतेय'; प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात,

Follow Us
Follow Us:
  • प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; देश आर्थिक गुलामीकडे जात असल्याचा दावा
  • महाविकास आघाडीतील काही नेते भाजपमध्ये जाण्यास उत्सुक असल्याचा आरोप
  • स्मार्ट मीटर योजनेवर प्रश्न उपस्थित करत सरकारकडून पारदर्शकतेची मागणी
 

अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. विधान परिषदेच्या निवडणुकीचा संदर्भ देत त्यांनी विरोधी पक्षांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आंबेडकर म्हणाले की, विधान परिषदेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शेवटपर्यंत लढले, मात्र काँग्रेसचे काही उमेदवार मैदानातून बाहेर पडले किंवा लढलेच नाहीत. त्यामुळे राज्यातील विरोधी राजकारण कमकुवत होत असल्याची टीका त्यांनी केली.

राजकीय व्यवस्थेला लकवा, आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान मोदीची छी थू

“विधान परिषदेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शेवटपर्यंत लढले. काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे पळून गेले, काही लढलेच नाही. इथले राजकीय पक्ष गुलाम होताय का? अशी परिस्थिती उद्भवली आहे. आरएसएसचे मोहन भागवत ही पंतप्रधान मोदीचे गुलाम झालेले दिसताय. आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान मोदीची छी थू होत आहे. देशाला आर्थिक दृष्टीने गुलाम करण्याची परिस्थिती सुरू झाली आहे. राजकीय व्यवस्थेला लकवा लागला, तर सामान्य लोकांनी त्याविरोधात आवाज उचलला पाहिजे,” असे विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

‘फोडाफोडीची नशा चढली, उद्या फडणवीसांनाही फोडतील’; ‘ऑपरेशन टायगर’वर संजय राऊतांचा पलटवार

“भाजपला अंगावर घेणे आंबेडकरी चळवळीशिवाय कोणी करू शकत नाही”

“भाजपला अंगावर घेणे आणि सत्तेतून खाली खेचणे हे आंबेडकरी चळवळीशिवाय दुसरे कोणी करू शकत नाही. हा फोर्स आपल्यासोबत घ्यायचा नसेल तर यांना ‘बी टीम’ म्हणून स्टॅम्प मारण्याचे काम ज्यांना आमची मदत पाहिजे होती, ते इथले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी, डावे पक्ष यांनी केले. आज तेच भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत.”

‘देश आर्थिक गुलामीकडे जात आहे’, विरोधी पक्षांनाही टोला

प्रकाश आंबेडकर यांनी दावा केला की, “आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान मोदींवर टीका होत असून देश आर्थिकदृष्ट्या अडचणीत जात आहे. त्यांनी असेही म्हटले की, राजकीय व्यवस्था निष्क्रिय झाली तर सामान्य नागरिकांनी पुढे येऊन आवाज उठवला पाहिजे.

पंतप्रधान मोदी यांच्या चारित्र्यावर सुब्रहमण्यम स्वामी, मधुकिश्वर, संदीप वानखेडे यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदीने देश गहाण ठेवला आहे. आंतराष्ट्रीय शक्तीने मोदीला गुलाम केले, मोदीने मोहन भागवतला आणि राजकीय पक्षांना गुलाम केले. सर्वसामान्य… pic.twitter.com/0SrLZS8yYV — Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) June 26, 2026

महाविकास आघाडीतील अनेक नेते भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असल्याचा आरोप करत, भाजपसोबत न जाणारेच खरे विरोधक असल्याचे निकष जनतेने लावावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

मोदींच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह ?

ते यावेळी म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांच्या चारित्र्यावर सुब्रहमण्यम स्वामी, मधुकिश्वर, संदीप वानखेडे यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदीने देश गहाण ठेवला आहे. आंतराष्ट्रीय शक्तीने मोदीला गुलाम केले, मोदीने मोहन भागवतला आणि राजकीय पक्षांना गुलाम केले. सर्वसामान्य मतदारांना आवाहन आहे की, मतदाराला लकवा झालेला नाहीये. त्यांनी आपल्या हातात परिस्थिती घेतली पाहिजे. कारण, हे राजकीय पक्ष सत्ताधाऱ्यांचे गुलाम झाले आहेत. लोक लढ्यातून आपले प्रश्न सोडवण्यासाठी पुढे आले पाहिजे.”

‘गँगस्टरही अशी भाषा बोलणार नाही, असं खासदार बोलतोय’; राज ठाकरे यांचा संजय दिना पाटलांवर निशाणा

स्मार्ट मीटर योजनेवर सरकारला थेट सवाल

स्मार्ट मीटर योजनेवरही प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला लक्ष्य केले. जुने वीज मीटर कार्यरत असताना जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याची गरज काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

तसेच, स्मार्ट मीटरच्या कंत्राटांबाबत पारदर्शकता राखावी आणि संबंधित कंपन्यांचा व सत्ताधारी पक्षाचा काही संबंध आहे का, याबाबत सरकारने खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: Prakash ambedkar slams pm modi smart meter bjp akola press conference

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 05:50 PM

Topics:  

  • Adv Prakash Ambedkar
  • PM Narendra Modi
  • Vanchit Bahujan Aghadi

संबंधित बातम्या

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल
1

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा
2

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
3

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात
4

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.