Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune BJP-NCP Clash: पुणे महापालिकेत भाजप-राष्ट्रवादीत ‘लेटर वॉर’चा भडका; सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना ताटकळत ठेवल्याने राजकारण तापलं

Pune BJP-NCP Clash: सर्वसाधारण सभेत प्रस्तावांच्या अनुक्रमानुसार मंजुरी न देता भाजपने आधी स्वतःच्या नगरसेवकांचे सर्व प्रस्ताव मंजूर करून घेतले. विरोधकांच्या प्रस्तावांवर टाळाटाळ करत त्यांना उशिरा मंजुरी दिली.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 27, 2026 | 12:15 PM
Pune Municipal Corporation, PMC General Body Meeting

Pune Municipal Corporation, PMC General Body Meeting

Follow Us
Follow Us:
  • पुणे महापालिकेत सत्ताधारी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय वाद विकोपाला
  • सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेवकांचे प्रस्ताव आधी मंजूर; विरोधकांचे प्रस्ताव उशिरा घेतले
  • मंत्री चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या चौकशीच्या मागणीवरून वादाला तोंड फुटले
Pune BJP-NCP Clash: महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष म्हणून ‘भूमिका’ बजावणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष वाढत चालला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वर्गीकरणाचे विषय मान्य करताना भाजपने विरोधी पक्षाला ताटकळत ठेवले. सदर प्रस्ताव मंजुर करताना भाजपने विरोधकांवर टिका करण्याची संधी सोडली नाही. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांच्या तरतुदीचे वर्गीकरणाचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते.

सत्ताधारी भाजपने सुरुवातीला त्यांच्या नगरसेवकांनी मांडलेले सर्व वर्गीकरणाचे प्रस्ताव मंजुर करून घेतले. हे मंजुर करुन घेताना क्रमांकानुसार न मांडता, विरोधी पक्षातील नगरसेवकांचे प्रस्ताव उशीरा मांडून मंजुर केले. त्या दरम्यान, विरोधी पक्षातील नगरसेवकांकडूनही आमचे प्रस्ताव घ्या, क्रमांकानुसार प्रस्तावांना मान्यता द्या अशी मागणी केली जात होती. परंतु, सत्ताधारी भाजपकडून मंजुर करू असे आश्वासन दिले गेले. हे मंजूर करताना सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील राजकीय संघर्ष दिसून आला.

Nepal Flood: ‘नेपाळमधील धोका टळला नाही…’ येऊ शकतो आणखी एक विनाशकारी पूर? शास्त्रज्ञांनी दिला मोठा इशारा

प्रस्तावांना मंजुरी देताना सभागृह नेते गणेश बिडकर यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ‘लेटर वॉर’, आरोप- प्रत्यारोपांचा समाचार घेत राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि शहराध्यक्षांना टोमणे मारत आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला गेला. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून झालेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केली होती, त्याला नगरसेवक सुहास टिंगरे यांनी अनुमोदन दिले होते. तेव्हापासून हा संघर्ष निर्माण झाला असुन, सत्ताधारी भाजपने या दोन्ही नगरसेवकांनी सुचविलेल्या कामाची तरतुद शुन्य केली. यातून पुढे ‘लेटर वॉर’ सुरु झाले आहे. दोन्ही पक्षातील नगरसेवकांनी एकमेकांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांना पत्र पाठविले आहे. हा संघर्ष सर्वसाधारण सभेतही दिसून आला.

सभेच्या सुरुवातीलाच भाजपच्या प्रस्तावांना प्राधान्य

सभेचे कामकाज सुरू होताव सत्ताधारी भाजपाने आपल्या नगरसेवकांच्या प्रस्तावांना प्राधान्य देत ते मंजूर करण्यास सुरुवात केली. विरोधी पक्षांच्या प्रस्तावांचा क्रमांक मागे पडत असल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. आपले प्रस्ताव मंजूर होणार की आणखी ताटकळत राहणार, याबाबत काही नगरसेवकांनी सभागृह नेत्यांच्या बाकाकडे धाव घेतली.

Aai Tuljabhavani: तुळजाई भावाला देणार जगातली सर्वात मौल्यवान भेट, रक्षाबंधन स्पेशल

सर्वांना समान न्यायाची बिडकरांची कोपरखळी

सर्वसाधारण सभेचे कामकाज संपत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे निधीविषयक प्रस्ताव मंजीसाठी आले. त्यावेळी बिडकरांनी राजकीय टोलेबाजीला सुरुवात केली. ‘आम्ही अजिबात भेदभाव करत नाही, सर्वांना समान न्याय देतो,’ असे मिश्कीलपणे सांगत त्यांनी विरोधी पक्षनेते अॅड. निलेश निकम यांच्याकडे पाहून, ‘सांगा तुमच्या शहराध्यक्षांना… सांगा तुमच्या वरिष्ठ नेत्यांना, अशी कोपरखळी मारली.

 

 

Web Title: Pune newsbjp vs ncp ajit pawar faction clash in pune municipal corporation general body meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • chandrakant patil
  • Pune Municipal Corporation
  • Pune Politics

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Pune Visit: राहुल गांधीं आज पुणे दौऱ्यावर; तरुणांशी साधणार संवाद,दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क
1

Rahul Gandhi Pune Visit: राहुल गांधीं आज पुणे दौऱ्यावर; तरुणांशी साधणार संवाद,दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.