Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrakant Patil : ‘EVM असो वा बॅलेट पेपर, जिंकणार आम्हीच!’ चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना टोला

Chandrakant Patil : पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. EVM असो किंवा बॅलेट पेपर, जिंकणार आम्हीच, असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. सचिन सानप यांना शिवसेनेच्या पाठिंब्यावरही त्यांनी भाष्य केलं.

  • By विवेक
Updated On: Oct 18, 2026 | 04:43 PM
Chandrakant patil

Chandrakant patil

Follow Us
Follow Us:
  • पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीवरून रणधुमाळी
  • चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना टोला
  • सचिन सानप यांना शिवसेनेचा पाठिंबा
 

Chandrakant Patil : राज्यात विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल सध्या वाजत आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीत पाचहि जागांवर चुरशीची लढत होणार आहे. एकीकडे विरोधकांकडून EVM मशीनला विरोध होत असून सत्ताधारीही त्यांना प्रत्युत्तर देण्यास कमी पडत नसल्याचे दिसत आहे. अश्यातच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान करत ‘निवडणुका EVM वर घ्या किंवा बॅलेट पेपरवर, जिंकणार तर आम्हीच..’ असा विश्वास व्यक्त केला आहे.

पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी सोलापूर दौऱ्यावर असताना चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. विरोधकांकडून ईव्हीएमच्या वापरावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

‘निवडणुका ईव्हीएम मशीनवर घ्या किंवा कागदावर घ्या, जिंकणार तर आम्हीच आहोत,’ असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. विरोधकांची अवस्था ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी झाल्याची टीकाही त्यांनी केली.

Sanjay Raut : सहा महिन्यांत मोदी सरकार कोसळणार? संजय राऊतांचा मोठा दावा; मोदींच्या जागी कोण येणार, राऊतांनी दिले संकेत

दिल्ली विद्यापीठातील निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने चारपैकी तीन जागा जिंकल्याचा आणि ओडिशातील सहा विद्यापीठांच्या निवडणुकांत विजय मिळवल्याचा दाखला त्यांनी दिला. आगामी निकालातही आपली ताकद दाखवून देऊ, असं ते म्हणाले.

सचिन सानप यांना शिवसेनेचा पाठिंबा

पुणे शिक्षक मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या भूमिकेवरही भाष्य केलं. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा दिल्याबद्दल विचारलं असता, हा पाठिंबा ‘बॅड न्यूज’ असल्याचं त्यांनी म्हटलं.

मात्र, अजून दोन दिवस बाकी असून या काळात काहीतरी सकारात्मक घडेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सध्याची परिस्थिती ‘नाईलाज को क्या इलाज’ अशी असल्याचं सांगत त्यांनी या विषयावर अधिक भाष्य करणं टाळलं. महायुतीतील मित्रपक्षांवर टीका करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

EVM वरून राजकीय संघर्ष आणखी तीव्र

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, ईव्हीएमचा वापर आणि मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून विरोधकांकडून निवडणूक आयोगावर टीका केली जात आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांकडून होत आहे.

या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे निवडणुकीच्या प्रचारातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार आली आहे. आता पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने लागतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार? अनेक मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; तर तरुण आमदारांना…

💡

Frequently Asked Questions

  • Que: चंद्रकांत पाटील यांनी EVM आणि बॅलेट पेपरबाबत काय विधान केलं?

    Ans: निवडणूक ईव्हीएम मशीनवर घ्या किंवा कागदावर, विजय आमचाच होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

  • Que: सचिन सानप यांना शिवसेनेने पाठिंबा दिल्यानंतर चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

    Ans: शिवसेनेचा सचिन सानप यांना पाठिंबा ही बॅड न्यूज असल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र, पुढील दोन दिवसांत काहीतरी सकारात्मक घडेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

  • Que: पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कोणता मुद्दा चर्चेत आहे?

    Ans: ईव्हीएम विरुद्ध बॅलेट पेपरचा वाद, महायुतीतील पक्षांची भूमिका आणि अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना शिवसेनेचा पाठिंबा हे मुद्दे चर्चेत आहेत.

Web Title: Pune teacher graduate election chandrakant patil evm ballot paper vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • BJP
  • chandrakant patil
  • MLC Election

संबंधित बातम्या

Nagpur News :भाजप नेत्यांचा १०० कोटींचा गरबा ;दुष्काळावरून लोंढे यांचा सरकारवर हल्लाबोल
1

Nagpur News :भाजप नेत्यांचा १०० कोटींचा गरबा ;दुष्काळावरून लोंढे यांचा सरकारवर हल्लाबोल

शिंदेसेनेच्या पाठिंब्यामुळे भाजपसमोर आव्हान! नंदनवनवरील बैठकीनंतर राजकीय समीकरणांना नवे वळण
2

शिंदेसेनेच्या पाठिंब्यामुळे भाजपसमोर आव्हान! नंदनवनवरील बैठकीनंतर राजकीय समीकरणांना नवे वळण

Drought Hit Farmers Diwali 2026:  शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
3

Drought Hit Farmers Diwali 2026: शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Gopichand Padalkar : ‘बोल कमी, काम जास्त कर!’ चंद्रकांत पाटलांनी पडळकरांना चॉकलेट देत सुनावलं
4

Gopichand Padalkar : ‘बोल कमी, काम जास्त कर!’ चंद्रकांत पाटलांनी पडळकरांना चॉकलेट देत सुनावलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.