Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi : लाठ्या काठ्यांनी जमाव पांगवता येतो, प्रश्न नाही! राहुल गांधींचा ‘वोट चोरी’ प्रकरणी पुन्हा निशाणा

Rahul Gandhi : विरोधी पक्षनेते व खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी SIR प्रक्रिया व निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी केलेल्या आंदोलनाबाबत भाष्य केले. यावेळी दिल्लीत तरुणांना अटक करून त्यांना मारहाण केल्याचा आरोपही त्यांनी केला.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 02, 2026 | 09:22 PM
Rahul Gandhi : लाठ्या काठ्यांनी जमाव पांगवता येतो, प्रश्न नाही, राहुल गांधींचे 'वोट चोरी' वर पुन्हा साधला निशाणा

Rahul Gandhi : लाठ्या काठ्यांनी जमाव पांगवता येतो, प्रश्न नाही, राहुल गांधींचे 'वोट चोरी' वर पुन्हा साधला निशाणा

Follow Us
Follow Us:
  • बापूंच्या शिकवणीने लोकांचे शांततेत आंदोलन
  • तरुणांना मारहाण होत असल्याचा आरोप
  • SIR विरोधात विरोधी पक्ष एकवटले
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी ‘वोट चोरी’चा उल्लेख करताना पुन्हा एकदा मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार आणि केंद्रावर निशाणा साधला. तसेच खासदार राहुल गांधी यांनी आरोप केला की, तरुणांना रस्त्यांवर मारहाण करण्यात येत आहे. शुक्रवारी गांधी जयंतीदिनी हजारो तरुण वोट चोरी विरोधात रस्त्यावर उतरले. त्यांनी शांततेत, कोणत्याही हिंसेशिवाय, संविधानिक अधिकारांचा वापर करत आंदोलन केले.
त्यांची मागणी स्पष्ट आहे की, लोकशाही वाचवा आणि ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. पण मोदी-शहा सरकार यावर काय उत्तर देते? ते तरुण-तरुणींना रस्त्यावर फरफटत नेत आहेत. शेकडो जणांना ताब्यात घेतले आहे. फक्त वोट चोरीवर प्रश्न करणे ही त्यांची चुक आहे का?

ते पुढे म्हणाले की, बापूंची ही शिकवण होती की, सत्य बोला. शांततेत लढा द्या आणि हेच सरकारला सर्वात जास्त घाबरवते. कारण लाठ्या-काठ्यांनी जमाव पांगवता येतो, पण प्रश्न नाही. ज्ञानेश कुमार जाणार व ज्या सिस्टमने त्यांना बसवले आहे, तेही जाणार.

जंतर-मंतरवर विरोधी पक्षाचे आंदोलन

मतदार याद्यांतील कथीत घोटाळा व विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेविरोधात गांधी जयंतीच्या दिवशी देशभरात विरोधी पक्ष, विद्यार्थी संघटनांनी शांततेत जनआंदोलन केले. या दरम्यान, दिल्ली आणि मुंबईसमवेत देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे पाहण्यास मिळाले. दिल्लीच्या जंतर-मंतरच्या दिशेने जाणाऱ्या विद्यार्थी संघटना व यूथ काँग्रेसच्या सदस्यांना पोलिसांनी बॅरिकेडींग करत रोखले. तसेच शेकडो आंदोलकर्त्यांना ताब्यात घेतले.

CJP Protest Against Gyanesh Kumar Live: फडणवीस साहेब या महाराष्ट्राचा वारसा विसरू नका’; अभिजीत दिपकेंचे आवाहन

मुंबईतही CJP चे आंदोलन

आंदोलनकर्ते आणि विरोधी पक्षाचा मुख्य आरोप आहे की, निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करण्याऐवजी सत्तेतील लोकांच्या दबावात काम करत आहे. त्यांनी कोणत्याही सुनावणीशिवाय मतदार यांच्यातून अनेकांचे नाव हटवले आहे.
दुसरीकडे, मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये कॉक्रोज जनता पार्टी (CJP) चे आंदोलन शुक्रवारी संध्याकाळी संपले. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके संध्याकाळी धरणास्थळावरून परतले. CJPच्या वतीने यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावेळी काही हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनादरम्यान गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.

Ramdas Athawale: महायुतीत रामदास आठवले आक्रमक! ‘आम्हालाही सत्तेत वाटा द्या’; मित्रपक्षांकडे केली मोठी मागणी

Web Title: Rahul gandhi congress leader again targets central government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 09:20 PM

Topics:  

  • amit shaha
  • narendra modi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
1

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी
2

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं
3

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
4

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.