
Raj Thackeray, Rahul Gandhi, Sharad Pawar, MVA, INDIA Alliance,
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यात थेट संवाद सुरू असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यां संदर्भात गौप्यस्फोट केला आहे. राज ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात संवाद सुरू आहे. सर्वे विरोधी पक्षांमधील प्रमुख नेत्यांमध्ये असा संवाद का असू नये?” असा रोखठोक सवाल त्यांनी विचारला आहे. आजचे आंदोलन हे राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा एक भाग आहे. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील आता बैठकीला येत आहेत. त्यांच्याशीही संवाद सुरू आहे.
आजच्या बैठकीचा अजेंडा हा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या गैरकारभाराविरोधातील आहे. शरद पवार यांच्या एनडीए प्रवेशाबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, शरद पवार यांनी, ‘आम्ही कुठेही जाणार नाही. ज्यांना यायचं आहे त्यांनी आमच्यासोबत यावं.’ असं म्हटलं आहे. त्यामुळे ते कुठेही जाणार नाही. शरद पवार हे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे प्रमुख नेते आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखालील मुळ राष्ट्रवादी कुठेही जाणार नाही.
शरद पवारांच्या भाजप नेत्यांसोबत होणाऱ्या भेटींवर विचारले असता ते म्हणाले की, सहकार क्षेत्र, बँकिंग किंवा कौटुंबिक गोष्टींसाठीही राजकीय नेत्यांमध्ये भेटीगाठी होत असतात, त्यात राजकारण आणणे चुकीचे आहे. शरद पवारांचा मूळ पक्ष हा महाविकास आघाडीसोबत पूर्ण ताकदीने विरोधी आघाडीसोबतच ठाम राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
MPSC चा मोठा निर्णय; राज्य सेवा २०२५ च्या कॉप्यांची पुन्हा तपासणी, २०२६ च्या परीक्षाही पुढे ढकलल्या!
राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, कर्ज काढण्यापेक्षा कॅबिनेट मंत्री, इतर मंत्र्यांना ५००-५०० कोटींची ठेकेदारी देऊन दलाली वसूल केली. ते जनतेला खर्च कमी करा सांगतायेत त्यापेक्षा तुम्ही खर्च कमी करा, वारंवार चार्टर्ड प्लेनने दिल्लीला जाताय ते कशासाठी, ५० कोटी, १०० कोटींना आमदार खासदार विकत घेताय ते कशासाठी तो खर्च कमी करा आणि तो दुष्काळग्रस्तांना द्या, हे अधिक सोप आहे. जनतेने खर्च कमी करायला सांगण्यापेक्षा तुम्ही पैशांची उधळपट्टी कमी करा. कर्ज काढून सण साजरे करणे ही तिजोरीची लूट आहे. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली तुम्ही पुरुषांनाही योजनेचा लाभ दिला, तिथे खर्च कमी करा, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला. “मोदीजी बारामतीला येतात-जातात, ती त्यांची ट्रॅव्हलिंग कंपनी आहे आणि ते फ्री तिकिटे वाटत असतात, अजित पवारांचा किंवा एकनाथ शिंदे यांचेही पक्ष त्यांचे स्वत:चे नसून ते गृहमंत्री अमित शाहांचे पक्ष आहेत. ज्यावेळी अमित शाह दिल्लीच्या राजकारणात नसतील त्यावेळी या पक्षांचे भवितव्य काय असेल य यावर त्यांनी चिंतन बैठक घेतली पाहिजे. भविष्यामध्ये नरेंद्र मोदीच हे सगळे पक्ष बुडतील, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.