Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील राहुल गांधींच्या कार्यक्रमावर फडणवीसांचा गंभीर आरोप; सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना पैसे देण्याचा दावा

राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमावरून राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमासाठी विद्यार्थिनी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना पैसे देऊन बोलावल्याचा दावा केला असून, नवनाथ बन यांच्या आरोपांची पडताळणी केली जाणार असल्याचे सांगितले.

  • By विवेक
Updated On: Aug 22, 2026 | 03:30 PM
Fadnavis on rahul gandhi

Fadnavis on rahul gandhi

Follow Us
Follow Us:
  • राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमासाठी विद्यार्थिनी आणि इन्फ्लुएंसर्सना पैसे देऊन बोलावल्याचा फडणवीसांचा दावा.
  • कार्यक्रमाबाबत नवनाथ बन यांनी केलेल्या आरोपांची पडताळणी केली जाणार.
  • कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला ABVP आणि NSUI कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष
 

राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित करत काही खळबळजनक दावे केले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी कार्यक्रमासाठी विद्यार्थिनी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना नियोजित पद्धतीने आणले जात असल्याचा आरोप केला.

फडणवीस यांच्या दाव्यानुसार, कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या सुमारे 90 ते 95 टक्के मुली या काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजशी संबंधित आहेत. इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी आणले जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

इन्फ्लुएंसर्सना सकारात्मक कंटेंटची अट?

कार्यक्रमाच्या सोशल मीडिया प्रमोशनबाबतही फडणवीस यांनी गंभीर आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना कार्यक्रम आणि राहुल गांधी यांच्याबाबत केवळ सकारात्मक कंटेंट प्रकाशित करण्यास सांगण्यात आले आहे. सकारात्मक पोस्ट केल्यासच पैसे दिले जातील, तर नकारात्मक कंटेंट टाकल्यास पैसे मिळणार नाहीत, अशी अट असल्याचा दावा त्यांनी केला.

Rahul Gandhi Protest: NEET, पेलेट गन अन् ‘वंदे मातरम्’वरून राजकीय घमासान; राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर

नवनाथ बन यांच्या आरोपांची चौकशी

भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याचा आरोप केला होता. कार्यक्रमासाठी हजारो लोकांवर मोठा खर्च करण्यात येत असून, एकूण खर्च कोट्यवधी रुपयांपर्यंत असल्याचा दावा त्यांनी केला.

याबाबत बोलताना फडणवीस यांनी बन यांनी केलेल्या आरोपांची पुराव्यांच्या आधारे पडताळणी केली जाईल, असे स्पष्ट केले. कार्यक्रमासाठी वापरल्या जाणाऱ्या निधीच्या स्रोतावरूनही काँग्रेसकडून स्पष्टीकरण मागितले जात आहे.

कार्यक्रमाआधी पुण्यात संघर्ष

दरम्यान, राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ABVP आणि NSUI कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. कार्यक्रमाच्या आदल्या रात्री झालेल्या या वादानंतर काही जणांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

Harshwardhan Sapkal Allegations On BJP:    पुण्यात दंगल घडवण्याचा प्रयत्न; हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर थेट आरोप

या कारवाईवर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला असून, केवळ आपल्या कार्यकर्त्यांवर कारवाई करून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याभोवतीचा राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Web Title: Rahul gandhi pune event devendra fadnavis serious allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Congress
  • pune news
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
1

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

काँग्रेसमध्ये पुन्हा इनकमिंग; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत बड्या नेत्यांचा प्रवेश
2

काँग्रेसमध्ये पुन्हा इनकमिंग; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत बड्या नेत्यांचा प्रवेश

चाकण-हिंजवडीतील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी डुडी यांनी अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
3

चाकण-हिंजवडीतील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी डुडी यांनी अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

पुण्यात पुन्हा पाणी कपातीचे संकट; आठवड्यातून एक दिवस पाणी ठेवणार बंद
4

पुण्यात पुन्हा पाणी कपातीचे संकट; आठवड्यातून एक दिवस पाणी ठेवणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.