Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormuz Attack: भारतीय नाविकांच्या मृत्यूप्रकरणी राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल; पंतप्रधान मोदींवर चौफेर टीका

गेल्या तीन दिवसांत ओमानच्या किनाऱ्याजवळ तीन व्यापारी जहाजावंर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात ३ भारतीय नाविकांचा मृत्यू झाला. यावरून आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याघटनेवरून तीव्र नाराजी व्यक्त करत मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jun 12, 2026 | 04:02 PM
Rahul Gandhi slams PM Narendra Modi over three Indians died in Hormuz attack,

Rahul Gandhi slams PM Narendra Modi over three Indians died in Hormuz attack,

Follow Us
Follow Us:

Hormuz Attack News in Marathi : गेल्या तीन दिवसांत ओमानच्या किनाऱ्याजवळ तीन व्यापारी जहाजावंर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात ३ भारतीय नाविकांचा मृत्यू झाला. यामुळे भारत आणि अमेरिकेत राजनैतिक हालचालींना वेग आला आहे. या दरम्यान इराणने देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. इराणने भारतीय नाविकांच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर अमेरिकेवर गंभीर आरोप करत आक्रमक भूमिका घेतली आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात यावरून गरमागरमीचे वातावरण असतानाच आता देशभरातूनही या घटनेबाबत तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. अश्यातच, काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याघटनेवरून तीव्र नाराजी व्यक्त करत मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

ओमानच्या समुद्रातून प्रवास करणाऱ्या एमटी मॅरिव्हेक्स, एमटी सेटेबेलो आणि एमटी जलवीर या जहाजांवर हल्ला केला होता. या तिन्ही जहाजांवर भारतीय नाविक तैनात होते. यातील एमटी मॅरिव्हेक्स जहाजावरील ३ भारतीय नाविकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर भारताने तीव्र चिंता व्यक्त केली असून अमेरिकेकडे याचे स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच हल्ले तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी यावरून आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून टीका करत “तीन भारतीयांनी आपले प्राण गमावले. आणि आमचे कॉम्प्रोमाइज्ड पंतप्रधान यावर एक शब्दही बोलत नाहीत,” असे म्हणत पंतप्रधानांवर टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल गांधी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून म्हणाले, “तीन दिवसांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत अमेरिकेने तीन जहाजांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये तीन भारतीयांनी आपले प्राण गमावले. आणि आमचे तडजोडबद्ध पंतप्रधान? एक शब्दही नाही. जेव्हा एखादी परकीय शक्ती भारतीयाची हत्या करते, तेव्हा पंतप्रधानांनी बोलायलाच हवे. तरीही, ते एक शब्दही उच्चारण्याचे धाडस करणार नाहीत.”

अन्तर्राष्ट्रीय जल में तीन दिन में तीन जहाज़ों पर अमेरिकी हमलों में तीन भारतीयों की मृत्यु हो गई। और हमारे Compromised PM? एक शब्द तक नहीं। जब कोई विदेशी ताकत किसी भारतीय की हत्या करे, तो प्रधानमंत्री को बोलना पड़ता है। लेकिन मजाल है जो ये एक शब्द बोल जाएं। अगले हफ्ते G7 में,… — Rahul Gandhi (@RahulGandhi) June 12, 2026

“पुढच्या आठवड्यात जी-७ परिषदेत—आपल्या खलाशांच्या हत्येनंतर अवघ्या काही दिवसांतच—मोदीजी हसतील, आलिंगन देतील आणि करारांवर स्वाक्षरी करतील; तरीही, त्या तीन भारतीयांबद्दल ते एक शब्दही बोलणार नाहीत. एक तडजोडबद्ध पंतप्रधान भारतमातेच्या सुपुत्रांचे रक्षण करू शकत नाही, कारण ज्यांनी त्यांचे प्राण घेतले, त्यांच्याशी वैर पत्करण्याचे धैर्य किंवा सामर्थ्य त्यांच्यात नाही,” असे ते यावेळी म्हणाले.

Strait Of Hormuz : भारताचा अमेरिकेला थेट इशारा; ओमानच्या समुद्रात भारतीय खलाशांवर हल्ले का? MEA ने बजावला ‘डिमार्च’

भारतीय नाविकांच्या मृत्यूवर इराणची प्रतिक्रिया

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना इराणचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी अमिरेकेवर जोरदार टीका केली आहे. व्यापारी जहाजंवरींल अमेरिकेच्या हल्ल्याला त्यांनी समुद्री दरोडेखोरी म्हटले आहे. भारतीय नाविकांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करत भारत सरकार आणि नागरिकांबद्दल सहवेदना व्यक्त केला आहेत. तसेच नाविकांच्या मृत्यूसाठी अमेरिकेला जबाबदार धरले आहे.

भारताची प्रतिक्रिया काय ?

दरम्यान भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जहाजावरील भारतीय कर्मचाऱ्याच्यां सुरक्षेबाबत चिंका व्यक्त केली आहे. सध्या ओमानमधील भारतीय दूतावास स्थानिक सरकारच्या मदतीने परिस्थितीवर बारकाईने लक्ष्य ठेवनू आहे.

भारताने मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्ष आणि समुद्री मार्गांवरील हल्ले तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. दोन्ही देशांना संयम बाळगून संवादातून तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. परिसरात शांतता प्रस्थापित व्हावी आणि व्यापारी जहाजांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे असे सरकारने म्हटले आहे.

Hormuz Attack: भारतीय नाविकांच्या मृत्यूप्रकरणी इराणचा हल्लाबोल; अमेरिकेवर केला गंभीर आरोप

Web Title: Rahul gandhi slams pm narendra modi over three indians died in hormuz attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • Iran-US War
  • narendra modi
  • Rahul Gandhi
  • Strait of Hormuz

संबंधित बातम्या

Strait Of Hormuz : अमेरिकेच्या ‘मिशन होर्मुझ’ला भारताचा थेट नकार; पाश्चात्त्य देशांच्या दबावानंतरही पंतप्रधान मोदींचा बाणेदारपणा
1

Strait Of Hormuz : अमेरिकेच्या ‘मिशन होर्मुझ’ला भारताचा थेट नकार; पाश्चात्त्य देशांच्या दबावानंतरही पंतप्रधान मोदींचा बाणेदारपणा

Hormuz Attack: भारतीय नाविकांच्या मृत्यूप्रकरणी इराणचा हल्लाबोल; अमेरिकेवर केला गंभीर आरोप
2

Hormuz Attack: भारतीय नाविकांच्या मृत्यूप्रकरणी इराणचा हल्लाबोल; अमेरिकेवर केला गंभीर आरोप

US Iran Peace Deal : ट्रम्प यांचा पुन्हा शांततेचा दावा; अमेरिका-इराण युद्ध थांबणार? होर्मुझबाबतही मोठे संकेत
3

US Iran Peace Deal : ट्रम्प यांचा पुन्हा शांततेचा दावा; अमेरिका-इराण युद्ध थांबणार? होर्मुझबाबतही मोठे संकेत

पुन्हा उफाळला… इराण-अमेरिकेत युद्धाचा भडका! Hormuz पूर्णपणे बंद, आता तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
4

पुन्हा उफाळला… इराण-अमेरिकेत युद्धाचा भडका! Hormuz पूर्णपणे बंद, आता तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.