Rahul Gandhi Parliament Street News: संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर हायव्होल्टेज ड्रामा; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे राजकारण तापणार (Credit- @INCIndia)
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गेल्या महिन्यात दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनात दिलली पोलिसांनी (Delhi Police) कथित पेलेट गन गोळीबारात जखमी झालेल्या विद्यार्थ्याला सोबत घेऊन पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यातील डीसीपी कार्यालयाला भेट दिली. त्यांच्यासोबत पीडित विद्यार्थी साहिल लोचव आणि काँग्रेस खासदार कुमारी शैलजा यादेखील होत्या. राहुल गांधी या कथित पेलेट गन गोळीबार प्रकरणात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. पण पोलिसांनी एफआयआरे दाख करण्यास नकार दिल्याने राहुल गांधी पोलिस ठाण्याबाहेर धरणे आंदोलनाला बसले.
शुक्रवारी डीसीपी कार्यालयात पोहोचलेल्या राहुल गांधी यांनी साहिल लोचवच्या लेखी पोलीस तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्याची आणि तक्रारीचा आय/ओ क्रमांक देण्याची मागणी केली. काँग्रेसच्या सूत्रांनुसार, साहिलने १४ ऑगस्ट रोजी आपल्या वकिलांसोबत दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली होती, परंतु पोलिसांनी आय/ओ क्रमांक दिला नाही. त्यानंतर, १७ ऑगस्ट रोजी ईमेल आणि फोनद्वारे हा मुद्दा उपस्थित करण्यात आला, परंतु तक्रारीची कोणतीही पोचपावती मिळाली नाही आणि कोणताही आय/ओ क्रमांक देण्यात आला नाही.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जोपर्यंत तक्रारीची औपचारिक नोंद होत नाही, तोपर्यंत आपण पोलीस ठाण्यातच थांबून न्यायाची मागणी करत राहू, असा आक्रमक पवित्रा राहुल गांधींनी घेतला आहे. तक्रार दखलपात्र गुन्हा असूनही दिल्ली पोलीस एफआयआर दाखल करत नाहीयेत. राहुल गांधी शुक्रवारी पीडित विद्यार्थ्यासोबत डीसीपींच्या कार्यालयात गेले आणि त्यांनी तक्रारीवर कारवाई, केस ऑफिसरची माहिती आणि तपास अधिकारी क्रमांकाची मागणी केली. राहुल गांधी डीसीपींच्या कार्यालयात उपस्थित असताना, या प्रकरणी पोलीस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.






