Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: खासदार लंके यांचा “वेट अँड वॉच” इशारा; राहुरी पोटनिवडणुकीत मविआच्या भूमिकेकडे लक्ष

राज्यभरात पोटनिवडणुकीच्या वारे वेगाने वाहत आहेत. अहिल्यानगरमधील राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 05, 2026 | 09:09 PM
खासदार लंके यांचा “वेट अँड वॉच” इशारा; राहुरी पोटनिवडणुकीत मविआच्या भूमिकेकडे लक्ष

खासदार लंके यांचा “वेट अँड वॉच” इशारा; राहुरी पोटनिवडणुकीत मविआच्या भूमिकेकडे लक्ष

Follow Us
Follow Us:
  • राज्यात पोटनिवणुकीचे वारे
  • राहुरी पोटनिवडणुकीकडे लक्ष
  • खासदार निलेश लंकेचा “वेट अँड वॉच” इशारा कोणाला?
राज्याच्या राजकारणात सध्या पोटनिवडणुकांचे वारे जोराने वाहू लागले आहेत. विशेषतः बारामती आणि राहुरी
विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच अहिल्यानगरमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. या बैठकीनंतर खासदार निलेश लंके यांच्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेमुळे तर्कवितर्क लढविले जात आहेत.

राहुरी विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याबाबत आणि त्यांच्या पक्षाबाबत अजूनही तळ्यात मळ्यात आहेत. समर्थक मात्र ते निवडणूक रिंगणात नक्की असतील, असा दावा करत आहेत, असे असले तरी ते पक्षा चिन्हाऐवजी अपक्ष म्हणून शड्डू ठोकणार असल्याचे बोलले जाते. जर तनपुरे अपक्ष लढले, तर त्यामागे स्थानिक समीकरणे, जुळवण्याची रणनीती असू शकते. मात्र त्यांची ही भूमिका महाविकास आघाडी मान्य करेल का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

हे देखील वाचा : हिमंत बिस्वा सरमा देशातील सर्वात भ्रष्टाचारी मुख्यमंत्री; आसाममधून राहुल गांधींचा आक्रमक पवित्रा

खासदार लंकेंच्या विधानामुळे गोंधळाचे वातावरण

सध्या तरी आमची भूमिका “वेट अँड वॉच” अशीच आहे. लंके यांची भूमिका गौधळात टाकणारी आहे. खासदार लंके यांच्या विधानामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. खासदार लंके हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यांच्या ववक्तव्यामागे एखादा ‘राजकीय भूकंप’ तर दडलेला नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राजकारणात वेळ आणि काळ खूप महत्वाचा असतो. सध्या आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असे विधान त्यांनी केले होते.

महायुतीसाठी आता अस्तित्वाची लढाई

उट्टे काढण्याची संधी आणि भावनिक लढाई अशी अवस्था आहे. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक आणि नंतर नगरपालिका, महापालिका या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडासाफ केला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी माविआसाठी ही संधी आहे, तर भावनिक आणि राजकीय दृष्ट्या महायुतीसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. प्राजक्त तनपुरे याची भूमिका आणि शरद पवार गटाचा अंतिम निर्णय यावरच राहुरीच्या निकालांचे भवितव्य अवलंबून असेल.

राजकीय वर्तुळात तनपुरेंच्या अपक्ष उमेदवारीचीच चर्चा

तनपुरे यांनी अद्याप आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही, परंतु राजकीय वर्तुळात त्यांच्या अपक्ष उमेदवारीची चर्चा सुरू झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. राजकारणात वेळ आणि काळ महत्वाचा… आज अहिल्यानगरमध्ये जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर खल झाला. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले, राजकारणात वेळ आणि काळ खूप महत्त्वाचा असतो. सध्या आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल.

Web Title: Rahuri by election ahilyanagar news nilesh lanke wait and watch mva stand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 08:58 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Maharashtra Politics
  • Nilesh Lanke

संबंधित बातम्या

Crime News: सायंकाळी गजबजलेल्या रस्त्यावर अचानक हल्ला; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आरोपी पसार
1

Crime News: सायंकाळी गजबजलेल्या रस्त्यावर अचानक हल्ला; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आरोपी पसार

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
2

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
3

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Maharashtra Live Breaking News in Marathi:  काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.