(फोटो सौजन्य: X)
सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. आपल्या शक्तीने तो कितीतरी शिकाऱ्यांची शिकार करतो. त्याची ताकद आणि बलाढ्य शक्ती यामुळेच त्याला जंगलावर राज्य करणाऱ्या जंगलाचा राजाची उपमा देण्यात आली आहे. सिंहच्या शिकारीचे अनेक व्हिडिओज तुम्ही याआधीही सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहिले असतील पण आता मात्र इथे एक अनोखा आणि सर्वांना अचंबित करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये सिंहाचं संपूर्ण कुटुंब एका झाडाखाली विश्रांती घेत असतानाच तिथे हत्तीची एंट्री झाल्याचे दिसते ज्यानंतर व्हिडिओतील संपूर्ण दृश्यच पालटून जाते. हत्तीला पाहताच सिंहाच्या कुटुंबाची अशी प्रतिक्रिया बघायला मिळते जिला पाहून सर्वच आश्चर्यचकित होतात. चला तर मग नक्की काय घडलं येत सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये पाहिलं तर तुम्हाला दिसेल की, एक सिंह आणि सिंहिणींच्या काही जोड्या त्यांच्या लहान मुलांसह एका झाडाखाली विश्रांती घेत आहेत. याचवेळी समोरून एक हत्ती चालत त्यांच्याजवळ येतो. हत्ती सिंहाच्या कुटुंबाला पाहतो पण तो आपली पाऊले थांबवत नाही आणि त्यांच्या दिशेने वेगाने जात राहतो. अशात तो जवळ येताच सिंहाच्या कुटुंबातील सर्वजण त्याला आपल्या दिशेने येताना पाहतात आणि लगेच झोपेतून उठून तिथून पळ काढू लागतात. सिंहीण आणि बछड्यांसह सर्वच तिथून पळून जातात आणि यात लक्षवेधी ठरतं ते सिंहाचं पळून जाण, जंगलाचा राजा असा हत्तीला घाबरून पळत आहे हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. हे दृश्य पाहून आता जंगलाचा राजा नक्की कोण असा प्रश्न युजर्स विचारत आहेत.
WHO is the king now???😂😂 pic.twitter.com/GdZMGUZAWC
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) September 15, 2025
जंगलातील हे अनोखं दृश्य @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सिंह हे जंगलाचे राजा नाहीत, त्यांच्याकडे फक्त चांगली पीआर टीम आहे आणि त्यांच्याकडे कामाचा वेग खूप आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हाहाहा, हत्तीमुळे सिंह पथक घाबरले” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्याच्या नकळत तो त्यांच्या इतक्या जवळ आला हे पाहून आश्चर्य वाटले”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.