
"तुमच्या मतदानाच्या ढळढळीत अपमानाचा..."; निवडणूक लागताच Raj Thackeray यांनी दिली प्रतिक्रिया
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा
२ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार
राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेवर केले भाष्य
राज्यातील बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे (Maharashtra Local body Election) अखेर आज (4 नोव्हेंबर) बिगुल वाजले आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक 2 डिसेंबर 2025ला होणार तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. निवडणुकीची घोषणा केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय म्हणाले?
आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे… दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय ?
आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे… दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या… pic.twitter.com/DizmmWTOkH — Raj Thackeray (@RajThackeray) November 4, 2025
जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय ? महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा… तुमच्या मतदानाच्या ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल. बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन…
सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ या अंतिम मुदतीत पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याचपार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगावर वेळेच बंधन आले असून अखेर निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तारीख जाहीर करावी लागली.
या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये २९ महानगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा, ४२ नगरपंचायती, ३३६ पंचायत समित्या, २४६ नगरपालिका या सर्व संस्थांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य व्यवस्थेसाठी निवडणुकांची प्रतीक्षेत होते.
या निवडणुका जाहीर होताच राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापणार आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि अजित पवार गट, शिवसेना (उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट) यासह राज्यातील सर्व पक्षांनी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे.
पहिला टप्पा: राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुका
दुसरा टप्पा: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका
तिसरा आणि शेवटचा टप्पा: नगरपालिका निवडणुका